Sunday, February 8, 2026

एक्सलंट टीचर्स अवॉर्ड्स 2025

18 Jan, 2026 एक्सलंट टीचर्स अवॉर्ड्स 2025
जळगाव व धुळे जिल्ह्यात ज्ञानदानाच्या क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण सेवा बजावून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी झटणाऱ्या शिक्षकांचा लोकमत एक्सलेंट टीचर्स अवॉर्ड्स देऊन सन्मान करण्यात आला. खासदार स्मिताताई वाघ, आमदार किशोरआप्पा पाटील, प्रख्यात सिने अभिनेत्री किशोरीताई शहाणे, खान्देश कॉलेज ऑफ एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष ऍड. प्रकाश पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, एल. एच. पाटील स्कुलचे संचालक जितेंद्र पाटील व लोकमतचे उपमहाव्यवस्थापक गौरव रस्तोगी यावेळी समवेत होते.
#LokmatJalgaon #LokmatEvent #LokmatJalgaonEvent #LokmatExcellentTeachersAward #KiranAgrawalLokmatJalgaon

No comments:

Post a Comment