At present, working as a Executive Editor of Lokmat, Akola(Maharashtra). Known as a "Saraunshkar", because "Saraunsh" columns are written every Sunday on political and social issues. For excellence in journalism, honoured with Shanti Bhushan Puraskar, Girna Gaurav, Darna Gaurav, Shiva Gaurav, Vivekanand Yuva Gaurav, Maharashtra Govt Vikas Varta etc. Also awarded by "AGRASHRI". Participates in various debates on news channels.
Monday, June 28, 2021
महाराजा श्री अग्रसेन मेडिकल उपकरण बँक
27 June, 2021
महाराजा श्री अग्रसेन आर्थोपेडिक एवम मेडिकल उपकरण बँक का शुभारंभ
महाराष्ट्र राज्य युवा अग्रवाल संमेलन अकोला शाखा एवं श्री निकेश गुप्ता फाउंडेशन द्वारा अकोला मे महाराजा श्री अग्रसेन आर्थोपेडिक एवम मेडिकल उपकरण बँक का शुभारंभ वरिष्ठ पत्रकार श्री किरण भाईजी अग्रवाल के हाथो किया गया ।
संत तुकाराम हॉस्पिटल के अध्यक्ष श्री गिरीश जी अग्रवाल, अग्रवाल समिती अकोला के अध्यक्ष श्री शैलेंद्र कागलीवाल, महाराष्ट्र संमेलन के जिल्हाध्यक्ष श्री निरंजन अग्रवाल, महिला अध्यक्षा निर्मला झुनझुनवाला, प्रतूल भरुका, रितेश गोयल, मनोज अग्रवाल आदि मंच पर विराजमान थे। राजस्थानी सेवा संघ अकोला के अध्यक्ष एवम मारवाडी संमेलन के महाराष्ट्र प्रदेश महामंत्री श्री निकेश गुप्ता ने इस प्रकल्प का संयोजन कीया।
#kiranAgrawal #MaharajaAgrasenBank #AgrawalAkola
Sunday, June 27, 2021
कुलगुरू डॉ. भाले यांची सदिच्छा भेट
21 June, 2021
कुलगुरू डॉ. भाले यांची सदिच्छा भेट
शेतीला उद्योगाचा दर्जा मिळो न मिळो, पण कोरोनाच्या संकटात बाकी सारे उद्योग-व्यवसाय ध्वस्त होत असताना शेतीची शाश्वतता अधोरेखित होऊन गेली आहे. या शेती क्षेत्रात कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे तंत्रज्ञान पुरविण्याची जबाबदारी कृषी विद्यापीठांची आहे. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने याबाबतीत केलेले काम अतुलनीय असे आहे. या विद्यापीठाने आतापावेतो अन्न धान्यासह फळे, फुले, भाजीपाल्याचे सुमारे 165 पेक्षा अधिक नवीन बियाणे विकसित केले असून, शेती विषयक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांचे उत्पन्न आणि उत्पादन वाढविण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.
या विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. विलास भाले सर यांची आज सदिच्छा भेट घेतली. शाश्वत व सेंद्रिय शेती यासह शेतीपुढील आव्हाने आदी विषयांवर मोकळेपणे व विस्ताराने चर्चा झाली. समवेत मुख्य उपसंपादक राजरत्न शिरसाट होते.
लोकमतद्वारे दि. 2 जुलैपासून आयोजित रक्तदान मोहीमेच्या उपक्रमाचे कौतुक करीत मा. कुलगुरूंनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहनही यावेळी केले...
Thank you Dr. Bhale sir...
#DrPDKV #VCVilasBhale #AkolaLokmat #KiranAgrawalLokmat
लोकमत रक्ताचं नातं...
15 June, 2021
#लोकमत_रक्ताचं_नातं.
स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंती दिनापासून (2 जुलै) सुरू होणाऱ्या रक्तदान मोहिमेच्या लोगोचे अनावरण काल जागतिक रक्तदाता दिनी अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते करण्यात आले.
मंत्रीपदी असतानाही कार्यकर्त्यासारखी धडपड सदोदित करणारे व ज्यांच्या समाजकारण तसेच राजकारणाची सुरुवातच रक्तदानासारख्या पुण्य कार्याने झाली, अशा बच्चुभाऊ यांच्या हस्ते या मोहीमेच्या जनजागरणाचा शुभारंभ झाला.
याप्रसंगी समवेत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मित्तल इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक श्रीराम मित्तल, सामाजिक कार्यकर्ते पंकज जायले, लोकमतचे युनिट हेड आलोककुमार शर्मा, समाचारचे प्रभारी अरुणकुमार सिन्हा, जाहिरात विभागाचे विदर्भ प्रमुख आसमान सेठ, उप वृत्तसंपादक राजेश शेगोकार, वरिष्ठ उपसंपादक राजरत्न शिरसाठ यांच्यासमवेतची ही आनंदचित्रे ...,
#AkolaLokmat #LokmatBloodDonation #KiranAgrawalLokmat
Hon. Rajendrababuji visit in Akola..
