Thursday, December 16, 2021

'लोकमत' सुवर्ण महोत्सव ...

15 डिसेंबर 1971... 'लोकमत'ची मातृशाखा असलेल्या नागपूर आवृत्तीला प्रारंभ झाला, त्याला आज तब्बल ५० वर्षे पूर्ण झालीत! पत्रकारिता परमो धर्म निभावत सत्य वाचकांसमोर मांडण्याचा संकल्प आजही तसाच आहे.
वाचकांच्या पाठबळावरील या गौरवशाली वाटचालीच्या सुवर्ण महोत्सव दिनी आज नागपुरात लोकमतचे संस्थापक श्रद्धेय बाबूजी जवाहरलालजी दर्डा यांना अभिवादन करीत पारिवारिक स्नेह मेळावा झाला. लोकमत समूहाचे चेअरमन मा. श्री विजयबाबूजी दर्डा यांनी वाचक हाच लोकमतचा मालक असल्याचा पुनरुच्चार करीत सर्व सहकाऱ्यांच्या पाठीवर प्रेरणादायी आशीर्वादाची थाप दिली. कार्यकारी संचालक, तरुण नेतृत्व श्री देवेंद्र बाबूजी दर्डा यांचीही उपस्थिती व त्यांच्याकडून आस्थेवाईकपणे केली गेलेली सर्वांची विचारपूस ऊर्जा देणारी होती.
लोकमतच्या 50 वर्षाच्या या वाटचालीत गेली सुमारे 30 वर्षे मला खारीची भूमिका निभावता आली याचा मला अभिमान आहे. नागपुरातील सुवर्ण महोत्सवी मेळाव्यानिमित्तची ही काही आनंदचित्रे ... समवेत अकोला लोकमत समाचारचे प्रभारी अरुणकुमार जी सिन्हा, अमरावतीचे संपादकीय प्रमुख गजानन चोपडे आदी सहकारी #LokmatNagpur #GoldenJubileeLokmat #KiranAgrawalLokmat

No comments:

Post a Comment