Tuesday, May 24, 2022

चला माणूस होऊया ...

May 15, 2022 चला माणूस होऊया ...
आजच्या कम्युनिकेशनच्या 4जी, 6जी च्या युगातील भाषेत बोलायचे तर, बिस्किटांच्या 'पार्ले-जी' ची चव व मन अजूनही 'बच्चा है जी' ची जाणीव करून देणारे क्षण हाती लागतात तेव्हा कडक उन्हात आठवणींच्या शीतलहरी सुखावून गेल्याखेरीज राहत नाहीत. परवा असेच काही क्षण वाट्यास आले. निमित्त होते, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आयोजिलेल्या स्वानंद व्यक्तिमत्व विकास शिबिराच्या उद्घाटनाचे. यासाठी भारत विद्यालयात जाणे झाले व तेथील एका वर्गखोलीत सुमारे 70 / 80 विद्यार्थ्यांच्या ग्रुपसोबत बोलणे, बसणे झाले. व्यक्तिमत्व विकासाचे शिबीर असल्याने याबाबतचे औपचारिक भाषण व उद्घाटकीय उपचार पार पडल्यानंतर व्यासपीठ सोडून मुलांमध्येच बेंचवर जाऊन बसलो व छान गप्पा केल्या. शाळेतले दिवस परतून आल्याचा आनंद लाभला...
त्या काळीच नव्हे, तर आजही बहुसंख्य विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना हेच वाटते की आपली मुले डॉक्टर, इंजिनियर्स व्हावीत. आता सीए कडेही ओढा वाढला आहे. पण या व नोकरीकडे नेणाऱ्या शिक्षणाखेरीजही खूप मोठे आकाश आहे. विशेषतः कौशल्याधारित शिक्षण आज अधिक गरजेचे बनले आहे. ... आदी अनेक विषयांवर बोलताना एक आवर्जून सांगितले, आयुष्यात कोणत्याही विद्या शाखेकडे जा. काहीही बना, पण शिकतांना - जगतांना माणूस नक्की बना! कारण आज पैसे मोजून सर्व काही मिळतंय, ते मिळवण्याची हाव इतकी वाढली आहे की त्यासाठी धावताना माणसाची माणूसकीच सुटत चालली आहे. नसत्या भोंग्यांचा कर्णकर्कश्य दणदणाट त्यामुळेच वाढला आहे. म्हणूनच काहीसे विचित्र वाटेल आपल्याला, पण #चला_माणूस_होऊया ... पटतंय ना, हे आपल्यालाही मित्रांनो? #KiranAgrawal

No comments:

Post a Comment