Thursday, January 27, 2022

अकोल्यातील कुटुंब कबिला...

Jan 26, 2022 अकोल्यातील कुटुंब कबिला...
वृत्तपत्रांचे काम 24×7 सुरूच असते. उसंत म्हणून कधी नसतेच. त्यामुळे रोजच्या कामाच्या धबडग्यात होणाऱ्या भेटी व चर्चा वगळता अवांतर गोष्टी करायला वेळच कुठे असतो? आज प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यालयास सुट्टी असल्याने उद्याचा अंक नसणार, त्यामुळे काहीशी निवांतता आहे. अर्थात, आमच्या भाषेत हा अल्पविराम. कारण पत्रकाराला कधी विराम नसतोच. त्यामुळे हीच संधी घेत ध्वजारोहणानंतर सर्व सहकारी एकत्र आलो. भाऊसाहेब तथा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील स्मृती केंद्रालाही भेट देऊन त्यांना वंदन केले, केंद्रातील माहिती घेतली. परिसर पाहता आला. यानिमित्ताने सहकाऱ्यांशी नेहमीच्या कामाव्यतिरिक्त बोलणे व फिरणे झाले, एकमेकांना अधिक जवळून जाणून घेता आले. गंमत म्हणजे किती तरी वर्षानंतर झोका घेता आला.. अनेकांनी तो घेऊन बघितला. मजा आली. हाच आमचा कुटुंबकबिला.
#LokmatAkola #kiranAgrawal

No comments:

Post a Comment