At present, working as a Executive Editor of Lokmat, Akola(Maharashtra). Known as a "Saraunshkar", because "Saraunsh" columns are written every Sunday on political and social issues. For excellence in journalism, honoured with Shanti Bhushan Puraskar, Girna Gaurav, Darna Gaurav, Shiva Gaurav, Vivekanand Yuva Gaurav, Maharashtra Govt Vikas Varta etc. Also awarded by "AGRASHRI". Participates in various debates on news channels.
Sunday, April 21, 2024
Tuesday, April 16, 2024
उर्जादायी सोहळा #LAA2024 ..
April 13, 2024
उर्जादायी सोहळा #LAA2024 ..
लोकमत, लोकमत समाचार, लोकमत टाइम्स, डिजिटल, चॅनेल, ऑनलाइन अशा सर्व प्लॅटफॉर्मवर उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा गौरव सोहळा म्हणजे Lokmat Achievers Awards.
तरुण नेतृत्व, कार्यकारी व संपादकीय संचालक श्री करणबाबूजी दर्डा यांच्या संकल्पनेतून या सोहळ्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. यंदा या अवॉर्डसच्या 12व्या आवृत्ती निमित्त ठाण्यात लोकमत परिवाराचा हा स्नेह सोहळा रंगला, ज्यासाठी देशभरातील सहकारी उपस्थित होते.
लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ विजयबाबूजी दर्डा, एडिटर इन चीफ श्री राजेंद्रबाबूजी दर्डा, आभूषणांच्या दुनियेतील 'इन्ट्रीया' या प्रख्यात ब्रॅण्डच्या संचालिका पूर्वा कोठारी-दर्डा, लोकमतचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्रबाबूजी दर्डा, संयुक्त व्यवस्थापकीय व संपादकीय संचालक ऋषीबाबूजी दर्डा व करणबाबूजी यांचे यावेळी झालेले मार्गदर्शन नवी ऊर्जा देणारे तसेच प्रेरणादायी ठरले.
यंदा अकोल्यातील सहकारी लेखा विभागाचे विनायक जोशी व क्लासिफाइड सेल्सचे अंकित पेटारे या दोघांना यात अवॉर्डस लाभलेत.
याप्रसंगीची ही काही सहभाग चित्रे...
#LAAMumbai #LokmatAkola #KiranAgrawalLokmat
#LAA2024 : Mumbai
#LAA2024 ; Mumbai
लोकमत मधील उत्कृष्ठ कार्य करणाऱ्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देणारा स्नेह सोहळा म्हणजे #LAA2024
Lokmat Achievers Awardsच्या 12व्या आवृत्ती निमित्त पुन्हा ठाण्यात Team Akola.
#KiranAgrawalLokmat #LokmatAkola #LAAThane
Jharkhand election 2024 : Article published in Lokmat on April 14, 2024
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20240414_10_5&fbclid=IwAR3QE23cBwfsP2qsSSj6hTgLbfBGV8IcajDdamcOqWs0ccELRpJA1-egjAU
Saraunsh published in Akola Lokmat on April 14, 2024
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20240414_2_4&fbclid=IwAR3qY41OxhXf-P-95nRcdzum8M7C0KNhTN2Kzl9UqSMYnOau6bz-ejK2w50
https://www.lokmat.com/editorial/all-the-candidates-focus-on-social-engineering-a-a520-c310/?fbclid=IwAR1bA5NS8S4OzleGP6rL6g_VQL3Fk_reNkPsaIv0MiiZdAW7A5sBlOisUeA
Saraunsh published in Akola Lokmat on April 07, 2024
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20240407_2_1&fbclid=IwAR0AQtcDkXCwSRTxy7Nb3bTHNyQqLDz0-UHxqfE2S2P9oAxJM4xQLg0GgK4
https://www.lokmat.com/editorial/the-issue-of-vote-division-in-akola-and-buldhana-is-a-headache-a-a520-c310/?fbclid=IwAR0ylzZnqeZMlbwmNqx2wHmhb0F1vWO_GTgB_Q0Nsr4eFzjSk2UGyhMpxrk
Wednesday, April 3, 2024
गावाची शान, सरपंच महान.!
March 29, 2024
गावाची शान, सरपंच महान.!
