Wednesday, April 3, 2024

ऊर्जा शक्तीचा सन्मान...

March 08, 2024 ऊर्जा शक्तीचा सन्मान...
विविध क्षेत्रात आपल्या कार्यकुशलतेची पताका फडकविणाऱ्या भगिनींचा जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने प्रातिनिधिक स्वरूपात 'लोकमत'तर्फे सन्मान करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ सुचिता पाटेकर यांच्या मुख्य उपस्थितीत झालेल्या या सन्मान सोहळ्याप्रसंगी महिलांचे समाजातील स्थान, त्यांचे सक्षमीकरण व स्त्री पुरुष समानता आदी विषयावर छान परिचर्चाही रंगली. डॉ. उत्पला मुळावकर, डॉ. सीमा तायडे, कमलजीत कौर, विद्या गिरी, डॉ. उज्वला मापारी, डॉ. योजना डागा, अक्षया कोठाळे, डॉ. दिपाली काळे, स्नेहल ढवळे, डॉ रूपाली राठी, डॉ. पियुशा भागडे, रश्मी खडसान आदि भगिनी यात सहभागी झाल्या. #LokmatAkola #WomensDay2024 #KiranAgrawal

No comments:

Post a Comment