Thursday, January 27, 2022

क्षण हा भाग्याचा, अभिमानाचा...

Jan 26, 2022 क्षण हा भाग्याचा, अभिमानाचा...
देशभरात 'आझादी का अमृत महोत्सव' सुरू असताना या वर्षातील प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण करण्याचा मान मिळणे म्हणजे भाग्याचेच. ते भाग्य आज माझ्या वाट्यास आले याचा अतिव आनंद व अभिमानही आहे. नाशकातून अकोल्यात आल्यावर यंदा प्रथमच येथील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची व ध्वजवंदनाची संधी लाभली... विजयी विश्व तिरंगा प्यारा, झेंडा उंचा रहे हमारा ... लहानपणी शाळेत असतांना हाती तिरंगा झेंडा घेऊन प्रभात फेरीमधून घोषणा देत फिरण्याच्या आठवणी जाग्या झाल्या.
लोकमत अकोल्याच्या प्रशस्त हिरवळीवरील ध्वजारोहण तसेच लोकमतचे संस्थापक, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी श्रद्धेय बाबूजी, जवाहरलालजी दर्डा यांना अभिवादन प्रसंगी युनिट हेड श्री अलोक कुमार जी शर्मा, समाचारचे प्रभारी अरुण कुमार जी सिन्हा, जाहिरात विभागाचे राजेश पांडे, प्रशासनाचे रविंद्र येवतकर, संगणक विभागाचे शैलेश ऐंडे, उप वृत्तसंपादक राजेश शेगोकार आदि विभाग प्रमुखांसह सर्व सहकारी समवेतची ही आनंद चित्रे... ( छाया सौजन्य: प्रवीण ठाकरे )
#LokmatAkola #RepublicDay2022 #KiranAgrawal

No comments:

Post a Comment