Wednesday, December 1, 2021

नवनिर्मितीचा आरंभ व आनंद ...

Nov 24, 2021 नवनिर्मितीचा आरंभ व आनंद ... लोकमत अकोला आवृत्तीच्या उत्सव / आरंभ दिवाळी अंकाचे वितरण मोठ्या उत्साहात सुरू आहे. लोकमतचा 'दीपोत्सव' हा मराठी मनांची जागतिक पातळीवरील स्पंदने टिपणारा व तसे विषय कवेत घेणारा कार्पोरेट अंक, तर स्थानिक विषय व्यक्ती व संस्थांना सामावून घेणारा उत्सव / आरंभ हा अंक. अर्थात, कोरोनाच्या मोठ्या संकटातून आपण सर्व जात असल्याने कसल्या नवीन कामाचा आरंभ सोपा नव्हताच. पण घेतली उडी, त्यामागे होते व्यवस्थापनाचे व संपादकीय संचालक करणबाबूजी दर्डा या तरुण नेतृत्वाचे भक्कम पाठबळ आणि प्रेरणादायी ऊर्जा, समूह संपादक श्री विजय बाविस्कर सर, प्रॉडक्ट् हेड श्री पुष्कर कुलकर्णीजी यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन आणि जोडीला टीमवरील विश्वास. आरंभातच तो विश्वास सर्व सहकारींनी सार्थ ठरवला याचा अभिमान आहे. ****
कोणत्याही प्रमुखासाठी महत्वाचे असते ते त्याच्या टीमचे सहकार्य व दिलेल्या उद्दिष्टांच्या पुर्तीसाठीची प्रामाणिक धडपड. अकोल्याचे हॅलो हेड, उप वृत्तसंपादक राजेश शेगोकार, वाशिमचे नंदकिशोर नारे, बुलडाण्याचे निलेश जोशी व खामगावचे सदानंद शिरसाट यांच्या नेतृत्वात टीमने परिश्रमाने गणित जुळवून आणले. राजरत्न शिरसाठ, संतोष येलकर, सचिन राऊत, प्रवीण खेते, संतोष वानखडे, दादाराव गायकवाड, सुनील काकडे, अनिल गवई, ब्रह्मानंद जाधव, सागर कुटे, अतुल जैस्वाल, भगवान वानखडे आदींनी उल्लेखनीय सहभाग नोंदविला. साहित्यिक जाण असलेल्या राजू चिमणकर यांनी मजकुराच्या संपादनाची, तर संजय वाळके यांनी मुद्रितशोधनाची जबाबदारी यथार्थपणे पेलेली. ****
विशेष म्हणजे, या अंकासाठी ग्रामीण भागात जिथे जिथे दौर्‍यावर गेलो त्या त्या ठिकाणच्या वार्ताहरांनी भेटता क्षणी मजकूर व जाहिरातींचे देकार दिलेत. अकोटचे विजय शिंदे यांनी तर अकोटचा खराब रस्ता पाहता तब्येतीला त्रास नको म्हणून स्वतःहून फोन करून 'दौऱ्यावर येण्याची गरज नाही, आपला शब्द खाली पडू देणार नाही' असे सुरुवातीलाच आश्वासित केले आणि खरेच अपेक्षेपेक्षा अधिकची मेहनत घेतली. कारंजाचे प्रफुल बाणगावकार, देऊळगाव राजाचे गजानन तिडके, चिखलीचे सुधीर चेके पाटील, मंगरूळ पीरचे नंदलाल पवार, रिसोडचे निनाद देशमुख, मलकापूरचे हनुमान जगताप, सिंदखेडचे मुकुंद पाठक, खामगावचे गजानन राऊत आदीसह प्रशांत विखे, दत्ता उमाळे, शितल धांडे, माणिक डेरे, नानासाहेब कांदळकर, जयदेव वानखडे, बाजीराव वाघ, किशोर खैरे, निलेश वाघमारे, विवेकानंद ठाकरे, अनिल देशमुख, रहेमान नोरंगाबादी, राजू लांडे आदी अनेकांच्या परिश्रमाने अंक पूर्णत्वास गेला. लोकमत समाचारचे वृत्तसंपादक अरुण कुमार सिन्हा जी, गजानन अवस्थी, खामगावचे फारुखभाईही मदतीसाठी सरसावले. ****
जाहिरात विभागाचे प्रमुख राजेश पांडे, एक्झिक्युटिव्ह संदीप दिवेकर, गंगाधर राऊत, सुरेश डहाके, कोतेगावकर, धनंजय पाटील, मिरगे, प्रताप शिरसाट यांनीही सातत्यपूर्वक पाठपुरावा करून अंकाच्या निर्मितीसाठी परिश्रम घेतले. सचिन बाणाईत, आकाश ताकवाले, गवारे, दीक्षित आदींनी अंकाची मांडणी छान करून दिली. अर्थातच, या साऱ्या खटाटोपाच्या मागे युनिट हेड श्री आलोक कुमार शर्मा यांच्या मधाळ व आश्वासक कार्यशैलीचे बळ महत्वाचे ठरले, हे वेगळे सांगण्याची गरज नसावी. महत्त्वाचे म्हणजे, कोरोनातून बाहेर पडून उद्योग व्यवसायाचा नव्याने आरंभ करताना सर्व जाहिरातदार, हितचिंतकांनीही सहकार्याचा हात पुढे केला, त्यामूळेच हा रथ ओढला गेला. **** अंक आला, आरंभ छान झाला म्हणून कौतुकही होत आहे, पण त्यामागे या साऱ्यांचे व अन्यही अनेकांचे परीश्रम, सहकार्य आहे, हे कसे विसरता यावे म्हणून ही कृतज्ञता. Proud n Love you Team... Jai Lokmat #LokmatAkola #KiranAgrawalLokmat #AarambhDiwali2021

No comments:

Post a Comment