Sunday, May 8, 2022

#SrilankaDiary05 ...

#SrilankaDiary05 ...
कोलंबोतील पेट्टा मार्केट छान अशा तळ्याकाठी वसले आहे. या मार्केटमध्ये आता फारशी दुकाने राहिलेली नाहीत, पण केवळ निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटक तेथे जातात. दुकाने नाहीत म्हणून तळ्याचे सौंदर्य लोपले आहे असे तेथे झालेले नाही. श्रीलंकेत इतरही खूप बघितले, मनसोक्त भटकलो... निसर्ग कवेत घेण्याचा बालिश प्रयत्न तर करून बघितलाच, फिशर मॅनच्या मदतीने समुद्रातील मासे पकडण्याचाही प्रयत्न केला. मजा आली.
श्रीलंका चहाच्या उत्पादनासाठीही मशहूर आहे म्हणून एका चहा उत्पादक कारखान्याला भेट देऊन उत्पादन प्रक्रिया समजून घेतली. मी चहा घेत नाही असे सांगितल्यावर संबंधितांचा चेहरा काहीसा उतरला, पण कंपनीच्या ब्रँडिंगसाठी चहाचा कप हाती घेऊन फोटो काढण्याची त्यांनी विनंती केली आणि मलाही तो मोह टाळता आला नाही. यापुढे जे कुणी भारतीय पर्यटक तेथे भेट देतील त्यांना माझा फोटो दाखविला जाणार आहे. (हे म्हणजे, चहा न घेणाऱ्याकडून चहाचे ब्रँडिंग; आहे की नाही गंमत)
विशेष म्हणजे, तेथील राजकीय अस्थिरतेच्या व आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर बहुतेक ठिकाणी पर्यटकांची संख्या रोडावलेली असल्याने आम्हास मनमोकळे फिरायला व बघायला मिळाले. काही ठिकाणी तर आमच्याखेरीज दुसरे चिटपाखरू नव्हते. बहुतेक छायाचित्रामधील विस्तीर्ण परिसरात मी एकटाच आपणास दिसतो आहे तो त्यामुळेच. दुसरे व सर्वात महत्वाचे म्हणजे, भारतीयांबद्दल टिकून असलेली व सध्याच्या संकटात आणखीनच वाढीस लागलेली आत्मियता येथे प्रकर्षाने जाणवली हेदेखील आवर्जून नमूद करण्यासारखे...
#SrilankaTour #KiranAgrawal

No comments:

Post a Comment