26 June, 2021
पुन्हा नवा जोश, नवा उत्साह...
अकोला जिल्ह्यातील लोकमत वार्ताहर व एजंट्स बांधवांची बैठक आज एडिटर इन चीफ मा. राजेंद्र बाबूजी दर्डा यांनी घेतली. कोरोनाच्या धक्क्यातून सावरत परंतु स्वतःची व कुटुंबीयांचीही काळजी घेत पुन्हा नव्या दमाने पत्रकारिता परमो धर्म निभावण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.
अतिशय उत्साहात पार पडलेल्या या बैठकी प्रसंगीची आठवण चित्रे...
#AkolaLokmat #RajendraDarda #KiranAgrawalLokmat
दिलासादायी व पंखात बळ भरणारी भेट...
25 June, 2021
दिलासादायी व पंखात बळ भरणारी भेट...
लोकमतचे एडिटर इन चीफ श्री. राजेंद्र बाबूजी दर्डा यांनी आज बुलडाणा, खामगाव व अकोला येथे भेटी देत संपादकीय विभागातील सहकाऱ्यांबरोबरच विविध मान्यवरांशीही हृद्य संवाद साधला ...
कोरोनाच्या संकटातही पत्रकारिता परमो धर्माला जागत सेवा बजावणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे कौतुक करीत मा. बाबूजींनी आगामी काळात अधिक जोमाने काम करण्यासाठी पंखात बळ भरले. 'आजचा दिवस उद्या असणार नाही, काही झाले तरी माणुस हिम्मत हारणार नाही...' असा दुर्दम्य आशावाद जागवत त्यांनी सर्व सहकारींना प्रेरणा व दिलासादायी मार्गदर्शन केले.
कोरोना अजून पूर्णतः गेलेला नसताना आपल्या सहकाऱ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी दौऱ्यावर निघालेल्या बाबूजींनी यानिमित्ताने पुन्हा लोकमत परिवाराच्या भावनेला बळकटी दिली.
यावेळी त्यांनी अकोला येथील सहकारी श्री प्रवीण खेते व गजानन अवस्थी यांना कोरोना योद्धे म्हणून गौरवपत्रही प्रदान केले.
Washim visit..
#AkolaLokmat #RajendraDarda #KiranAgrawalLokmat
Saraunsh published in Akola Lokmat on June 27, 2021
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20210627_8_1
https://www.lokmat.com/manthan/dont-just-season-fulfill-your-purpose-a310/
Editors View published in Online Lokmat on June 24, 2021
योजना 'स्मार्ट'च, पण नियोजनाचे खोबरे !
किरण अग्रवाल /
सरकारी योजनांच्या निर्धारणामागे हेतु कितीही चांगला असला तरी त्यांच्या अंमलबजावणीतील अडथळे दूर करता न आल्यास उद्दिष्टपूर्ती गाठणे अवघडच होऊन बसते. यातही योजनेच्या क्रियान्वयनाचा संबंध एकापेक्षा अधिक यंत्रणांशी अगर स्तरावर असतो, तेव्हा त्यात कालापव्यय होण्याबरोबरच मत मतांतराला अधिक संधी मिळून जाणे स्वाभाविक ठरते; परिणामी योजना रखडते किंवा ती गुंडाळून ठेवणे भाग पडते. मोदी सरकारने ड्रीम प्रोजेक्ट म्हणून हाती घेतलेल्या स्मार्ट सिटी योजनेचेही दुर्दैवाने तसेच काहीसे झालेले दिसत आहे.
व्यापार उद्योगासाठी असो, की नोकरी वा मुलांच्या शिक्षणाच्या निमित्ताने; गावातून शहरात येणाऱ्यांचे लोंढे वाढत आहेत. यामुळे शहरे विस्तारत असली तरी वाढत्या नागरीकरणाचा ताण तेथील नागरी सुविधांवर येत आहे. महापालिका असलेली महानगरे असली तरी त्यात समाविष्ट करण्यात आलेल्या लगतच्या गावांची अवस्था खेड्यासारखीच असल्याचे चित्र अनेक ठिकाणी आढळून येते. अनेक शहरे तर आपला चेहराच हरवून बसल्यासारखी झाली आहेत, म्हणूनच देशातील 100 शहरांची कालसुसंगत प्रगती घडवून त्यांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी केंद्र सरकारने स्मार्ट सिटी योजना आणली. महाराष्ट्रातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती, नागपूर व सोलापूर या प्रमुख दहा शहरांची त्यात निवड करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणवल्या गेलेल्या या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधीही उपलब्ध करून देण्यात आला आहे, मात्र केंद्र, राज्य व स्थानिक यंत्रणेच्या त्रांगड्यामुळे अनेक ठिकाणी या योजनेच्या अंमलबजावणीत अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र असल्याने कोणत्याही स्मार्ट सिटी प्रकल्पाची सर्वच्या सर्व म्हणजे शंभर टक्के कामे पूर्ण होऊ शकलेली नाहीत. स्मार्ट सिटी मिशनचे सहसचिव कुणाल कुमार यांच्यासोबत राज्यातील सर्व संबंधित सीईओ यांची जी ऑनलाईन बैठक झाली, त्यातही हीच बाब पुढे आली.
