Sunday, February 8, 2026

लोकमत शौर्य पुरस्कार 2026

13 Jan, 2026 लोकमत शौर्य पुरस्कार...
कायदा व सुव्यवस्था राखून समाजाचे स्वास्थ्य जपण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या जळगाव जिल्हा पोलीस दलातील शूर बांधवांचा लोकमत शौर्य पुरस्काराने सन्मान करण्यात आला. विविध गुन्ह्यांची तड लावून ते उघडकीस आणण्यापासून ते आरोपीस अटक करून न्यायालयापुढे उभे करण्यापर्यंत परिश्रम घेतलेल्या तसेच यापूर्वी गडचिरोली, गोंदिया आदी भागात सेवा देऊन विशेष कामगिरी बजावलेल्यांचा यात समावेश होता. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह प्रायोजक त्रिमूर्ती फाउंडेशनचे मनोज पाटील व डंबेलकर क्लासेसचे अमित डंबेलकर याप्रसंगी उपस्थित होते.
#LokmatJalgaon #LokmatShouryaPuraskar #LokmatJalgaonEvent #LokmatEvent

No comments:

Post a Comment