At present, working as a Executive Editor of Lokmat, Akola(Maharashtra). Known as a "Saraunshkar", because "Saraunsh" columns are written every Sunday on political and social issues. For excellence in journalism, honoured with Shanti Bhushan Puraskar, Girna Gaurav, Darna Gaurav, Shiva Gaurav, Vivekanand Yuva Gaurav, Maharashtra Govt Vikas Varta etc. Also awarded by "AGRASHRI". Participates in various debates on news channels.
Wednesday, August 31, 2022
Saraunsh not published on August 28, 2022
Saraunsh not published on August 28, 2022 due to Holiday on August 27 (Tanhapola)
Sunday, August 28, 2022
माझी दाढी, माझी ओळख..!
माझी दाढी, माझी ओळख..!
श्रावणाचा आणि दाढीचा काय संबंध कुणास ठाऊक? पण आज कार्यालयात त्यावरून सहकारींशी चर्चा झडली.
श्रावणात दाढी करता आली नाही इथून सुरू झालेली ही चर्चा पहिल्या दाढीधारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापर्यंत पोहोचली.
तितकेच कशाला, इतिहासाच्या गॅलरीत डोकावले तर अनेक महापुरुष दाढीधारी असल्याचे आढळून येते, आपण तर त्यांच्या नखाचीही सर करू शकत नाही.
अलीकडच्या दूरचित्रवाहिन्यांच्या मालिकांमधील व चित्रपटातीलही आजचे अनेक हिरो कसे दाढीधारी आहेत, यावरही चर्चाचर्वण झाले.
गुळगुळीत चेहऱ्याच्या राजकपूर, देवानंद, राजेंद्र कुमार, जितेंद्र यांचा काळ ते आजचा विकी कौशल, कार्तिक आर्यन, रणवीर, अभिषेक बच्चन यांचा काळ, अशीही चर्चा रंगली.
🎅🎅
मी म्हटले, मुळात अग्रवाल या आडनावाचा व दाढीचा तसा संबंध नाही, पण इयत्ता दहावीनंतर आलेल्या दाढीला मी अंतर दिले नाही.
मागे कोरोना काळात तर ती जरा अधिकची वाढवूनही पाहिली होती.
(त्यावेळच्या लॉकडाऊनमध्ये सलून शॉप्स बंद राहिल्याने अनेकांच्या हनुवटीवरील शेती छान बहरलेली दिसली होती)
मी 28 वर्षांपूर्वी दाढीवर असताना बोहल्यावर चढलो व आजपर्यंत दाढी टिकुन आहे. तुमचे हिरो आज दाढीवर दिसतात. मी तेव्हापासून दाढी ठेऊन आहे, सोपं नाही मित्रांनो घरात अशी धिटाई दाखवणं!
आता माझी दाढीच माझी ओळख बनून गेली आहे.
त्यामुळे माझं नाव घ्यायला कचरणारे लोक आपल्या हनूवटीला हात लावून इशाऱ्यात बोलतात म्हणे
😃😃
असो, बाकी कुणाला 'अच्छे दिन' येवो न येवो, पण दाढीला ते आले म्हणायचे.
नुकतेच विधिमंडळात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राज्यातील मुख्यमंत्री शिंदे यांची काळी दाढी व देशातील पांढऱ्या दाढीचा मुद्दा छेडून हशा व टाळ्या घेतल्या.
दाढी हा इतक्या औत्सुक्याचा व चर्चेचा विषय होऊ शकतो, तर
'माझी दाढी, माझी ओळख..!' अशी मोहीम सुरू व्हायला काय हरकत आहे?
****
अर्थात, श्रावणात दाढी वाढविलेल्यांनी ती उतरविण्याची घाई नको करायला, कारण पुढील महिन्यात म्हणजे सप्टेंबरच्या पहिल्या शनिवारी (यंदा 3 सप्टें.) जागतिक दाढी दिन (World Beard Day) साजरा केला जाईल. त्यासाठी दाढी नसलेल्यांनाही दाढी वाढवायला संधी आहे ...
