Monday, January 25, 2021

ओस के बूंद सी होती है बेटिया ...

24 Jan, 2021
ओस के बूंद सी होती है बेटिया , स्पर्श खुरदरा हो तो रोती है बेटिया... किती भावगर्भ लिहिले आहे हे कुणी. खरेच शब्दशः दवबिंदू सारख्याच असतात मुली. तनाने व मनानेही नाजूक, हळव्या. कमालीच्या संवेदनशील तसेच खट्याळही. जगण्याच्या पुस्तकातील कवितेसारख्या. आईचे वात्सल्य, मावशीची माया, बहिणीचा जिव्हाळा असे सारे काही एकीतच लाभते ती म्हणजे कन्या. आमच्या लोकमतचे एडिटर इन चीफ श्री राजेंद्र बाबूजी दर्डा यांनी खरेच म्हटलेय, जरूरी नहीं रौशनी चिरागों से ही हो, बेटियाँ भी घर में उजाला करती हैं..! माझ्याही घरात असा उजेड व आनंद पेरणाऱ्या #माझ्या_लेकी_माझा_अभिमान आणि स्वाभिमानही... आज राष्ट्रीय बालिका दिन, सर्व लेकींना मनःपूर्वक शुभेच्छा... #KirananandNashik #ShrutiKruti #NationalGirlChildDay

No comments:

Post a Comment