---------------
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत जागोजागी कामे खूप घेतली गेलीत, परंतु अपवाद वगळता अनेक कामे रेंगाळली आहेत. मुळात या कामासाठी ठिकठिकाणी स्वतंत्र कंपनी नेमण्यात आली असून, त्या कंपनीचे सीईओ व स्थानिक पालिकांचे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यात एकवाक्यता नसल्याने मोठी अडचण होत आहे. यातून सदर कंपनी बरखास्त करण्याची मागणी नाशिकच्या महापौरांनी केल्याचे बघावयास मिळाले. इतकेच नाही तर आता कोरोनामुळे महापालिकेचे आर्थिक स्त्रोत मंदावल्यामुळे स्मार्ट सिटी योजनेसाठी राखून ठेवलेला निधी पुन्हा महापालिकेकडे वर्ग करून घेण्याची मागणी केली जात आहे. नागपुरातही या कंपनीचे सीईओपद तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी घेतल्यावरून प्रकरण कोर्टात गेल्याचे बघावयास मिळाले होते. इतर ठिकाणी कामातील अनियमितता, गैरव्यवहार व ठेकेदारावरील मेहेरनजर यामुळे वाद घडून आले आहेत. याबाबतीत नाशिकचेच एक उदाहरण बोलके ठरावे, तेथे अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका हा अवघ्या सुमारे एक किलोमीटरचा रस्ता स्मार्ट करण्यासाठी सुमारे सतरा कोटींचा खर्च केला गेला. तब्बल अडीच वर्ष या रस्त्याचे काम चालले, पण तरी अपेक्षेप्रमाणे तो स्मार्ट ठरलाच नाही. अशी इतर ठिकाणचीही उदाहरणे देता येतील की ज्यामुळे स्मार्ट सिटी योजनेची अधिकतर कामे वादग्रस्तच ठरली.
-------------
महत्त्वाचे म्हणजे केंद्र सरकार, राज्य व स्थानिक महापालिका अशा तिन्ही स्तरावर समन्वयातून या योजनेअंतर्गत कामे अपेक्षित आहेत, परंतु त्यातच मोठ्या अडचणी आहेत. कंपनी विरुद्ध स्थानिक महापालिका असे तंटे त्यातून उभे राहिलेले दिसत आहेत. या योजनेत हरित विकास प्रकल्पांतर्गत नियोजन बद्ध शहर वसविण्याचे सुद्धा अपेक्षित आहे, परंतु त्यासाठी लागणारी जागा व त्या जागेस अनेक ठिकाणी होत असलेल्या विरोधामुळेही अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. परिणामी जुन्याच कामाचे नूतनीकरण करण्यावर भर दिला जात आहे व त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होऊन देखील कामे रेंगाळल्यामुळे तक्रारी वाढुन गेल्या आहेत. एकूणच स्मार्ट सिटीची योजना चांगली असली व आधुनिक काळाशी सुसंगत सोयी सुविधांयुक्त शहरांचा विकास घडविणारी असली तरी केवळ नियोजनातील गोंधळ व यंत्रणांमधील समन्वयाच्या अभावामुळे या योजनेचे खोबरे होताना दिसत आहे, त्यामुळे ती लवकरच गुंडाळली गेली तर आश्चर्य वाटू नये.
https://www.lokmat.com/editorial/plan-smart-unwell-planning-a309/
Sunday, June 20, 2021
प्रा. मधू जाधव ... लोकमत भेट
18 June 2021, at 10:22 ·
चळवळीतून आलेल्या व्यक्तीला स्वस्थता माहीतच नसते. धडपड व कळकळ हा तिचा स्थायिभाव बनून गेलेला असतो. माझे स्नेही, साथी प्रा. मधू जाधव यांच्याशी प्रदीर्घ काळानंतर झालेल्या भेटीतूनही हाच अनुभव आला.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, मनमाड येथे ते प्राध्यापकी करत असताना भोंदूगिरी करणार्या हनुमान बाबाला आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून एक्सपोज केले होते. त्यानंतर आमचे बऱ्याचदा फोनवर बोलणे झाले, पण प्रत्यक्ष भेट नव्हती. मी अकोल्यात आलो आहे हे समजल्यावर ते मुद्दाम भेटायला आले.