🤣 🤣
तोपर्यंत चला, यानिमित्ताने आपापले दाढीतील छायाचित्र या पोस्टच्या कमेंट बॉक्स मध्ये टाकून आपणच आपल्या वेगळ्या रूपाचा आनंद अनुभवूया मित्रांनो...
🧔🏻🧔🏻🧔🏻🧔🏻
#KiranAgrawal #माझी_दाढी_माझी_ओळख!
#WorldBeardDay
आनंद, मांगल्याची बरसात कर बाप्पा ...
August 26, 2022
आनंद, मांगल्याची बरसात कर बाप्पा ...
कोरोनाच्या दोन वर्षानंतर यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव होऊ घातला आहे.
चैतन्य व मांगल्य निर्मिणारा हा सण उत्साहाने तसेच आनंदाने साजरा व्हावा, कसलाही तणाव नसावा. त्यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य ते नियोजन करतानाच गणेश मंडळांनी व नागरिकांनीही जबाबदारीने वागावे... अशी अतिशय रास्त भूमिका अकोल्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.
लोकमत अकोला आवृत्तीच्या रौप्य महोत्सवी वाटचाली निमित्तच्या संवाद सत्रात विविध सूचना केल्या गेल्या त्याकडे प्रशासनाने लक्ष पुरवायला हवे.
या सत्रात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष ऍड मोतीसिंह मोहता, कार्याध्यक्ष हरीशभाई आलिमचंदानी, महासचिव सिद्धार्थ शर्मा, संग्राम गावंडे, मनीष हिवराळे, अर्जुन समाज गणेश मंडळाचे दत्ता पाटणे, मारवाडी प्रेस मंडळाचे शैलेश तिवारी, नेकलेसरोडचा राजा मंडळाचे कपिल रावदेव सहभागी होते.
#LokmatAkola #LokmatSamvadAkola #AkolaGaneshotsaw #KiranAgrawalLokmat
बैल घराची श्रीमंती, बैल दारचे वैभव...
August 26, 2022
बैल घराची श्रीमंती, बैल दारचे वैभव...
प्रख्यात वऱ्हाडी कवी डॉ. विठ्ठल वाघ यांनी त्यांच्या ऋषभसुक्त काव्यसंग्रहात बैलाच्या मानसन्मानाचे, श्रमाचे व महत्तेचे केलेले वर्णन इतके सुंदर, समर्पक व यथार्थ आहे, की त्यापेक्षा अधिक काही लिहिता बोलताच येऊ नये.
बैल पोळ्यानिमित्त अकोल्यातील संत गाडगे बाबा बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने व अनिल मालगे या तरुणाच्या पुढाकाराने आयोजित शेतकरी सन्मान सोहळा व बैलजोडी सजावट स्पर्धेच्या बक्षिस वितरण सोहळ्यात अध्यक्ष म्हणून बोलताना त्याचाच संदर्भ दिला.
बैल हा श्रमसंस्कृतीचा वाहक व प्रतीक आहे, तेव्हा घरातल्या नाठाळ मुलाला बैल संबोधून बैलाच्या श्रमाचा अवमान करू नका, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.
विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी, किसान ब्रिगेडचे अध्यक्ष प्रकाशभाऊ पोहरे, माजी आमदार तुकाराम बिरकड, ज्येष्ठ नेते कृष्णा अंधारे, पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकत अली मीरसाहेब, ज्येष्ठ पत्रकार राजू पिसे, पुरुषोत्तम आवारे, संजय खांडेकर, साहित्यिक अनंत खेळकर आदी मान्यवर समवेत व्यासपीठावर होते.
शेतकऱ्यांनी वाजत गाजत मिरवणुकीने बैलजोड्या सजवून आणल्या होत्या. अगदी जत्राच भरली होती.
यानिमित्ताने शहरात गावचा पोळा अनुभवयास मिळाला.
... त्यासाठी धन्यवाद अनिल मालगे...
#AkolaBailPola #PolaChoukAkola #KiranAgrawal
EditorView published in Online Lokmat on August 25, 2022
श्रद्धेचा पूर, प्रशासन मात्र दूर!
