Monday, January 4, 2021

Chhatrapati Sambhaji Raje visit..

Jan 03, 2021
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय व अतुलनीय शौर्याची व स्वराज्य प्रेरणेची साक्ष असलेले गड कोट किल्ले म्हणजे महाराष्ट्राचे वैभवच. या गड कोट किल्ल्यांच्या संवर्धनासाठी झटणारे खासदार छत्रपती संभाजी राजे म्हणजे समस्त मावळ्यांचे आशास्थान व प्रेरणास्थानही. त्यांचे नेतृत्व व मार्गदर्शनात रायगडाचा अल्पावधीत कायापालट होताना दिसत आहे.
राजे यांनी आज लोकमत कार्यालयास सदिच्छा भेट दिली असता यासंबंधीच्या त्यांच्या निर्धाराचा पुनरुच्चार केला. दांडगी इच्छाशक्ती व त्यासाठीचा सखोल अभ्यास त्यांच्या बोलण्यातून अधोरेखित होत होता. राजे, आपल्या संकल्पाच्या सिद्धीसाठी आम्हीही सहर्षपणे आपल्या सोबत आहोत... #SambhajiRajeKolhapur #KiranAgrawalLokmat

No comments:

Post a Comment