Sunday, August 28, 2022

आनंद, मांगल्याची बरसात कर बाप्पा ...

August 26, 2022 आनंद, मांगल्याची बरसात कर बाप्पा ...
कोरोनाच्या दोन वर्षानंतर यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव होऊ घातला आहे. चैतन्य व मांगल्य निर्मिणारा हा सण उत्साहाने तसेच आनंदाने साजरा व्हावा, कसलाही तणाव नसावा. त्यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य ते नियोजन करतानाच गणेश मंडळांनी व नागरिकांनीही जबाबदारीने वागावे... अशी अतिशय रास्त भूमिका अकोल्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.
लोकमत अकोला आवृत्तीच्या रौप्य महोत्सवी वाटचाली निमित्तच्या संवाद सत्रात विविध सूचना केल्या गेल्या त्याकडे प्रशासनाने लक्ष पुरवायला हवे. या सत्रात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष ऍड मोतीसिंह मोहता, कार्याध्यक्ष हरीशभाई आलिमचंदानी, महासचिव सिद्धार्थ शर्मा, संग्राम गावंडे, मनीष हिवराळे, अर्जुन समाज गणेश मंडळाचे दत्ता पाटणे, मारवाडी प्रेस मंडळाचे शैलेश तिवारी, नेकलेसरोडचा राजा मंडळाचे कपिल रावदेव सहभागी होते. #LokmatAkola #LokmatSamvadAkola #AkolaGaneshotsaw #KiranAgrawalLokmat

No comments:

Post a Comment