Wednesday, April 3, 2024

'जीवन गौरव'...

Feb. 25, 2024 'जीवन गौरव'...
खर तर जीवन म्हणजे खूप मोठा समुद्रच आहे. त्याची अथांगता न मोजता येणारी. सुख दुःख, विविध प्रसंग अन अनुभवांच्या अगणित लाटा झेलत एखाद्या खडकावर क्षणभर विसावावं तसा हा प्रवास. आली लाट की एखाद्या खडकावर आसरा घ्यायचा, आणि गेली लाट की पुन्हा पोहायला लागायचं; असंच तर सुरू आहे जीवन. त्यात मागे वळून बघितलं, तर जीवन अजून जगायचंच आहे असंच राहून राहून वाटतं. इतकं काही शिकायचं, करायचं, फिरायचं, अनुभवायचं राहून गेलं की त्याची जाणीव अस्वस्थ करून जाते. त्यामुळे आजवरच्या धकाधकीत गौरवा योग्य आपण काय केलं हा प्रश्नच पडतो. तथापि, शिक्षक साहित्य संघाच्या भावना व भूमिकेचा आदर करीत तेल्हारा येथील 8व्या शिक्षक साहित्य संमेलनात जीवनातला पहिला जीवनगौरव पुरस्कार प्रख्यात साहित्यिक, संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद देशमुख यांच्या हस्ते व डॉ. प्रतिमाताई इंगोले आदींच्या उपस्थितीत स्वीकारला. यापुढच्या उर्वरित जीवनात अधिक चांगले कार्य करण्यासाठीची प्रेरणा त्यातून नक्कीच मिळेल. धन्यवाद शिक्षक साहित्य संघ, जयदीप सोनखासकर, संघर्ष सावरकर, शिवराज जामोदे ... #KiranAgrawal

No comments:

Post a Comment