Friday, December 31, 2021

अभिनंदन मित्रा, अभिमान आहे आपला...

Dec 30, 2021 अभिनंदन मित्रा, अभिमान आहे आपला...
कधीकधी काय योग जुळून येतो बघा, लोकमत नाशिक मधील माझे सहकारी, उप वृत्तसंपादक संजय वाघ यांनी लिहिलेल्या 'गाव मामाचं हरवलं' या बाल कवितासंग्रहाच्या प्रकाशनास मी गेलो होतो, ती तीन वर्षांपूर्वीची आठवण आज फेसबुकने करून दिली म्हणून मी ती सकाळीच शेअर केली, आणि आजच काही वेळापूर्वी वार्ता आली की आमच्या संजय वाघ यांना साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार घोषित झाला. अतिशय आनंदाचा व अभिमानाचा हा क्षण आहे... पत्रकारिता करताना संवेदना जपणाऱ्या व विशेषतः बाल मनाशी संवाद साधणाऱ्या माझ्या या सहकार्‍याच्या अलीकडील 'जोकर बनला किंगमेकर' या कृतीस हा मानाचा पुरस्कार लाभला. खरेच मन अभिमानाने भरून आले... आमच्या संजय ने असेच उत्तरोत्तर कीर्तीवंत व्हावे याच सदिच्छा...

No comments:

Post a Comment