किरण अग्रवाल /
स्थानिक जनमानसाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संस्था जेव्हा शासकीय चाकोरीबद्ध कामापलीकडचा विचार न करता लोकोत्सवाप्रसंगीही हात बांधून किंवा आखडता घेऊन त्रयस्थासारखे वागताना दिसतात तेव्हा त्यातील नेतृत्वकर्त्यांच्या बेगुमानतेबद्दल संताप व्यक्त होणे स्वाभाविक ठरून जाते. परंपरेप्रमाणे श्रावणातील अखेरच्या सोमवारी लाखो शिवभक्तांच्या सहभागात साजऱ्या झालेल्या अकोल्यातील कावड यात्रा महोत्सवाप्रसंगी स्थानिक प्रशासनाच्या अशाच त्रयस्थतेचा प्रत्यय आला, त्यामुळेच मग महापालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत तरी कशाला असा मूलभूत प्रश्न उपस्थित केला जाणे गैर ठरू नये.
विदर्भाच्या अकोल्यात होणारी श्रावणातील कावड यात्रा म्हणजे श्रद्धा व शिवभक्तीचा अनुपम सोहळाच असतो. शे सव्वाशे सार्वजनिक मंडळे गांधीग्रामच्या पूर्णा नदीतील जलाची कावड घेऊन 18 ते 20 किलोमीटरची अनवाणी पदयात्रा करीत अकोल्यातील ग्रामदैवत राजराजेश्वराला जलाभिषेक करण्यासाठी येतात. सुमारे 77 वर्षांची परंपरा असलेल्या व महाराष्ट्रात एकमात्र अकोला येथे साजऱ्या होणाऱ्या या कावड यात्रेत मोठमोठ्या शिवप्रतिमा व पालख्या घेऊन हजारो शिवभक्त कावडीसह सहभागी असतात व लाखो दर्शक रस्त्यावर स्वागतासाठी उभे असतात. यानिमित्ताने संपूर्ण अकोल्यातील रस्ते शिवभक्तांच्या गर्दीने ओसंडून वाहतात व जिकडे तिकडे हर्र बोला महादेवचा गजर होत असतो. भावभक्तीने व चैतन्याने भारलेला हा उत्सव असतो. कोरोना काळातील निर्बंधांनंतर दोन वर्षांनी यंदा मुक्तपणे झालेल्या या यात्रेत अधिकच उत्साह होता, पण अकोल्याचा लोकोत्सव ठरलेल्या या महोत्सवाबद्दल जिल्हा प्रशासन व स्थानिक महापालिकेतर्फे फार गांभीर्य बाळगले गेल्याचे दिसून येऊ शकले नाही.
कावड समितीने पुरेशा वेळेपूर्वी विविध सूचना करूनही जिल्हा प्रशासनाकडून त्याची फारसी दखल घेतली गेली नाही. पोलीस दलाने यात चोख कर्तव्य बजावले. पुरेसा बंदोबस्त तैनात करतानाच वाहतुकीचे नियोजन करून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर परिश्रम घेताना दिसून आले. अकोला ते गांधीग्राम मार्गावर त्यांनी स्वतः निरीक्षण करीत विविध पालख्यांचे स्वागत करून लोकभावनांचा सन्मानही केला, पण जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद व महापालिका प्रशासनाकडून तसे होताना दिसले नाही. प्रांताधिकारी निलेश अपार यांच्यासारखे अपवादात्मक अधिकारी धावपळ करताना आढळले, परंतु अन्य अधिकारी कुठे काय करीत होते? विद्युत मंडळाने गांधीग्राममध्ये रात्रीच्या वेळी विद्युत पुरवठ्याची व्यवस्था केली व अकोला शहरातील मिरवणूक मार्गात लोम्बकळणाऱ्या विजेच्या तारा दुरुस्त केल्या, पण अनवाणी येणाऱ्या भक्तांसाठी रस्ते ठीक करण्याची सुबुद्धी सार्वजनिक बांधकाम विभागाला सुचू शकली नाही. लाखोंच्या संख्येतील भाविकांच्या प्रसाधनासाठी फिरत्या स्वच्छतागृहांची व्यवस्था असो, की मिरवणुकीत व मिरवणुकीच्या नंतरही संबंधित रस्त्यांची विशेष साफसफाई करणे; महापालिकेला जमले नाही. इतरही अनेक मुद्द्यांची चर्चा करता येऊ शकेल, ज्यांची जबाबदारी जिल्हा प्रशासन व महापालिकेला पार पाडता आली असती; पण ते होताना दिसले नाही.
