Thursday, January 13, 2022

स्वराज्य प्रेरिका, माँसाहेब जिजाऊंना त्रिवार वंदन...

Jan 12, 2022 स्वराज्य प्रेरिका, माँसाहेब जिजाऊंना त्रिवार वंदन...
बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना सिंदखेड राजा येथे राजमाता मासाहेबांच्या जन्मस्थळी भेट देऊन त्यांना वंदन केले. मातृतीर्थाच्या या मातीतच ममत्वासोबत वीर, शूरत्व जागवण्याचे सत्व आहे हे तेथे पाऊल ठेवताच अनुभवास येते. शाहिरांचे पोवाडे इतिहासाच्या गौरवशाली व रोमांचकारी स्मृती जागवतात, तद्वतच या मातीच्या गंधात मासाहेबांच्या अद्वितीय तसेच अतुलनीय शौर्य, संस्कार व प्रेरणेचा दरवळ आहे. लोकमतचे सहकारी मुकुंद पाठक व अन्य स्थानिक पत्रकारांसमवेत मासाहेबांचे दर्शन घेऊन त्यांच्या जन्मस्थळ विकासाची माहिती घेतली. आज जन्मदिनी मासाहेबांना त्रिवार मानाचा मुजरा...
#JijauJanmotsav #SindkhedRaja #KiranAgrawal

No comments:

Post a Comment