Friday, August 26, 2022

शिवभक्तीचा अनुपम उत्सव ...

August 22, 2022 शिवभक्तीचा अनुपम उत्सव ...
दर बारा कोसांवर भाषा बदलते, तसे तेथील सण उत्सवातील प्रथा परंपराही वेगवेगळ्या पद्धतीने समोर आलेल्या दिसतात. श्रावणात नाशिक नजीकच्या त्र्यंबकेश्वरी ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणा फेरीत भक्तांची गर्दी उसळताना दिसते तशी इकडे वऱ्हाडातील अकोल्यात कावड यात्रेला लोकोत्सवाचे स्वरूप आलेले दिसते. गांधीग्रामच्या पूर्णा काठावरून कावड घेऊन हजारो भाविक 'हर हर महादेव'चा गजर करीत सुमारे 18/20 कि.मी.ची पदयात्रा करीत अकोल्यात येतात व ग्रामदैवत श्री राज राजेश्वराला जलाभिषेक करतात. महाराष्ट्रातील एकमेव व 77 वर्षांची परंपरा असलेली ही कावड यात्रा आहे.
नाशिक त्रंबकेश्वरच्या कुंभमेळ्यात वा पुण्याच्या गणेशोत्सवात जसा भावभक्तीचा, गर्दीचा अनुपम सोहळा अनुभवयास मिळतो, तसाच अकोल्यातील कावड यात्रेत अनुभव येतो. शिव शंभो महादेवाच्या भल्या मोठ्या प्रतिमा, पालखीसह वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने बांधलेल्या कावड खांद्यावर घेऊन मार्गक्रमण करणाऱ्या शिवभक्तांच्या दुर्दम्य श्रद्धा भक्तीला तोड नाही. गेल्या वर्षी कोरोनाच्या निर्बंधामुळे प्रातिनिधिक स्वरूपात झालेला हा उत्सव यंदा मात्र मोठ्या उत्साहात होत आहे. कावड महोत्सव समितीने पालखी पूजनासाठी निमंत्रित केल्याने मलाही यात सहभागी होण्याची संधी लाभली.
यावेळी आमदार विप्लव बाजोरिया, समितीचे अध्यक्ष राजेश भारती, शिवसेना महानगर प्रमुख राजेश मिश्रा, शांतता समितीचे अध्यक्ष ॲड पप्पू मोरवाल, हरीश आलमचंदनी, प्रभुज्योतसिंग बच्छेर, अविनाश देशमुख, अशोक ओलांबे आदींसमवेतची ही आनंद चित्रे. जय भोले, बम बम भोले, हर्र बोला महादेव ...
#AkolaKawadYatra #JaiRajRajeshwar #JaiOmkareshwar #JaiBabhaleshwar #KiranAgrawal

No comments:

Post a Comment