अकोल्यातील कावड महोत्सव हा येथील धार्मिक, सांस्कृतिक परंपरेचे जतन करणारा उत्सव आहे. यातून कोट्यवधीच्या आर्थिक चलनवलनालाही हातभार लागून जातो, शिवाय हा अशा प्रकारचा एकमात्र महोत्सव असल्याने त्याद्वारे अकोल्याचे ब्रॅण्डिंग होऊ शकते; पण तसा प्रयत्नच होताना दिसत नाही. महापालिकेत सध्या लोकप्रतिनिधींची राजवट नाही. सारी सूत्रे प्रशासनाच्या हाती आहेत, त्यादृष्टीने महापालिका आयुक्तांनी स्वतः पुढाकार घेऊन सोयी सुविधा उपलब्ध करून देतानाच कावडधारी मंडळांच्या पालख्यांचे शहरातील पालक संस्थेचे प्रमुख म्हणून स्वतः स्वागत करणे अपेक्षित होते, पण ती संवेदनशीलता दिसून आली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींचे असो की प्रशासनाचे, नेतृत्व करणे म्हणजे केवळ कामकाजाचे वा कार्यालयाचे संचालन करणे अपेक्षित नसते तर वेळप्रसंगी लोकसहभाग नोंदवत प्रमुखत्वाच्या नात्याने लोकधर्म निभावणेही अपेक्षित असते. गणेशोत्सवाची ऐतिहासिक परंपरा असलेल्या पुणे येथून बदलून आलेल्या अकोला महापालिका आयुक्तांनी येथल्या कावड महोत्सवात यंदा तसा वेगळा पायंडा पाडला असता तर शासनाने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली नसती, पण तसे दिसू शकले नाही. थोडक्यात, अतिशय उत्साहाने व श्रद्धेने पार पडलेल्या अकोल्यातील कावड यात्रेत स्थानिक प्रशासनाची त्रयस्थता नजरेत भरल्याखेरीज राहिली नाही.
https://www.lokmat.com/editorial/flood-of-faith-but-the-administration-is-far-away-a520-c310/?fbclid=IwAR2iKS663ZQSquUlvWk5Lp1JxoHYywQIw9Ix9iX95j6CrV11caNrpl-ikwA
Friday, August 26, 2022
शिवभक्तीचा अनुपम उत्सव ...
August 22, 2022
शिवभक्तीचा अनुपम उत्सव ...
दर बारा कोसांवर भाषा बदलते, तसे तेथील सण उत्सवातील प्रथा परंपराही वेगवेगळ्या पद्धतीने समोर आलेल्या दिसतात.
श्रावणात नाशिक नजीकच्या त्र्यंबकेश्वरी ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणा फेरीत भक्तांची गर्दी उसळताना दिसते तशी इकडे वऱ्हाडातील अकोल्यात कावड यात्रेला लोकोत्सवाचे स्वरूप आलेले दिसते.
गांधीग्रामच्या पूर्णा काठावरून कावड घेऊन हजारो भाविक 'हर हर महादेव'चा गजर करीत सुमारे 18/20 कि.मी.ची पदयात्रा करीत अकोल्यात येतात व ग्रामदैवत श्री राज राजेश्वराला जलाभिषेक करतात. महाराष्ट्रातील एकमेव व 77 वर्षांची परंपरा असलेली ही कावड यात्रा आहे.
नाशिक त्रंबकेश्वरच्या कुंभमेळ्यात वा पुण्याच्या गणेशोत्सवात जसा भावभक्तीचा, गर्दीचा अनुपम सोहळा अनुभवयास मिळतो, तसाच अकोल्यातील कावड यात्रेत अनुभव येतो.
