Sunday, August 28, 2022

बैल घराची श्रीमंती, बैल दारचे वैभव...

August 26, 2022 बैल घराची श्रीमंती, बैल दारचे वैभव...
प्रख्यात वऱ्हाडी कवी डॉ. विठ्ठल वाघ यांनी त्यांच्या ऋषभसुक्त काव्यसंग्रहात बैलाच्या मानसन्मानाचे, श्रमाचे व महत्तेचे केलेले वर्णन इतके सुंदर, समर्पक व यथार्थ आहे, की त्यापेक्षा अधिक काही लिहिता बोलताच येऊ नये. बैल पोळ्यानिमित्त अकोल्यातील संत गाडगे बाबा बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने व अनिल मालगे या तरुणाच्या पुढाकाराने आयोजित शेतकरी सन्मान सोहळा व बैलजोडी सजावट स्पर्धेच्या बक्षिस वितरण सोहळ्यात अध्यक्ष म्हणून बोलताना त्याचाच संदर्भ दिला. बैल हा श्रमसंस्कृतीचा वाहक व प्रतीक आहे, तेव्हा घरातल्या नाठाळ मुलाला बैल संबोधून बैलाच्या श्रमाचा अवमान करू नका, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.
विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी, किसान ब्रिगेडचे अध्यक्ष प्रकाशभाऊ पोहरे, माजी आमदार तुकाराम बिरकड, ज्येष्ठ नेते कृष्णा अंधारे, पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकत अली मीरसाहेब, ज्येष्ठ पत्रकार राजू पिसे, पुरुषोत्तम आवारे, संजय खांडेकर, साहित्यिक अनंत खेळकर आदी मान्यवर समवेत व्यासपीठावर होते. शेतकऱ्यांनी वाजत गाजत मिरवणुकीने बैलजोड्या सजवून आणल्या होत्या. अगदी जत्राच भरली होती. यानिमित्ताने शहरात गावचा पोळा अनुभवयास मिळाला. ... त्यासाठी धन्यवाद अनिल मालगे... #AkolaBailPola #PolaChoukAkola #KiranAgrawal

No comments:

Post a Comment