अकोला येथे BKT प्रस्तुत #LokmatSarpanchAwards 2024 चा वितरण सोहळा राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज, सिने व नाट्य अभिनेत्री काजल राऊत, सरपंच डॉ. अनुप्रिया भांडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शानदारपणे पार पडला. जल व्यवस्थापन, आरोग्य सेवा, शिक्षण, पायाभूत सुविधा आदी 13 विविध संवर्गात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सरपंचांचा यात गौरव करण्यात आला.
संसद सदस्यांपासून ते सरपंचांपर्यंत उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणाऱ्या 'लोकमत' समूहाच्या या प्रकल्पाबद्दल सर्वच उपस्थितांनी भरभरून गौरवोद्गार काढले.
सदर कार्यक्रम Powered by MP Birla cement 'परफेक्ट प्लस' होता, तसेच co powered म्हणून Omnigel व 'सोसायटी टी' चे सहकार्य लाभले.
#LokmatAkola #KiranAgrawalLokmat
Jharkhand Election2024 ; Article published in Lokmat on April 02, 2024
दिर भावजयी मध्ये होणार का लढत?
लोकसभा निवडणुकीच्या महासंग्रामाची देशभरातील खबर 'लोकमत'च्या सुपर वोट पानात...
झारखंड : राज्याची खबरबात
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20240402_9_14&fbclid=IwAR2czfLwNCcu8wW0WblJBtTJPk0hlOsU2YIGvWpgtrgc7KY9xzdX5zQJmbA_aem_Aah7aoUKngYVDJSlN61-A1i83t9cZNlfB-GDMLkRE7Kj8MtlmLyQ2MprObcSV0uXR8hLELi6bVYX1nQlzxpUhFVY
#LokSabhaElection2024 #JharkhandElection2024 #KiranAgrawalLokmatt
गावाचा विकास साधणाऱ्यांचा गौरव... Buldhana 2024
March 28, 2024
गावाचा विकास साधणाऱ्यांचा गौरव...
शासकीय योजना व लोक सहभागातून ग्रामविकास साधणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील सरपंचांचा गौरव सोहळा नुकताच मोरया मंगलम येथील शानदार समारंभात संपन्न झाला.
BKT प्रस्तुत #LokmatSarpanchAwards 2024 चा हा वितरण सोहळा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा जागर घडविणाऱ्या श्री गुरुदेव सेवा मंडळाचे आजीवन प्रचारक आचार्य श्री हरिभाऊ वेरूळकर गुरुजी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी गतवर्षीचे सरपंच अवॉर्ड्स विजेते पांगरखेडच्या सौ अंजली सुर्वे व अजीसपूरचे बाळाभाऊ जगताप प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सदर कार्यक्रम Powered by MP Birla cement 'परफेक्ट प्लस' होता, तसेच co powered म्हणून Omnigel व 'सोसायटी टी' चे सहकार्य लाभले.
#LokmatAkola #KiranAgrawalLokma
Saraunsh published in Akola Lokmat on March 31, 2024
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20240331_2_2&fbclid=IwAR1xdkV5y6jEn76hZ047QqRBLST5ayCeKQ1FHLOGgKfe-h39aJdipwk6_TI_aem_Aah8rnzpk-BbAtiMJGZHL2NGBAngayCulWV_FOvxitT5nOJlGIRjvByqkLc1rGNw6KwbWMr3Dua0X0g8DFldjGRu
https://www.lokmat.com/editorial/lok-sabha-election-2024-candidates-dont-decide-allies-dont-ask-a-a520-c301/?fbclid=IwAR0eE1BAuCPw2ImSdGUMFcdeQYC129Wc2jgCHD1kXgwlToisLQOvOnJxVS0_aem_AaiAuz3O3dr8tC5ZNyDrjdsl8xp87vP1p3tFCMZOAziVb-4QvduGA7PvCRFXfH2EXCMwQHJdrmOzcC3hcMGVlWOB
'रेड अँड व्हाईट'
दाढीतल्या 'ब्लॅक अँड व्हाईट'सोबतच आता
पेहेरावात व सभोवतालात 'रेड अँड व्हाईट' !
😃😃
होळीनिमित्त सहज.., कसे वाटले कॉम्बिनेशन?
सर्वांनाच रंगोत्सवाच्या सप्तरंगी शुभेच्छा...