शिव शंभो महादेवाच्या भल्या मोठ्या प्रतिमा, पालखीसह वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने बांधलेल्या कावड खांद्यावर घेऊन मार्गक्रमण करणाऱ्या शिवभक्तांच्या दुर्दम्य श्रद्धा भक्तीला तोड नाही.
गेल्या वर्षी कोरोनाच्या निर्बंधामुळे प्रातिनिधिक स्वरूपात झालेला हा उत्सव यंदा मात्र मोठ्या उत्साहात होत आहे. कावड महोत्सव समितीने पालखी पूजनासाठी निमंत्रित केल्याने मलाही यात सहभागी होण्याची संधी लाभली.
यावेळी आमदार विप्लव बाजोरिया, समितीचे अध्यक्ष राजेश भारती, शिवसेना महानगर प्रमुख राजेश मिश्रा, शांतता समितीचे अध्यक्ष ॲड पप्पू मोरवाल, हरीश आलमचंदनी, प्रभुज्योतसिंग बच्छेर, अविनाश देशमुख, अशोक ओलांबे आदींसमवेतची ही आनंद चित्रे.
जय भोले, बम बम भोले, हर्र बोला महादेव ...
#AkolaKawadYatra #JaiRajRajeshwar #JaiOmkareshwar #JaiBabhaleshwar #KiranAgrawal
Saraunsh published in Akola Lokmat on August 21, 2022
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20220821_2_3&fbclid=IwAR1WvN72-tm1o9ZDugMe6RV4Sp-nKWmo3MDfKHoGPs2KLw-6H5VfVAAJrbk
सांग सांग भोलेनाथ, प्रशासन सुधारेल का? ...
August 20, 2022
सांग सांग भोलेनाथ, प्रशासन सुधारेल का? ...
अकोल्याचा लोकोत्सव म्हणवली जाणारी कावड यात्रा अवघ्या 24 तासांवर येऊन ठेपली आहे. उद्या या वेळपर्यंत ग्रामदैवत राजराजेश्वराची पालखी कावड भरणासाठी गांधीग्रामकडे रवानाही झालेली असेल, परंतु अद्याप यासंबंधी प्रशासनाच्या पातळीवरून करावयाची कामे मार्गी लागलेली दिसत नाहीत.
स्थानिक प्रशासनाची ही निबरता केवळ दुर्दैवीच नसून, अकोलेकरांच्या श्रद्धेच्या उत्सवाप्रतीची असंवेदनशीलता दर्शविणारीही आहे.
भलेही येथले शीर्षस्थ अधिकारी नवीन आहेत, त्यांना या उत्सवाबद्दलची पुरेसी माहिती नाही; पण कावड मंडळांनी वेळोवेळी अडचणी निदर्शनास आणून दिल्या असतानाही त्याकडे लक्ष दिले गेलेले नाही.
कावड मार्गावर काँक्रीटच्या रस्त्यांमध्ये भेगा आहेत, रस्त्याच्या कडेला काँक्रीटमधील लोखंडी बार उघडे पडलेले आहेत...
क्विंटलपेक्षा अधिक वजनाच्या कावड घेऊन जाणाऱ्या हजारोंच्या संख्येतील भक्तांना यापासून इजा होण्याची शक्यता नाकारता येणारी नाही.
गांधीग्राममध्ये लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे, परंतु अकोल्यात येईपर्यंतच्या रस्त्यावर अंधार असतो. पहाटे उजाडेपर्यंत हा रस्ता पार करणाऱ्या कावडधारकांना अंधाराशीच सामना करावा लागणार आहे, पण त्याही बाबतीत उपाय केला गेलेला दिसत नाही.
शहरात आल्यावर हजारोंच्या संख्येतील कावडधारकांच्या प्रसाधनासाठी फिरत्या स्वच्छतागृहांची गरज आहे, पण महापालिका प्रशासन ढिम्म आहे.
गांधीग्राममध्ये होणारी गर्दी लक्षात घेता व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश निघाले आहेत, पण रात्रीच्या वेळी शिवभक्तांना चहा पाणी कुठून उपलब्ध होणार?
अकोल्यात याची मोफत व्यवस्था करणाऱ्या सामाजिक संस्थांनी गांधीग्राममध्येही किंवा वाटेत अशी काही व्यवस्था करता येईल का, याचा विचार करायला हवा...
