Thursday, May 5, 2022

#SrilankaDiary03

#SrilankaDiary03 ...
श्रीलंकेत जाऊन सिगिरिया फोर्ट बघितला नाही तर काय उपयोग, असे म्हटले जाते. युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेजच्या यादीतील समुद्रसपाटीपासून 350 मीटर उंच असलेल्या या सिगिरिया फोर्टची चढाई विलक्षण होती. हजार पायऱ्या चढून टॉपला पोहोचलो की सारा निसर्ग कवेत घ्यायचा मोह आवरता येत नाही. या उंचावरून घेतलेली उडी ही थेट ढगातच उडी घेतल्यासारखी वाटते. हा फोर्ट दाखवणारे सर्व गाईडस प्रत्येकच पर्यटकाला येथे अशा उड्या मारायला लावून त्या उड्या कॅमेऱ्यात कैद करतात, त्याची वेगळीच गंमत वाटते.
राजा धतुसेनेचा पुत्र राजा कश्यप (AD 477 - 495) चा राज्यकारभार चालणाऱ्या या किल्ल्याला व तेथील गुहेला तब्बल 5,500 वर्षांचा ऐतिहासिक वारसा आहे. संरक्षणाच्या उपाययोजनांसह पाणी व्यवस्थापनाचा तत्कालीन उत्कृष्ट नमुना येथे बघावयास मिळतो, जो आश्चर्यचकित करून जातो. या फोर्टमध्येच, म्हणजे डोंगरातील गुहेत आपल्याकडील अजिंठा लेण्यातील कलाकुसरसारखे सेम टू सेम कलाकुसर आहे, पण अतिशय अल्प प्रमाणात. त्यापुढे आपले अजिंठा लई भारी वाटते. भल्यामोठ्या अभेद्द अशा दगडावर वसलेला हा किल्ला होता, याला लॉयन रॉक म्हणूनही ओळखले जाते. श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्याने चुकवू नये असा हा सिगिरिया फोर्ट आहे. #SrilankaTour #KiranAgrawal

No comments:

Post a Comment