#KiranAgrawal
Saraunsh published in Akola Lokmat on March 24, 2024
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20240324_4_2&fbclid=IwAR1jbAbjtVa95h3AgnYFg_N98if1EljCrNc1IyqEFSzLUZTDZTul86xDXcU_aem_AahmOyhqDzNFIfDv4zjU0FBQ15LkbuSJc_9ba_4SYvQA2G3zR_KuFXW5oIS6uAlCPR1_LydW9nKSYgOxwfudKYYH
https://www.lokmat.com/editorial/lok-sabha-election-2024-candidates-definite-but-who-will-fight-a-a520-c309/?fbclid=IwAR04c4wxkEudFGstVTICATT1lU6lik9jcv3uv7e18YwRnJi8I1zC8pPjq6g_aem_Aaj3IXE0lmmcoOn4eEj9KqEEpkHU-tDOTzpDRlGNQACnG2Y8l1yCve5JlG30DNv-FfJ1reLK2TMhpt2y0nUvJweH
Jharkhand election 2024; Article published in Lokmat on March 22, 2024
सुनबाईनीही सोडले, त्यामुळे सासऱ्याची वाट बिकट !
लोकसभा निवडणुकीच्या महासंग्रामाची खबर, 'लोकमत'च्या सुपर वोट पानात... झारखंड वार्तापत्र
#LokSabhaElection2024 #JharkhandElection2024 #KiranAgrawalLokmat
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20240322_9_18&fbclid=IwAR1s0C7chxXIlmkiZe3CALf6iBgGlULts7Z-YqU3qBvaJER0Tge3LkXdIKg_aem_AagF0h3qztlM_FyZSjpNTCmaTs2unTfjmI9HI0jIzV2VBACKR11STEH3a2CIqy3YsWqUWE_lyKHpGxLOInKQtulq
श्रद्धेचा योग जुळुनी आला...
March 20, 2024
श्रद्धेचा योग जुळुनी आला...
श्रद्धा असली की योग जुळून येतात, हेच खरे.
शनिवारी लोकमत वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात आरसीसी क्लासेसचे प्रल्हाद कबीर यांनी श्री विठ्ठलाची अतिशय मोहक मूर्ती भेट दिली. पाहताच जीव जडावा असे ते सावळे, सुंदर रूप मनोहर..!
संत नामदेव महाराज म्हणतात त्याप्रमाणे 'अनंत जन्मीचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंगा..' असेच माझे झाले.
या सोहळ्यात विविध वाचकांनी दिलेली पुस्तके, तस्वीरी व पुष्पगूच्छे यांच्या गर्दीत नेमकी ही मूर्ती गेली 2/3 दिवस झाले आढळत नव्हती म्हणून जीव तीत गुंतला होता .
आज ऑफिसला गेलो आणि ही मूर्ती टेबलावर बघून डोळे भरून आले. अखेर तिचा शोध घेऊन सहकारींनी ती टेबलावर आणून ठेवली. नेमकी आज आमलकी एकादशी आहे आणि त्याच दिवशी बा पांडुरंगाची ही अशी भेट !
माझ्या दृष्टीने माझ्या श्रद्धेतून घडून आलेला हा योगायोगच.
माझ्या वाड वडीलांच्या पिढ्या शेती कसणाऱ्या राहिल्या आहेत. पहिल्यापासून कुटुंबात श्री विठ्ठलाची भक्ती केली जातेय. बाकी कुणी कोणते उपवास करो न करो, आषाढी हमखास केली जाते.
माझ्या आत्याने माझा सांभाळ केला. तिला मी चारही धामची यात्रा करून आणले, तेव्हा ती म्हणाली की, 'माझं सर्व काही झालं; पण माऊलीचे दर्शन राहिले. तेवढे एकदा पंढरपूरलाही घेऊन चल' आणि मी तिला पंढरपूर तुळजापूर दर्शनाला घेऊन गेलो होतो.
त्यावेळी पंढरपूर संस्थानच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी पत्रकार म्हणून सन्मानासाठी आम्हा कुटुंबीयांना कार्यालयात बोलावले तर 'तुम्हाला कुठे जायचे ते जा, तेवढा वेळ मी माझ्या माऊली सोबत थांबते' म्हणत ती मंदिरात मूर्ती समोर बसून राहिली होती.
ही मूर्ती हाती आली आणि साऱ्या आठवणी डोळ्यासमोर सर्रकन तरळून गेल्या.
तुकोबारायांच्या शब्दात सांगायचे तर,
'आता दृष्टीपुढे ऐसाची तू राहे, जो मी तुजं पाहे पांडुरंगा..!'
आता यानिमित्ताने दृष्टीपुढे नित्य माझा विठुराया राहणार आहे. आणखी काय हवे?
