Friday, December 31, 2021

नव्या वाटेवरील जुना मित्र...

Dec 29, 2021 नव्या वाटेवरील जुना मित्र...
काही मित्र असे असतात ज्यांच्या धडपडीचे नेहमी कौतुक वाटत असते, त्यामुळे ते भेटले की मन अभिमानाने भरून येते. नाशिकचे माझे सन्मित्र योगेश पाटील विदर्भाच्या दौऱ्यावर असताना मुद्दाम भेटायला आले म्हटल्यावर तसेच झाले. योगेश जी म्हणजे हाती घेतलेले काम प्रामाणिकपणे व निष्ठेने तडीस नेणारे अतिशय धडपडी व्यक्तित्व. आपल्या हातून काहीतरी कोणाचे तरी कल्याण व्हावे या ध्यासातून झपाटलेला हा मित्र पुण्याच्या 'एमआयटी' सारख्या नामवंत संस्थेतून नाशिकला आला आणि त्याच्याशी मैत्र जुळले. शेतीत वेगवेगळे प्रयोग राबविणाऱ्या शेतकऱ्यांना तसेच ग्रामीण भागातील महिला बचत गटांना एकत्र करून ग्रामविकास साधण्यासाठी सुरू असलेले त्यांचे प्रयत्न मी पाहात आलो आहे. याच मालिकेत आता 'एमआयटी'च्या सरपंच संसदेचे प्रमुख समन्वयक म्हणून ते नवीन वाटेवर मार्गस्थ झाले आहेत. यासाठीच ते विदर्भ दौऱ्यावर होते. त्यांचे अमरावती विभाग समन्वयक अभय खेडकर, नाशिक विभागाचे संजय भाबर, अकोला जिल्ह्याचे गाढवे पाटील व वाशिम जिल्ह्याचे त्यांचे समन्वयक तथा माझे सहकारी प्रफुल्ल बानगावकर यांना सोबत घेऊन ते कार्यालयात आलेत. वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले व भरपूर गप्पाही झाल्या. खूप आनंद झाला त्यांच्या भेटीने. इतरांपेक्षा वेगळा विचार करून नवनिर्माणासाठी झटणाऱ्या विश्वनाथजी कराड यांच्या पावलावर पाऊल ठेवत नवी वीट रचू पाहणारे राहुल कराड यांच्या क्रियाशील नेतृत्वातील 'एमआयटी'ची सरपंच संसद नवा मार्ग प्रस्थापित करेल असा विश्वास आहे... त्यासाठी योगेश जी आपणास व आपल्या सर्व सहकारीना मनःपूर्वक शुभेच्छा... #KiranAgrawal #MITSarpanchSansad

No comments:

Post a Comment