Sunday, December 26, 2021

बळीराजाची बळीराणी ....

Dec 26, 2021 बळीराजाची बळीराणी ....
आकोट मधील शिक्षिका लता बहाकर यांनी लिहिलेल्या 'बळीराणी' कादंबरीचे प्रकाशन पद्मश्री नामदेव कांबळे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भुषवायला मिळाले. बळीराजाच्या दुःख दैन्याची चर्चा साहित्यात दिसते, मात्र त्याचा कणा असलेल्या त्याच्या सहचारिणीची फारशी दखल घेतली गेलेली दिसत नाही. पुरुषप्रधानतेतून ओढवलेले हे दुर्लक्ष आहे. कृषी संस्कृतीत आपल्या कष्टाने, घामाने, धीराने बळीराजाची पाठराखण करणारी राणी 'बळीराणी'मधून मांडली गेली आहे. साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य पुष्पराज गावंडे, यवतमाळचे प्रख्यात गझलकार प्रा. विनय मिरासे, साहित्यिका प्रा. डॉ. अनघा सोनखासकर, युवा लेखक उमेश अलोणे, प्रा. गजानन दांदळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अकोट सारख्या तालुक्याच्या ठिकाणी पुस्तक प्रकाशन समारंभाला लाभलेली व आभार प्रदर्शनपर्यंत टिकून असलेली रसिक, श्रोत्यांची गर्दी भारावून टाकणारी होती. उपक्रमशील शिक्षक तुळशीदास खिरोडकर, पत्रकार राजू चिमणकर, दिगंबर खडसे, विनोद तळोकार, निलेश कवडे, अनिल बहाकर यांच्या नीटनेटक्या संयोजन कुशलतेतून हा कार्यक्रम घडून आला.
#Balirani #Aakot #PadmashriKamble #KiranAgrawal

No comments:

Post a Comment