चळवळीच्या मुशीतून घडलेले जाधव सर हे रंगकर्मी, व्याख्याते, समीक्षक, पत्रकार आदी भूमिकांतून गेलेले; त्यामुळे भरपूर गप्पा झाल्या. समाजाप्रतीची कळकळ व काहीतरी करण्याची त्यांची धडपड अजूनही टिकून असल्याचे या चर्चेत प्रकर्षाने दिसून आले. जाता जाता त्यांनी लिहिलेली 'चौफेर कलम' तसेच 'चौफेर व नाट्यांगण' ही दोन पुस्तके ते भेट देऊन गेले. आता निवांतपणे ती पुस्तके वाचणार आहे मी ...
#AkolaLokmat #KiranAgrawalLokmat
Saraunsh published in Akola Lokmat on June 20, 2021
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20210620_7_2
https://www.lokmat.com/politics/how-can-congress-unite-a310/
Thursday, June 17, 2021
Editors View published in Online Lokmat on June 17, 2021
Corona Virus : आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण गरजेचे...
किरण अग्रवाल /
कोरोनाच्या संकटाने ज्या जीवित व वित्तहानीला सर्वांना सामोरे जावे लागले त्यातून आपण अजूनही सावरलेलो नाहीत, किंबहुना सावरणे अवघडच ठरावे इतके मोठे ते नुकसान आहे; अश्यात तिसऱ्या संभाव्य लाटेची धास्ती कायम असल्याचे पाहता आरोग्य व्यवस्थांकडे प्राधान्याने लक्ष पुरवून त्या बळकट करणे गरजेचे बनले आहे. यातही सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न हाताळताना कोरोनामुळे व्यक्ती, कुटुंबे व एकूणच समाजावर झालेला आघात बघता यापुढील काळात मोठ्या प्रमाणात पुढे येऊ शकणाऱ्या मानसिक आजाराच्या समस्येचाही विचार होणे अपेक्षित आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याची चिन्हे पहाता आतापर्यंत लावले गेलेले निर्बंध हळूहळू शिथील केले जात आहेत. उद्योग, व्यवसाय, व्यवहार देखील अनलॉक होत असून जनजीवन पूर्वपदावर येत असल्याने आरोग्य यंत्रणेनेही सुस्कारा सोडला आहे; पण निर्धास्त होता येऊ नये अशी ही वेळ आहे. उलट कोरोनाच्या संकटाने आरोग्य व्यवस्थेतील ज्या उणीवा निदर्शनास येऊन गेल्या आहेत त्या दूर करून संभाव्य तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्याच्यादृष्टीने सिद्ध होणे गरजेचे आहे. यासंदर्भात सरकार कडून अलीकडेच उपलब्ध झालेल्या आरोग्य सेवेबाबतची आकडेवारी पुरेशी बोलकी व मार्गदर्शकही ठरावी. ग्रामीण भागात असणारी बावन्न टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्या अपुऱ्या आरोग्य सेवेवर विसंबून असल्याचे ही आकडेवारी सांगते. लोकसंख्येच्या प्रमाणात ग्रामीण भागात राज्यामध्ये 14 हजारावर आरोग्य उपकेंद्रे असायला हवीत, पण प्रत्यक्षात ती दहा हजारांच्या आसपास आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्याही कमीच आहे. ग्रामीण आरोग्य केंद्रांमधील हजारो पदेही रिक्त आहेत. अशा स्थितीत खरेच कोरोनाची तिसरी लाट आली व सांगितले जाते आहे तशी ती अधिक उत्पातकारी असली तर कसे व्हायचे, असा प्रश्न आहे.
----------------
खरे तर आपल्याकडील आरोग्याबाबतची अनास्था अशी की जीडीपीच्या अवघ्या दीड-दोन टक्क्यांपेक्षा अधिक खर्च आरोग्यावर केला जात नाही. भारतातील आरोग्य समस्यांवर आपल्या फाऊंडेशनच्या माध्यमातून खर्च करणारे मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स यांनीही मागे या तुटपुंज्या खर्चावर चिंता व्यक्त केली होती. अर्थात आरोग्य ही खूप मोठी संकल्पना आहे, त्यात शारीरिक आरोग्य हाच विषय घेतला तरी कुपोषण व बालमृत्यू रोखण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही अपेक्षित उद्दिष्ट साधता येत नसल्याचे वेळोवेळी स्पष्ट होऊन गेले आहे. तो मुद्दा बाजूस ठेवून साध्या ग्रामीण भागातील आरोग्य सेवांकडे लक्ष दिले तरी कोरोनाने किती धावपळ उडविली ते लक्षात यावे. तेव्हा कोरोनाची लाट ओसरत असली तरी ती पुन्हा येणार असल्याची शक्यता लक्षात घेता या काळात आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी साधन सुविधांसोबतच रिक्त पदे भरण्याबाबत प्राथमिकतेने प्रयत्न होणे गरजेचे आहे.
