Wednesday, April 3, 2024

माणूसपण जागवूया...

Feb. 26, 2024 माणूसपण जागवूया...
सभ्यता व संस्कृतीच्या संवर्धनासाठी शिक्षण आणि साहित्य गरजेचे आहे. बालपणाच्या विद्यार्थी दशेपासून माणूस घडवण्याच्या प्रक्रियेत सहभागी असणारा शिक्षक हा घटक त्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. विद्यार्थी म्हणून शाळेत असताना प्रतिज्ञा म्हणवून घेतली जाते. 'भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. या देशातल्या समृद्धतेने व विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे...' या प्रतिज्ञेतील अभिमान वास्तवात रुजविण्याचा व संवेदना जपणारे माणूसपण जागविण्याचा प्रयत्न होणे गरजेचे आहे. कोरोना नंतरचे शिक्षण व एकूणच जीवनही बदलून गेले आहे. आता त्याहीपुढे जाऊन AI म्हणजे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे युग आले आहे. ते मोठे आव्हानात्मक असल्याने त्याला तोंड देताना संवेदना व माणुसकीच्या जपणूकीची गरज अधिक आहे... इति मुद्दे शिक्षण साहित्य संमेलनात मांडलेत. ****
महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि शिक्षक साहित्य संघ आयोजित आठवे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथे पार पडले. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त 'बारोमास'कार डॉ. सदानंद देशमुख यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या या संमेलनात प्रख्यात लोककवी 'तिफन'कार प्रा. डॉ. विठ्ठल वाघ, ज्येष्ठ साहित्यिका डॉ. प्रतिमा इंगोले, वऱ्हाडी बोलीचे अभ्यासक प्रा. डॉ. रावसाहेब काळे, साहित्य मंडळाचे सदस्य व कादंबरीकार पुष्पराज गावंडे, गीतकार प्रा. डॉ. गोविंद गायकी, हास्य अभिनेते किशोर बळी आदी मान्यवरांनी सहभाग नोंदविला, ज्यामुळे संमेलनाची उंची वाढली. या संमेलनाच्या समारोप सत्राचे अध्यक्षस्थान भूषविण्याची संधी मला लाभली. त्यानिमित्ताने शिक्षक व साहित्यिकांशी संवाद साधता आला. उपक्रमशील शिक्षक तुळशीदास खिरोडकर व सहकारी राजू चिमणकर प्रवासात सोबत असल्याने विविध विषयांवर छान गप्पा झाल्या. परतीच्या वाटेवर श्री वांगेश्वराचे दर्शनही झाले. Thanks to Jaydeep Sonkhaskar, Shivraje Jamode, Sangharsh Sawarkar and all.. #ShikshakSahityaSammelanTelhara #KiranAgrawal

No comments:

Post a Comment