#KiranAgrawal
आनंद व ऊर्जादायी सायंकाळ !
March 16, 2024
आनंद व ऊर्जादायी सायंकाळ !
लोकमत अकोला आवृत्तीने 26 वर्षे पूर्ण करून 27व्या वर्षात पाऊल ठेवले, यानिमित्त आयोजित वर्धापन दिन सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून 'लोकमत'वर शुभेच्छांचा वर्षाव केला.
16 मार्चची ही सायंकाळ या भेटीगाठींनी आनंद व ऊर्जादायी ठरली. केवळ वाचक म्हणून नव्हे, तर एक कुटुंब म्हणून या सर्वांशी यातून नाते जुळले आहे. वाचकांचे निरंतर लाभत आलेले पाठबळ हीच लोकमतची खरी शक्ती आहे.
लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजयबाबूजी दर्डा, एडिटर इन चीफ श्री राजेंद्रबाबूजी दर्डा तसेच लोकमतचे नेतृत्वकर्ती नवीन पिढीचे सर्वश्री. देवेन्द्रबाबूजी, ऋषीबाबूजी, करणबाबूजी दर्डा व संपूर्ण व्यवस्थापनानेही वाचकांच्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
धन्यवाद स्नेही वाचकांनो, ही साथ अशीच कायम असू द्या हीच विनंती..
याप्रसंगीची काही आनंदचित्रे...
#LokmatAkola #LokmatAkolaAnniversary2024 #KiranAgrawal
Saraunsh published in Akola Lokmat on March 17, 2024
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20240317_2_3&fbclid=IwAR0AwiacQodpbubTaytLmncES_9wJ31QA7gsVbr3iDnX_6XG1MeyYU9RbTs_aem_AajqRyTbCoi2tfS-wvfyFJQ2nnkfMPPCtUZfkt6eIVvsnltulykIG63PsD3BwTlUTGeaZUdYZfwBvZj6svFwtxD3
https://www.lokmat.com/editorial/editorial-article-over-lok-sabha-elections-2024-politics-in-akola-constituency-a-a520-c597/?fbclid=IwAR0rryPHywZt309fpcWRuZoiKOAD7jEB-7ExmR-lxJ-5htpcHlEO1EQa9cY_aem_Aahy0s1H6jzlIO8sR4wRpmntbW41GCWU6EGwmVA-HfpbkKH2P-_aoDnR_q8E843B2csmfAXfwHP0N7RwKr4eKeAF
Sinhavlokan article published in Akola Lokmat Anniversary Suppliment on March 16, 2024
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_HWHM_20240316_5_1&fbclid=IwAR1ZUlJ9vNFqoJWM0jdTphJyVRuYi5XcSe3dkIZtmlaPv97niMNFrEMQaJ0_aem_AagcrQlqA_2wAUMPxWRFpiDKOINKOj78UeRYGgGSkP6DXYs9hivLd7tLKWGVq_HSoZNp6bTbtA2UghqqLXj6FQE9
https://www.lokmat.com/editorial/the-highway-of-development-was-paved-with-the-adoption-of-newness-a-a520-c310/?fbclid=IwAR0S9v9VN0aG2cgWc6YmzQ5zr3E90AtN_37Nh3mqeQpPnlqzpl74QX_kNUY_aem_AajsJx_CqmGO64-DSQ2Xl3EO709SXNvAbc6L3tForzZ1KzvvRB6jOqStWn-eB4j25xjDJBrBO9UpCPnTYi63zMVZ
शिक्षणाची बाराखडी गिरवून घेणारी बोराखेडीची शाळा
March 15, 2024
शिक्षणाची बाराखडी गिरवून घेणारी बोराखेडीची शाळा
काल मोताळा येथून बुलढाण्याकडे जात असताना वार्ताहराने आग्रह केला म्हणून बोराखेडीच्या जिल्हा परिषद शाळेत धावती भेट दिली आणि अवाकच झालो.
जिल्हा परिषदेच्या शाळा म्हटल्या की आपल्या मनात मोडकळीस आलेल्या इमारतीपासून अस्वच्छ आवारापर्यंतचे चित्र साकारते, पण या शाळेच्या आवारात गेल्या गेल्या आपण एखाद्या खासगी संस्थेच्या टापटीप शाळेत आल्याचा 'फील' येतो.