----------------
महत्त्वाचे म्हणजे आगामी काळात मानसिक आरोग्याच्या समस्यांना मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. अनेक कुटुंबातील कमावते, कर्ते पुरुष कोरोनाने हिरावून घेतल्याने महिला - मुलांवर उदरनिर्वाह चालवण्याचा मानसिक ताण आला आहे. अनेकांचे व्यवसाय ठप्प पडल्याने ते विवंचनेत आहेत, तर नोकऱ्यांना मुकावे लागलेले चिंताग्रस्त आहेत. संसाराचे व उदरनिर्वाहाचे सोडा, मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था देखील डळमळली आहे. विस्कळीत झालेले वा मोडून पडलेले हे सारे सुरळीत करायचे अगर पुन्हा उभारायचे तर ते साधे, सोपे काम नाही. त्याचा ताण घेऊन असंख्य लोक आज वावरत आहेत. शाळकरी मुलांपासून आयुष्याच्या उतरंडीवर असलेल्यापर्यंत साऱ्यांचाच या तणावग्रस्तांमध्ये समावेश आहे. यातूनच मानसिक आरोग्याच्या समस्या वाढण्याची शक्यता आहे. तेव्हा सार्वजनिक आरोग्याचा विचार करताना याहीबाबतीत गांभीर्याने विचार होणे अपेक्षित आहे. अनलॉक झाले म्हणून पुन्हा व्यवसाय व राजकारणाकडे वळताना आरोग्य सारख्या बाबीकडे पुन्हा दुर्लक्ष होऊ नये इतकेच.
https://www.lokmat.com/editorial/health-system-needs-be-strengthened-a309/
Monday, June 14, 2021
कादंबरीकार पुष्पराज गावंडे : लोकमत भेट
June 13, 2021
कादंबरीकार पुष्पराज गावंडे : लोकमत भेट
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे नवनियुक्त सदस्य तथा पहिल्या अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ कादंबरीकार पुष्पराज गावंडे यांनी आज लोकमत कार्यालयात येऊन त्यांची 'यलाई' कादंबरी भेट दिली. सुमारे दहा वर्षांपूर्वी, म्हणजे 2009 मध्ये त्यांनी लोकमतमध्ये 'काळी माती पांढरं सोनं' हा स्तंभ लिहिला होता अशी आठवण या निमित्ताने माझे सहकारी राजू चिमणकर यांनी करून दिली.
कोरोना काळात राज्यातील विद्यार्थ्यांसाठी रेडीओ खंडाळा उपक्रम राबविलेले जिल्हा परिषद शाळेतील उपक्रमशील शिक्षक तुलसीदास खिरोडकर हेदेखील त्यांच्यासमवेत होते.
साहित्य व पत्रकारिता अशा विविध विषयांवर गप्पा मारताना अकोल्यातील साहित्य चळवळीची धडपड गावंडे यांनी निदर्शनास आणून दिली.
या चळवळीला लोकमतचे नेहमीच पाठबळ लाभत आले आहे, यापुढेही ते राहीलच...
#AkolaLokmat
Saraunsh published in Akola Lokmat on June 13, 2021
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20210613_7_6
https://www.lokmat.com/manthan/signs-cleanliness-fund-itself-a310/
Sunday, June 13, 2021
EditorsView published in Online Lokmat on June 10, 2021
कौटुंबिक स्वास्थ्य जपण्याची गरज...
किरण अग्रवाल /
कोरोनाच्या संकटाने सार्वजनिक जीवन अस्ताव्यस्त करून प्रत्येकाच्या मनात भीती पेरून ठेवली आहेच, शिवाय या आजाराने व्यवहार व वर्तना सोबतच जगण्याची परिमाणेसुद्धा बदलून ठेवली आहेत. याकाळात लॉकडाउनला सामोरे जावे लागल्याने अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसून गेला असतानाच दीर्घकाळ घरात बसून रहावे लागल्याने काही कुटुंबात प्रापंचिक कलह उद्भवल्याचीही उदाहरणे समोर येत आहेत. कोरोनाचा इवलासा विषाणू किती पातळीवर त्रासदायी ठरला आहे, हेच यातून अधोरेखित व्हावे.
