Thursday, May 5, 2022

#SrilankaDiary04 ...

#SrilankaDiary04 ...
चहूदिशांनी जणू समुद्राच्या कुशीत वसलेल्या श्रीलंकेला नैसर्गिक लावणण्याचे वरदान लाभले आहे, असेच म्हणता यावे. आपल्या मुंबईतील मरीन ड्राईव्ह प्रमाणे कोलंबोतील गाले फेस असो, की बॅनटोटाचा समुद्र किनारा; तेथे आपण स्वतःला हरवून बसतो. डोंगराच्या कडेवरील कॅंडी लेक पॉईंटवरून सायंकाळी दिसणारा नजारा अप्रतिमच! बेंटोटाचा व गाले फोर्टचा निळाशार व नितळ असा समुद्र न्याहाळताना किती तरी वेळ कसा निघून जातो हे समजतच नाही. गाले फोर्टला जाताना रस्त्यात एकच असे ठिकाण आहे, जेथे समुद्रात उंचच उंच बांबू रोवून त्यावर पर्यटकांना बसून फिशर मॅनच्या मदतीने मासेमारीचा अनुभव घेण्याची व्यवस्था केलेली आहे. या बांबूवर बसून समुद्राच्या लाटा पाठिवर झेलत मासेमारीची कसरत करायची म्हणजे मोठे दिव्यच. जिवाच्या भीतीने शहारे आणणारा हा अनुभव असतो. तो घेतल्याखेरीज कळायचा नाही...
#srilankaTour #KiranAgrawal

No comments:

Post a Comment