At present, working as a Executive Editor of Lokmat, Akola(Maharashtra). Known as a "Saraunshkar", because "Saraunsh" columns are written every Sunday on political and social issues. For excellence in journalism, honoured with Shanti Bhushan Puraskar, Girna Gaurav, Darna Gaurav, Shiva Gaurav, Vivekanand Yuva Gaurav, Maharashtra Govt Vikas Varta etc. Also awarded by "AGRASHRI". Participates in various debates on news channels.
Sunday, February 8, 2026
नूतन वर्षाभिनंदन 2026...
नूतन वर्षाभिनंदन 2026...
बघता बघता 2025 हे वर्षही सरले.
अनेक कटू गोड आठवणी ठेवून ते गेले. अनेक चांगल्या बाबी घडल्या, काही बिघडल्याही.
चांगले ते सोबत घेऊया, जे बिघडले त्यातून शिकूया.
महत्त्वाचे म्हणजे, मानवी बुद्धीवर आक्रमण करणारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा काळ आला आहे. यात सावधपणे वाटचाल करावी लागणार आहे.
डिजिटलायझेशन वाढून गेले आहे, सर्वांचा स्क्रीन टाईमही वाढला आहे. ते गरजेचे असले, तरी त्याचा अनावश्यक वापर व अतिरेक टाळायला हवा.
व्हर्चुअलिटी वाढलेल्या या काळात यंत्रावरचा विश्वास वाढला, पण माणसाचा माणसावरील विश्वास कमी होत चालला आहे. 'आभासी' दुनियेत आपण सारे वावरत आहोत.
कुणीतरी खूप छान म्हटले आहे,
कभी पड़ोसी भी घर का हिस्सा हुआ करते थे...
आज एक ही घर में ना जाने कितने पड़ोसी हैं ।।
आपण घरात असून घरच्यांशी संवाद हरवून बसलो आहोत. अबोला वाढीस लागला आहे. 'स्व'मग्नता ओढविली आहे.
पूर्वी पोस्ट कार्डावरील शब्दांनी भावनांचे आदान प्रदान होऊन जाई, मन गलबलून येई; आता तासनतास मोबाईलला बिलगुनही आणि व्हाट्सअप व्हिडीओ कॉल करूनही ती 'ओल' काही जाणवत नाही.
नवीन वर्षात पाऊल ठेवून त्याचे स्वागत करताना हा 'दुरावा' कमी करण्याचा प्रयत्न करूया, मनातून डोळ्यात उतरणारी ती ओल जपुया...
संवेदना ही आपल्या जगण्याची प्रेरणा आहे. मानवी मूल्याचा तो अतूट धागा आहे. AIचे भूत मानगुटीवर असले तरी मानवी बुद्धिमत्ता व संवेदनांना ते हरवू , बायपास करू शकणार नाही.
नववर्षातच नव्हे, आगामी काळात या संवेदना जपूया, माणूस होऊया...
नव्या विश्वासाने, उमेदीने व आश्वासकतेने मांगल्याचे तोरण बांधत, प्रसन्नतेने नववर्ष 2026चे स्वागत करूया....
Happy New Year मित्रांनो Kiran Agrawal
#KiranAgrawal
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment