Thursday, May 5, 2022

लोकमत सखी सन्मान 2022 ...

लोकमत सखी सन्मान 2022 ...
केवळ प्रापंचिक जबाबदारीतून चार भिंतीत अडकून न राहता समाजाच्या विविध क्षेत्रांत अतुलनीय कार्य करून अवघे आकाश कवेत घेऊ पाहणाऱ्या वऱ्हाड प्रांतातील सखींना अकोल्यातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहातील भव्य सोहळ्यात लोकमत सखी मंचतर्फे ‘लोकमत’ सखी सन्मान २०२२ने गौरविण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे, मुख्य प्रायोजक, निर्मिक ग्रामीण विकास व बहुउद्देशीय संस्थेच्या जया अंभोरे, रेणुका वानखडे, सहप्रायोजक ब्राइट करिअर इन्स्टिट्यूटचे संचालक अभय पाटील, सुनील कुलकर्णी, हरनील गुजराल, ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक किरण अग्रवाल, युनिट हेड अलोककुमार शर्मा, ‘लोकमत समाचार’चे प्रभारी अरुणकुमार सिन्हा यांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडला.
गौरवार्थी... प्रा.डॉ. इंदुमती लहाने (जीवनगौरव), डॉ. प्रियाकुमारी खिल्लारे (शिक्षण), मनीषा कुळकर्णी (क्रीडा), तारा माहेश्वरी (आरोग्य) , स्नेहल ढवळे (उद्योजक), प्रा.डॉ. स्वाती दामोदरे (साहित्य), संगीता इंगोले (सामाजिक) आणि डॉ. पूजा खेतान (सामाजिक). याप्रसंगीची ही काही सहभाग चित्रे... #LokmatAkola #LokmatSakhiSanmanAkola #KiranAgrawal

No comments:

Post a Comment