Tuesday, August 9, 2022

क्रीडा वैभवाला जनाधारही गरजेचा...

August 04, 2022 क्रीडा वैभवाला जनाधारही गरजेचा...
बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चालविलेल्या चमकदार कामगिरीमुळे सध्या क्रीडा विश्वात आनंद व उत्साहाचे वातावरण आहे. वऱ्हाडातील चिखलीची तलवारबाज गौरी सोळंके या स्पर्धांसाठी रवाना झाली असून तिची याकरीता निवड होणे हीच मोठी अभिमानाची बाब आहे. या पार्श्वभूमीवर अकोल्यातील विविध खेळांचे मार्गदर्शक, प्रशिक्षकांसोबत अकोला 'लोकमत'च्या रौप्य महोत्सवी वाटचाली अंतर्गत घेण्यात येत असलेल्या संवाद सत्रात चर्चा केली. क्रीडा विकासातील अडचणी जाणून घेतानाच खेळ व खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी काय काय करता येईल याबाबत मोकळेपणाने सर्वांनी मते मांडलीत. त्यांना प्रोत्साहनाचा जनाधार लाभण्याचीही गरज प्रतिपादिली. आपण सारे मिळून त्यासाठी प्रयत्न करूया...
या संवाद सत्रात अकोला कबड्डी असोसिएशनचे सचिव वासुदेव नेरकर, विदर्भ कॅरेम असोसिएशनचे सचिव प्रभजीतसिंह बछेर, बॉक्सिंगचे राज्य क्रीडा प्रशिक्षक सतिशचंद्र भट, कुस्ती राज्य क्रीडा मार्गदर्शक तथा प्रशिक्षक लक्ष्मीशंकर यादव, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव भरत डिक्कर, जिल्हा बॉडी बिल्डींग असोसिएशनचे अध्यक्ष संजय देशमुख, अकोला हॉकी असोसिएशनचे सचिव धीरज चव्हाण, जिल्हा ॲथेलेटिक्स संघटनेचे कोषाध्यक्ष कपील ढोके यांनी सहभाग नोंदविला. #LokmatAkola #AkolaSports #LokmatSamwadAkola #KiranAgrawalLokmat

No comments:

Post a Comment