Tuesday, August 16, 2022

फौजींना सॅल्युट...

August 11, 2022 फौजींना सॅल्युट...
आज ज्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करीत आहोत त्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले आहे. स्वातंत्र्यासाठी संपूर्ण आयुष्य झोकुन देत ब्रिटिशांचा अननन्वित अत्याचार सहन केलेल्या या स्वातंत्र्य सेनानींचे योगदान अतुलनीय असे आहे. या सेनानींच्या त्याग व बलिदानाचे स्मरण करून देशाभिमानाचा संस्कार नवीन पिढीवर घडवावयास आपण कटिबद्ध होऊया. स्वातंत्र्य सैनिकांनी मिळवून दिलेल्या या स्वातंत्र्याला अबाधित ठेवण्यासाठी सीमेवर लढणाऱ्या व जागता पहारा देणाऱ्या शूर सैनिकांची सेवा देखील मोलचीच आहे. म्हणूनच, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना लोकमत अकोला आवृत्तीच्या रौप्य महोत्सवी वाटचाली अंतर्गत संवाद सत्रात माजी सैनिकांशी संवाद साधून, प्रातिनिधिक स्वरूपात त्यांनाही कृतज्ञतेचा सॅल्युट केला.
या सत्रात अमर जवान माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सुभाषराव म्हैसने, सचिव सेवानिवृत्त सुभेदार रमेश खंडारे, पुनर्नियुक्ती माजी सैनिक संघटनेचे वसंतराव चतरकर, जय जवान जय किसान संघटनेचे सुरेश लक्ष्मनसा वडे, शंकरराव देशमूख, मुरलीधर झटाले, अरुण मानकर, लक्ष्मनराव माेरे, सचिन देवरे, विजय खंडारे, रामरतन बुळुकले, प्रकाश राठाेड यांनी सहभाग घेतला़. आम्ही नतमस्तक आहोत आपल्या सेवा व शौर्यापुढे... जय हिंद।।। #LokmatAkola #LokmatSamwadAkola #KiranAgrawalLokmat

No comments:

Post a Comment