Tuesday, August 9, 2022

शिवार फुलले श्रावणात हे...

August 07, 2022 शिवार फुलले श्रावणात हे...
फार दिवसांनी गावी रावेरला आलो आणि शेतावर गेलो. गावी आलो की शेतावर गेल्याशिवाय मन भरत नाही. त्यामुळे बॅग घरी ठेवली अन लगेच पुतण्या अर्पितला घेऊन शेत गाठले. भाटखेड्याचे इलायत खा पठाण यांच्याशी आमच्या कुटुंबाचे वाडवडीलांपासून संबंध. त्यामुळे तेच आमचे शेत बटाईने कसतात. त्यांच्यासोबत चारी मेरा पालथ्या घालत शेत नजरेतून काढले. थोडावेळ जोडी हाकत केळीच्या बागेत सऱ्याही पाडल्या. सध्या तर निसर्गाचा श्रावणोत्सव सुरू असल्याने शिवार मस्त फुलले आहे. शेती मातीतल्या आजच्या रविवारने येत्या काही दिवसांसाठी आनंद व समाधानाची बॅटरी फुल चार्ज करून दिली... खरेच काळ्या आईच्या कुशीतील आनंदाला अन्य कशाची सर नाही मित्रांनो!





#KiranAgrawal #RaverDiary

No comments:

Post a Comment