****
कावड महोत्सव समितीचे अध्यक्ष राजेश भारती, माणकेश्वर मंडळाचे विठ्ठल गाडे, पवन महल्ले, ओंकारेश्वरचे विनोद शर्मा, रवीनाताई बरे, सुभद्राताई घरत यांनी लोकमतच्या संवाद सत्रात पोटतिडकीने आपली व्यथा मांडली.
अजूनही एक दिवस हातात आहे. तातडीने यंत्रणा कामाला लावून जे जे काही करता येईल ते ते तातडीने करायला हवे. यासाठी स्थानिक प्रशासनाला भोलेनाथानेच सुबुद्धी द्यावी.
हा अकोल्याचा लोकोत्सव आहे.
अकोलेकरांच्या श्रद्धेचा उत्सव आहे,
पंढरपुरची वारी करून येणाऱ्या वारकऱ्यांची पायधूळ मस्तकी लावण्याचे संस्कार आपल्यावर आहेत याची जाणीव ठेवून शिव भक्तांसाठी संवेदनशीलतेने याकडे बघायला हवे...
#LokmatAkola #LokmatSamvadAkola #KiranAgrawalLokmat
Saturday, August 20, 2022
Thursday, August 18, 2022
जन गण मन अधिनायक जय हे ...
August 17, 2022
जन गण मन अधिनायक जय हे ...
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शासनाच्या स्वराज्य महोत्सवांतर्गत आज बुधवार दि.17 ऑगस्ट रोजी सकाळी ठीक 11 वाजता लोकमतच्या पुढाकाराने अकोला लोकमत कार्यालयासमोर राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करून भारत मातेचा जयजयकार करण्यात आला.
याप्रसंगीची अभिमान व आनंद चित्रे...
#LokmatAkola #KiranAgrawal
#स्वातंत्र्याचा_अमृत_महोत्सव2022 #स्वराज्य_महोत्सव
'डाकीया डाक लाया'चा आठव...
August 15, 2022
'डाकीया डाक लाया'चा आठव...
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करतोय, या 75 वर्षांच्या वाटचालीत विविध क्षेत्रात खूप मोठी प्रगती झाली.
पोस्ट / टपाल खात्यानेही कात टाकली...
टपाल पोहोचविण्याचं काम आता काहीसं मागे पडलय, कारण संपर्काची अन्य व गतिमान साधनं आलीत, पण सेवा थांबलेली नाही.
खूप पूर्वी हेमामालिनी यांचा 'पलको की छाव मे' हा सिनेमा आला होता. त्यात 'डाकिया डाक लाया...' असं एक गाणं होतं. ते आजही मनात रुंजी घालतं.
कारण, त्या काळात आजच्यासारखी मोबाईल क्रांती झालेली नव्हती, की गुगल पे - फोन पे सारखी सुविधा वा कुरिअर सर्व्हिस नव्हती. त्यामुळे लहानपणी शिक्षणासाठी बाहेर असताना वडिलांकडून येणारे टपाल व मनिऑर्डरसाठी होणारी तळमळ आणि साखरपुडा झाल्यानंतर लग्न होई पर्यंत 'ती'च्या पत्रासाठी लागून राहणारी हुरहूर अनुभवलेली आमची पिढी.
गल्लीच्या कोपऱ्यावर पोस्टमन दादाच्या सायकलची घंटी ऐकू आली की ते घरी येईपर्यंत त्याच्यावर नजर खिळवून ठेवणारे आम्ही..
ते आमच्या दारी न येता पुढे निघून गेले की खिन्न होणारे आम्ही...
एक वेगळीच आस व आनंद होता त्यात.
नाशिक लोकमतमध्ये प्रकाश साबरे, शैलेश कर्पे, बाळासाहेब दराडे आदी काही सहकारी लाभले, जे टपाल खात्याशी संबंधित आहेत.
नाशकात सुमारे दीड दशकाहून अधिक काळापासून रक्ताच्या नात्यापेक्षा अधिक आपलेपणाने शेजारधर्म निभावणाऱ्या सौ. सुरेखा क्षिरसागर वहिणी टपाल खात्यातच सेवेत आहेत...
