Monday, May 30, 2022

वऱ्हाडी बोलीच्या दिंडीतला वारकरी...

May 29, 2022 वऱ्हाडी बोलीच्या दिंडीतला वारकरी...
मी बी तं वऱ्हाडीच हाव ना ब्वा ... माही माय जळगाव जामोदची. माह्या जलम बी तठलाच, मंग माह्या मायची जी भाषा, तीच माह्यी मायबोली; म्हनुन तं घेतली खांद्यावर तिची पालखी राजा...
महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य, कादंबरीकार पुष्पराज गावंडे यांच्या आवतनावरून अ. भा. वऱ्हाडी साहित्य मंच आयोजित चौथ्या अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य संमेलनात प्रमुख पाहुणा म्हणून जाण्याचा योग आला. आडनाव अग्रवाल असल्याने अनेकांना तर अगोदर मला मराठीच येते की नाही असा प्रश्न असतो, पण या संमेलनात वऱ्हाडीत थोडं बोललो. व्यासपीठावरील मान्यवरांनी व व्यासपीठावरून खाली उतरल्यावर उपस्थितांमधीलही अनेकांनी याचे कौतुक केले... वऱ्हाडी बोलीला लाभलेल्या लय व तिच्या प्रवाहीपणाबद्दल बोलताना यातील म्हणी तसेच शिव्यांची समृद्धताही मांडली. बोलू वऱ्हाडी, लिहू वऱ्हाडी.. या घोषवाक्यात श्वास वऱ्हाडी असेही नमूद करण्याची व शाळा-शाळांमध्ये वऱ्हाडी शब्दांची प्रदर्शने भरविण्याची सुचना यावेळी केली.
संमेलनाच्या अध्यक्षस्थानी संत साहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. राजेश मिरगे होते, तर उद्घाटक डॉ. सतीश तराळ होते. व्यासपीठावर माऊली ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दादा पाटील, स्वागताध्यक्ष विनायक भारंबे, पुष्पराज भाऊ, श्याम ठक, नितीन वरणकार आदी मान्यवर समवेत होते. उपक्रमशील शिक्षक तुळशीदास खिरोळकर व आमचे सहकारी राजू चिमणकर यांच्यासह प्रवासातही गप्पा झाल्या. रविवार छान गेला...
#VarhadiSammelan #KiranAgrawal

No comments:

Post a Comment