सरकारी नोकरीकडे केवळ पगाराचे साधन म्हणून न पाहता लोकसहभाग मिळवून समर्पण भावाने नोकरीतूनही सेवा कशी करता येते याचे उत्तम उदाहरण ठरणारा येथील स्टाफ दिसला.
मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांची सातत्यपूर्ण धडपड व त्यांना तितकीच तोलामोलाची साथ देणाऱ्या विशेषतः महिला शिक्षिका खरेच आपल्या स्वतःच्या लेकरांप्रमाणे या शाळेतील मुलांकडे लक्ष पुरवत आहेत, आणि म्हणून खासगी शाळांची स्पर्धा करतानाही येथील विद्यार्थी संख्या 250 वरून दुप्पट म्हणजे 450 वर गेली आहे.
केंद्र शासनाच्या योजनेत अगोदर आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून लौकिक लाभलेल्या या शाळेने आता राज्य शासनाच्या 'सुंदर माझी शाळा' उपक्रमात सुमारे 30 विविध निकषांमध्ये अव्वल येत जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविला.
नवीन तंत्राशी जुळवून घेत या शाळेतील मुलांनी स्वच्छतेची महती सांगणारे वर्षभरात तब्बल 45 हजार व्हिडिओ समाज माध्यमांवर टाकून जनजागरण घडविले ही वेगळीच बाब येथे कळली. शिक्षणाच्या क्षेत्रात बदल घडवून इच्छिणाऱ्यांनी या शाळेला भेट देऊन त्यांची उपक्रमशीलता नक्कीच समजून घेण्यासारखी आहे...
धन्यवाद पप्पू राठी जी, आपल्या आग्रहामुळे या शाळेस भेट देऊन तेथली अभिनवता जाणून घेता आली
#ZPSchoolBorakhedi #KiranAgrawal
ऊर्जा शक्तीचा सन्मान...
March 08, 2024
ऊर्जा शक्तीचा सन्मान...
विविध क्षेत्रात आपल्या कार्यकुशलतेची पताका फडकविणाऱ्या भगिनींचा जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने प्रातिनिधिक स्वरूपात 'लोकमत'तर्फे सन्मान करण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ सुचिता पाटेकर यांच्या मुख्य उपस्थितीत झालेल्या या सन्मान सोहळ्याप्रसंगी महिलांचे समाजातील स्थान, त्यांचे सक्षमीकरण व स्त्री पुरुष समानता आदी विषयावर छान परिचर्चाही रंगली.
डॉ. उत्पला मुळावकर, डॉ. सीमा तायडे, कमलजीत कौर, विद्या गिरी, डॉ. उज्वला मापारी, डॉ. योजना डागा, अक्षया कोठाळे, डॉ. दिपाली काळे, स्नेहल ढवळे, डॉ रूपाली राठी, डॉ. पियुशा भागडे, रश्मी खडसान आदि भगिनी यात सहभागी झाल्या.
#LokmatAkola #WomensDay2024 #KiranAgrawal
Saraunsh published in Akola Lokmat on March 10, 2024
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20240310_2_5&fbclid=IwAR0Mmi2iP_oqYFwxOcV4mb60YSzAHfRyWjHsKNfw8E4aFrHBqpCEFWs9wO8_aem_AajQDgw1DmotUCyMPu8KQmb6lP-IWM4OlmW908XJwmLEMYENNV1fTSdkumT9Ukxp6pORfVOI0hy3P1qN8aLOn4u0#google_vignette
https://www.lokmat.com/editorial/ahead-of-the-election-why-the-candidates-will-not-be-determined-a-a520-c310/?fbclid=IwAR1B-y87OwQD3TqPOIudTzvynKlhkbPqv-XRZw80ZoiPUiCshkmLfsIfv20_aem_AahTEkPTu4XlBxfwp6pYyHcr5DeJhIUwk4urAh0-FFft6n0aa2C8dB3z-iSNTQj7BjDKLkm3a2RzgpYD0sh1zWT0
Saraunsh published in Akola Lokmat on March 03, 2024
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20240303_2_2&fbclid=IwAR1B-y87OwQD3TqPOIudTzvynKlhkbPqv-XRZw80ZoiPUiCshkmLfsIfv20_aem_AahTEkPTu4XlBxfwp6pYyHcr5DeJhIUwk4urAh0-FFft6n0aa2C8dB3z-iSNTQj7BjDKLkm3a2RzgpYD0sh1zWT0
'जीवन गौरव'...
Feb. 25, 2024
'जीवन गौरव'...
