Sunday, February 8, 2026

दिव्यांग बालकांच्या पालकांसाठी मार्गदर्शन...

31 Jan, 2026 दिव्यांग बालकांच्या पालकांसाठी मार्गदर्शन...
कुटुंबातील दिव्यांग बालकांचे पालन पोषण ही खूप अवघड बाब, संबंधित कुटुंबालाच त्यासाठीचे दिव्य ठाऊक असते. पण ही जबाबदारी पार पाडताना ती संतसेवेच्या भावनेने केली तर त्याचे ओझे वाटणार नाही, असा मोलाचा सल्ला नारायण रेकी संस्थानच्या प्रमुख मार्गदर्शिका राजेश्वरी मोदी तथा राजदीदी यांनी दिला आहे. जळगाव येथे या संस्थेच्या पुढाकाराने व जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या दिव्यांग विभागाच्या सहकार्याने अशा बालकांच्या पालकांसाठी विशेष समुपदेशनाचे सत्र आयोजिण्यात आले होते. राज दीदी व अन्य मान्यवरांसमवेत या सत्राचे दीप प्रज्वलनाने उद्घाटन करण्याची संधी लाभली. यानिमित्ताने दीदींशी संवादही साधता आला. नारायण रेकी संस्थानच्या जळगाव केंद्रप्रमुख कला प्रशांतजी अग्रवाल, सुनीता दमानी, डॉ. सुरेश अग्रवाल, विनिता मंडोरा, दिनेश थोरात आदिंनी कार्यक्रमाचे संयोजन केले. #Rajdidi #RajeshwariModi #KiranAgrawal

No comments:

Post a Comment