Wednesday, April 3, 2024

आनंद व ऊर्जादायी सायंकाळ !

March 16, 2024 आनंद व ऊर्जादायी सायंकाळ !
लोकमत अकोला आवृत्तीने 26 वर्षे पूर्ण करून 27व्या वर्षात पाऊल ठेवले, यानिमित्त आयोजित वर्धापन दिन सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून 'लोकमत'वर शुभेच्छांचा वर्षाव केला. 16 मार्चची ही सायंकाळ या भेटीगाठींनी आनंद व ऊर्जादायी ठरली. केवळ वाचक म्हणून नव्हे, तर एक कुटुंब म्हणून या सर्वांशी यातून नाते जुळले आहे. वाचकांचे निरंतर लाभत आलेले पाठबळ हीच लोकमतची खरी शक्ती आहे. लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजयबाबूजी दर्डा, एडिटर इन चीफ श्री राजेंद्रबाबूजी दर्डा तसेच लोकमतचे नेतृत्वकर्ती नवीन पिढीचे सर्वश्री. देवेन्द्रबाबूजी, ऋषीबाबूजी, करणबाबूजी दर्डा व संपूर्ण व्यवस्थापनानेही वाचकांच्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. धन्यवाद स्नेही वाचकांनो, ही साथ अशीच कायम असू द्या हीच विनंती.. याप्रसंगीची काही आनंदचित्रे...
#LokmatAkola #LokmatAkolaAnniversary2024 #KiranAgrawal

No comments:

Post a Comment