जगणे सोपे वा सुसह्य करण्यासाठी सकारात्मकतेचा म्हणजेच पॉझिटिव्ह राहण्याचा सल्ला दिला जात असतो, पण कोरोना चाचणीच्या संदर्भाने पॉझिटिव्ह अहवाल आला की भीतीची छाया गडद होऊन जाणे स्वाभाविक ठरते. आताही कोरोनाची दुसरी लाट ओसरतांना दिसत असली तरी, संभाव्य तिसऱ्या लाटेच्या होत असलेल्या चर्चा पाहता सकारात्मकता कशी बाणवावी हा प्रश्नच ठरावा. अर्थात असे असले तरी या संकट काळातही काही गोष्टींकडे पॉझिटिव्हपणे पाहता यावे असे नक्कीच आहे. व्यापार-उदीमाच्या दृष्टीने मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागले, विशेषतः हातावर पोट असणाऱ्यांचे तर खूपच हाल झाले. पोटाला चिमटा घेऊन राहण्याची वेळ अनेकांवर आली, बहुतेकांचे अर्थकारण कोलमडले हे खरेच, परंतु एरवी कामाच्या व्यापात व धकाधकीच्या रहाटगाडग्यात कुटुंबाकडे लक्ष देऊ न शकणाऱ्याना लॉकडाऊनमुळे सक्तीने घरात बसावे लागल्याने कुटुंबीयांसोबत वेळ घालवता आला याकडे सकारात्मकतेनेच पाहता यावे. अर्थात याची दुसरी बाजूही आता समोर येते आहे, जी निगेटिव्ह म्हणता येईल.
-------------
संसार आला तिथे भांड्याला भांडे लागणे आलेच, परंतु लॉकडाऊनच्या काळातील वाद विकोपाला गेल्याची व त्यातून काडीमोडपर्यंत प्रकरणे पोहोचल्याची उदाहरणे पाहता कोरोनाचा कौटुंबिक सौख्याच्या पातळीवरील फटका समोर येऊन गेला आहे. लॉकडाऊनमुळे घरात बसावे लागलेल्या व हाताचे काम सुटलेल्या कमावत्या व्यक्तीची घरातील चिडचिड वाढल्यामुळे वैवाहिक जीवनात कलहाला प्रारंभ होऊन गेल्याच्या तक्रारी आहेत. घरात अधिक वेळ घालवावा लागलेल्या पुरुषांकडून खाण्या पिण्याबाबत नित्य नव्या फर्माईशी वाढल्यानेही या कलहात भर पडल्याची उदाहरणे आहेत. बाहेर पडण्यावर बंधने आल्यामुळे मोबाईलवरील संभाषण वाढले, त्यामुळे कुटुंबाकडे लक्ष द्यायचे सोडून पत्नी मोबाईलवरच जास्त बोलत बसते म्हणून कुटुंबात वाद झाल्याच्याही तक्रारी जागोजागच्या पोलीस खात्याअंतर्गतच्या भरोसा सेलकडे आल्याच्या नोंदी आहेत. विशेष म्हणजे कडक निर्बंधाच्या काळात सर्वच व्यवसाय बंद होते, यात दारूची दुकानेही बंद असताना दारू पिऊन वाद घातला गेल्याच्या किंवा मारहाणीच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आल्याचे आढळून येते. अशी उदाहरणे अनेक व त्यामागील कारणे विविध असली तरी कोरोनाने अर्थकारणाव्यतिरिक्त अपवादात्मक संख्येत का असेना, परंतु कौटुंबिक स्वास्थ्यालाही कशी हानी पोहोचवली आहे तेच स्पष्ट व्हावे. तेव्हा कोरोनाचे संकट मोठे असले व त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरे जावे लागत असले तरी कौटुंबिक स्वास्थ्य जपण्याच्यादृष्टीने विचार व वर्तनाने पॉझिटिव्ह होऊया इतकेच यानिमित्ताने.
https://www.lokmat.com/editorial/need-take-care-family-health-amid-corona-crisis-a584/
Monday, June 7, 2021
Kiran Digital Cartoon ..
4 जून 2021 रोजी ९:५६ AM वाजता ·
कला कोणतीही असो, ती आनंद देणारी तर असतेच शिवाय जगण्याचे साधनही ठरते. ती कलाकाराला स्वस्थ बसू देत नाही.
