Monday, January 10, 2022

सेवाश्रय ...

Jan 09, 2022 सेवाश्रय ...
स्व. सत्यनारायणजी रांदड यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या अकोल्यातील या संस्थेतर्फे अखंड दृष्टिदान सेवायज्ञ चालवला जात आहे. याअंतर्गत समाजातील दानशूरांच्या सहकार्यातून केल्या जाणाऱ्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियांची संख्या आता दहा हजारांच्या उंबरठ्यावर आहे. 'सेवाश्रय'चे विजय रांदड, एड. ईश्वर गट्टानी, विजय गोडा, मनोहर खंडेलवाल, श्यामसुंदर मालपाणी, नारायण भाला आदींचे यासाठी सुरू असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. अंधकारलेली वाट प्रकाशमान करण्याचे कार्य करणाऱ्या या संस्थेतर्फे आयोजित नेत्र चिकित्सा शिबीराच्या उद्घाटन कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून जाण्याचा योग आला. या कार्यक्रमाप्रसंगी माहेश्वरी समाज ट्रस्टचे अध्यक्ष श्री. रमेशचन्द्रजी चांडक, डॉ. मनीष हर्षे व सेवाश्रयच्या सेवार्थीसोबतची ही काही आनंद चित्रे...
#Sewashray #EyeChekup #KiranAgrawal

No comments:

Post a Comment