Tuesday, December 28, 2021

आणखी काय हवे? ...

Dec 28, 2021 आणखी काय हवे? ...
खुर्चीतला माणूस बदलला व त्याची जागाही बदलली, की माणसं व मित्रही दूर होतात असा अनेकांचा अनुभव आहे. पण मी अपवाद ठरलो म्हणायचे. यंदा गाव बदलले, नव्या मित्रांची भर पडली; नव्या जुन्या अशा आपण साऱ्यांनी मिळून वाढदिवसानिमित्त शुभेच्छांची बरसात केली. मागे पन्नाशी गाठली तेव्हा लिहिले होते, की आता कसला वाढदिवस; आता काढदिवस. परंतु आपल्या स्नेह शुभेच्छांत कसलीही कमतरता राहात नाही. त्यातूनच तर लाभून जातो नवा उत्साह, नवी ऊर्जा. एक दिवस आधीच सुरू झालेला अग्रिम शुभेच्छांपासूनचा सिलसिला कालचा दिवस उलटून गेला तरी आजही सुरूच आहे. हा स्नेह व या प्रेमाखेरीज आणखी काय हवे? तेच माझे बळ व तीच माझी प्रेरणा... हे बळ यापुढेही कायम लाभेल असा विश्वास आहे. धन्यवाद म्हणून औपचारिकपणा कसा करू? अनेक मित्रांचे फोन घेऊ शकलो नाही, सर्वांच्याच शुभेच्छा संदेशांना उत्तरही देऊ शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व. स्नेह आहेच, यापुढेही तो कायम राखूया...
#KiranAgrawal #kiranAgrawalBirthDay2021

No comments:

Post a Comment