खर तर जीवन म्हणजे खूप मोठा समुद्रच आहे. त्याची अथांगता न मोजता येणारी. सुख दुःख, विविध प्रसंग अन अनुभवांच्या अगणित लाटा झेलत एखाद्या खडकावर क्षणभर विसावावं तसा हा प्रवास.
आली लाट की एखाद्या खडकावर आसरा घ्यायचा, आणि गेली लाट की पुन्हा पोहायला लागायचं; असंच तर सुरू आहे जीवन.
त्यात मागे वळून बघितलं, तर जीवन अजून जगायचंच आहे असंच राहून राहून वाटतं. इतकं काही शिकायचं, करायचं, फिरायचं, अनुभवायचं राहून गेलं की त्याची जाणीव अस्वस्थ करून जाते.
त्यामुळे आजवरच्या धकाधकीत गौरवा योग्य आपण काय केलं हा प्रश्नच पडतो.
तथापि, शिक्षक साहित्य संघाच्या भावना व भूमिकेचा आदर करीत तेल्हारा येथील 8व्या शिक्षक साहित्य संमेलनात जीवनातला पहिला जीवनगौरव पुरस्कार प्रख्यात साहित्यिक, संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद देशमुख यांच्या हस्ते व डॉ. प्रतिमाताई इंगोले आदींच्या उपस्थितीत स्वीकारला.
यापुढच्या उर्वरित जीवनात अधिक चांगले कार्य करण्यासाठीची प्रेरणा त्यातून नक्कीच मिळेल.
धन्यवाद शिक्षक साहित्य संघ, जयदीप सोनखासकर, संघर्ष सावरकर, शिवराज जामोदे ...
#KiranAgrawal
माणूसपण जागवूया...
Feb. 26, 2024
माणूसपण जागवूया...
सभ्यता व संस्कृतीच्या संवर्धनासाठी शिक्षण आणि साहित्य गरजेचे आहे. बालपणाच्या विद्यार्थी दशेपासून माणूस घडवण्याच्या प्रक्रियेत सहभागी असणारा शिक्षक हा घटक त्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.
विद्यार्थी म्हणून शाळेत असताना प्रतिज्ञा म्हणवून घेतली जाते. 'भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. या देशातल्या समृद्धतेने व विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे...' या प्रतिज्ञेतील अभिमान वास्तवात रुजविण्याचा व संवेदना जपणारे माणूसपण जागविण्याचा प्रयत्न होणे गरजेचे आहे.
कोरोना नंतरचे शिक्षण व एकूणच जीवनही बदलून गेले आहे. आता त्याहीपुढे जाऊन AI म्हणजे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे युग आले आहे. ते मोठे आव्हानात्मक असल्याने त्याला तोंड देताना संवेदना व माणुसकीच्या जपणूकीची गरज अधिक आहे... इति मुद्दे शिक्षण साहित्य संमेलनात मांडलेत.
****
महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि शिक्षक साहित्य संघ आयोजित आठवे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथे पार पडले. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त 'बारोमास'कार डॉ. सदानंद देशमुख यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या या संमेलनात प्रख्यात लोककवी 'तिफन'कार प्रा. डॉ. विठ्ठल वाघ, ज्येष्ठ साहित्यिका डॉ. प्रतिमा इंगोले, वऱ्हाडी बोलीचे अभ्यासक प्रा. डॉ. रावसाहेब काळे, साहित्य मंडळाचे सदस्य व कादंबरीकार पुष्पराज गावंडे, गीतकार प्रा. डॉ. गोविंद गायकी, हास्य अभिनेते किशोर बळी आदी मान्यवरांनी सहभाग नोंदविला, ज्यामुळे संमेलनाची उंची वाढली.
या संमेलनाच्या समारोप सत्राचे अध्यक्षस्थान भूषविण्याची संधी मला लाभली. त्यानिमित्ताने शिक्षक व साहित्यिकांशी संवाद साधता आला.
उपक्रमशील शिक्षक तुळशीदास खिरोडकर व सहकारी राजू चिमणकर प्रवासात सोबत असल्याने विविध विषयांवर छान गप्पा झाल्या. परतीच्या वाटेवर श्री वांगेश्वराचे दर्शनही झाले.
Thanks to Jaydeep Sonkhaskar, Shivraje Jamode, Sangharsh Sawarkar and all..
#ShikshakSahityaSammelanTelhara #KiranAgrawal
Subscribe to:
Posts (Atom)