नाशिक जिल्ह्याच्या वनसगाव मधील प्रणव सातभाई या युवा कलाकाराचेही तसेच झाले म्हणायचे. एसवाय ला असलेल्या मास मीडियाच्या या युवकाला फोटोग्राफीत करिअर करायचे आहे, तो त्याचा आवडता छंद; पण कोरोना व लॉकडाउनच्या काळात तो घरात बसल्या बसल्या डिजिटल पेंटिंगकडे वळला व गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत सुमारे चारशेहून अधिक व्यक्तिरेखांचे पेंटिंग त्याने साकारले. शरद पवार, राज ठाकरे या राजकीय नेत्यांपासून ते आशाताई भोसले, नाना पाटेकर आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा यात समावेश आहे.
संकटाच्या, निराशेच्या मर्यादा कलेच्या आड येत नाहीत, हेच प्रणवनेही दाखवून दिले आहे. आता तर त्याला चक्क विदेशातूनही ऑफर्स यायला लागल्या हे आनंददायी आहे.
Keep it up Pranav... God bless you Dear
कोकरे आनंदली...
३० मे रोजी ४:४९ PM वाजता · नाशिक ·
कोकरे आनंदली...
अकोल्यात गेल्यानंतर सुमारे महिनाभराने आज रजा घेऊन घरी म्हणजे नाशकात आलोय. दोन्ही कोकरं जाम खुश आहेत, आल्या आल्या बिलगलीत.
त्यांना सोडून इतके दिवस बाहेर कधी गेलो नव्हतो. मागे दहा वर्षांपूर्वी पश्चिम बंगाल मधील लोकसभा निवडणुका कव्हर करायला गेलो होतो, परंतु तेव्हा तो दौरा पंधरा-वीस दिवसांचाच होता. त्यामुळे कौटुंबिक डिस्टंसिंगचा हाच आजवरचा दिर्घ कालावधी.
आईची आठवण आली यानिमित्ताने. नाशकात असतांना उशिरा जरी ऑफिसवरून येत असलो तरी मी आल्यावर ती मध्यरात्री उठून दोन घटका माझ्यासोबत घालवून, बोलून मग पुन्हा झोपायला जायची. तीच माया लेकींची. आईची उणीव त्या भरून काढताहेत. मी अकोल्यात गेल्यापासून रोज दोन्हीवेळच्या डब्यात काय भाजी आली, डबा पूर्ण खाल्ला ना; याचा अहवाल घेतल्याशिवाय त्यांचा दिवस संपत नाही.
लेकींमध्ये आईचे वात्सल्य, बहिणीची माया, पत्नीचे प्रेम, मैत्रिणीचा हट्ट ... असे सारे काही एकवटलेले असते; ते असे. म्हणूनच म्हणतो...
माझ्या लेकी, माझा अभिमान...
#ShrutiKruti #KirananandNashik
Saraunsh published in Akola Lokmat on June 06, 2021
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20210606_8_1
https://www.lokmat.com/manthan/how-get-rid-bipedal-flies-a310/
EditorsView published in Online Lokmat on June 03, 2021
coronavirus ;निर्बंधात शिथिलता, पण निग्रह कायम हवा...
किरण अग्रवाल /
कोरोना प्रतिबंधासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधात काही ठिकाणी शिथीलता देण्यात आली याचा अर्थ संकट टळले आहे असे अजिबात नाही. संकटाची तलवार आपल्या शिरी लटकलेली आहेच, त्यामुळे निर्बंध शिथिल केले गेले असले तरी मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनमध्ये 15 जूनपर्यंत वाढ केलेली आहे हे विसरता येऊ नये; परंतु दुर्दैवाने कोरोना जणू संपला अशा अविर्भावात खबरदारीकडे दुर्लक्ष होताना दिसत असेल तर अवघड आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे हे खरेच, पण म्हणून अनिर्बंधपणे वागले व वावरले जाणार असेल तर तिसऱ्या लाटेला थोपवता येणे मुश्किलच ठरावे.
कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात 1 जून पर्यंत घोषित करण्यात आलेला लॉकडाउन यापुढे 15 जूनपर्यंत वाढविण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे, पण तसे करतांना ज्या जिल्ह्यांमधील कोरोनाच्या पॉझिटिव्हिटीचा रेट दहा टक्क्यांपेक्षा कमी आहे, या जिल्ह्यातील आवश्यक वस्तू व सेवांची एकल दुकाने दुपारी दोन वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगीही देण्यात आली आहे; म्हणजेच अशा जिल्ह्यांमध्ये काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मुंबई, नागपूर, औरंगाबाद, नाशिकसह जळगाव, गोंदिया, नांदेड, धुळे, जालना, यवतमाळ, सोलापूर, बुलडाणा आदी जिल्ह्यांचा यात समावेश आहे. निर्बंध शिथिल झाल्यामुळे या जिल्ह्यातील बाजारांमध्ये चैतन्य दिसून आले. लॉक डाऊनमुळे अर्थ व्यवस्था कोलमडली आहे, तिला या शिथिलतेमुळे काहीशी चालना मिळेल हे खरे, परंतु ज्या अनिर्बंधपणे पूर्ववत सारे सुरू झालेले दिसत आहे ते पुन्हा धोक्याला निमंत्रणच देणारे ठरण्याची भीती आहे. लॉक डाऊन मध्ये शिथिलता देण्यात आली असली तरी त्यात काही नियम आहेत, त्या नियमांना हरताळ फासला जात असल्याचे पहावयास मिळते. फिजिकल डिस्टंसिंग राखण्याचे कसलेही भान न बाळगता लोकांनी बाजारांमध्ये गर्दी करीत आहेत, ही गर्दी संसर्गाला कारणीभूत ठरू शकणारी असून ज्या जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट हा दहा टक्क्यांच्या आत असला तरी काठावर म्हणजे 9 च्या जवळपास आहे तो यामुळे वाढावयास वेळ लागणार नाही. तसे झाले तर पुन्हा या जिल्ह्यांना कठोर निर्बंधांना सामोरे जावे लागू शकते, तेव्हा नियम पाळण्याबाबत काळजी घेण्याचा निग्रह गरजेचा आहे.
----------------
महत्वाचे म्हणजे, तिसऱ्या लाटेचा धोका लहान मुलांना अधिक सांगितला जातो आहे, अर्थात या बद्दलही जाणकार किंवा तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत हा भाग वेगळा; परंतु अहमदनगर सारख्या जिल्ह्यात गेल्या मे महिन्यात सुमारे दहा हजार मुले कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलीत, जो आकडा एप्रिल महिन्यापेक्षा अधिक असल्याचे पाहता मुलांना असलेल्या धोक्याची खात्री पटावी. राज्याच्या अन्य भागातही लहान मुलांचे बाधित होण्याचे प्रमाण काहीसे वाढताना दिसत आहे, पण असे असताना त्यांच्याबाबत जी काळजी घ्यायला हवी ती घेतली जाताना दिसत नाही. आता काही ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात आल्यावर कुटुंबच्या कुटुंब बाजारासाठी बाहेर पडत आहेत त्यात गरज नसताना लहान मुलांना सोबत घेतले जात आहे. यातही अनेक ठिकाणी ही लहान मुले मास्क विना बाजारात व गर्दीत फिरत असल्याचे आढळून येते. दुसरे म्हणजे कुटुंब घरात टीव्ही समोर बसून असताना घरातील लहान मुले मात्र गल्लीत एकत्र येऊन पूर्वीप्रमाणे गप्पा गोष्टीत किंवा खेळण्यात रमलेली दिसून येतात, ही बाब संसर्गाला निमंत्रण देणारीच ठरावी. याबाबत पालकांनीच काळजी घेणे गरजेचे बनले आहे.
--------------
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पहिल्यापेक्षा अधिक फटका दिला आहे. अर्थकारण तर ढासळले आहेच, परंतु जवळपास प्रत्येक कुटुंबालाच कुण्या न कुण्या प्रिय व्यक्तीला गमावल्याच्या दुःखाला सामोरे जावे लागले आहे. या दुःखासह व प्रचंड भीतीच्या वातावरणात यापुढची वाटचाल करायची आहे, कोलमडून पडलेले सारे काही सावरायचे आहे. त्यासाठी बेफिकीर राहून चालणार नाही. अधिक नुकसान होऊ नये व सामान्यांची अडचण टाळण्यासाठी शासनाने काही ठिकाणी निर्बंधात शिथिलता आणली असली तरी, मी जबाबदार बनूनच वागायला अगर वावरायला हवे. कामाखेरीज बाहेर पडायला नको किंवा किरकोळ कामासाठी संपूर्ण कुटुंबाने बाजारात जाण्याची गरज नाही; बाहेर जावे लागले तरी मास्कचा वापर व फिजिकल डिस्टन्स राखणे... या खरे तर अतिशय साध्या गोष्टी, त्या समोरच्याकडून पाळल्या जाणार नसतील तर आपण त्याला आठवण व जाणीव करून द्यायला हवी; कारण हे संकट एकट्या-दुकट्यावरचे नाही तर सर्वांवरचे आहे. त्यामुळे ते परतवून लावण्यासाठी शासनाने घालून दिलेले नियम व निर्देश पाळण्याचा आग्रह धरूया.
https://www.lokmat.com/editorial/coronavirus-restraint-relaxation-restraint-should-be-maintained-a301/
Saraunsh published in Akola Lokmat on May 30, 2021
http://epaper.lokmat.com/main-editions/Akola%20Main/2021-05-30/8
https://www.lokmat.com/manthan/mayor-commissioner-sir-will-you-take-streets-and-see-condition-people-a310/
Subscribe to:
Posts (Atom)