****
... हे सारे आज आठवण्याचे व येथे नमूद करण्याचे कारण म्हणजे, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अकोला मुख्य पोस्ट कार्यालयात अकोला विभागाचे वरिष्ठ डाक अधीक्षक श्री संजय आखाडे यांच्या पुढाकाराने आयोजित टपाल खात्यातील कार्यकुशल सहकारिंच्या गुणगौरव सोहळ्यात प्रमुख पाहुणा म्हणून सहभागी होण्याची संधी लाभली.
त्यानिमित्त टपाल खात्याशी संबंधित या आठवणींचा कल्लोळ मनात उठला.
आज काळ बदलला तशी साधने बदलली, पण त्या संबंधीच्या आव्हानांना तोंड देत व विविध नवनवीन सेवा सुरू करीत टपाल खात्याने सामान्यांच्या सेवेचे कार्य अविरत चालविले आहे.
विशेष आनंदाचा भाग म्हणजे, नाशिकच्या मखमलाबाद परिसरात भल्या पहाटे वृत्तपत्र वितरणाचे काम करून अतिशय प्रतिकूलतेत UPSC च्या परीक्षेत सुयश संपादन केलेल्या व पोस्टल डिपार्टमेंटच्या माध्यमातून नागरी सेवेत दाखल झालेल्या संजय आखाडे यांनी अडगळीत पडलेल्या या खात्याला येथे नवा चेहरा देण्याचा प्रयत्न चालविल्याचे दिसून आले.
विविध सरकारी सेवा व योजनांमध्ये अकोल्याची टपाल सेवा त्यांच्या नेतृत्वात राज्यात लक्षवेधी ठरली आहे.
त्यामुळे आखाडे यांच्या पुढाकाराने व वरिष्ठ डाकपाल हरिबाबू वंदना, उप विभागीय डाक प्रमुख सुनील हिवराळे, एन. एस. बावस्कार, एस. एस. नानीर आदींच्या मुख्य उपस्थितीत ऐतिहासिक भव्य दगडी वास्तूमध्ये टपाल खात्यातील पोस्टमन व अन्य सहकारीचा गौरव करताना खूप समाधान वाटले...
#AkolaPostOffice #KiranAgrawal
Tuesday, August 16, 2022
नतमस्तक आहोत आम्ही...
August 15, 2022
नतमस्तक आहोत आम्ही...
आजचा स्वातंत्र्यदिन खास आहे, कारण तो अमृत महोत्सवी आहे.
आपण आज जे स्वातंत्र्य उपभोगतो आहोत, आचार-विचार व अभिव्यक्तीचा मोकळा श्वास घेतो आहोत; ते स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान दिलेल्या सर्वच स्वातंत्र्य सेनानींच्या त्याग व बलिदानापुढे आम्ही नतमस्तक आहोत.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना
चला, आपण हे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी कटिबद्ध होऊया...
जय हिंद!
लोकमत अकोला कार्यालयातील ध्वजारोहणाप्रसंगीची ही काही अभिमान चित्रे...
#स्वातंत्र्याचा_अमृत_महोत्सव2022
#LokmatAkola #KiranAgrawalLokmat
Saraunsh published in Akola Lokmat on August 14, 2022
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20220814_2_2&fbclid=IwAR3cOua7kViYgZp30P3XUvL5niF4ncKcdn4ah5P7o7-mM0fhHPhjqxs3bnI
https://www.lokmat.com/editorial/lets-be-sensible-lets-be-human-a520-c310/?fbclid=IwAR3gNW79awsnPHshenE74rBvHT114L-TcD1Z9aDLlY5GRnGDGF_PEYa_tEg
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 2022 ...
August 13, 2022
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 2022
जन गण मन अधिनायक जय हे...
आमचा तिरंगा, आमचा अभिमान!
याची शान अबाधित राखण्यासाठी कटिबद्ध होऊया... जय हिंद!
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 2022
#KiranAgrawal
फौजींना सॅल्युट...
August 11, 2022
फौजींना सॅल्युट...
आज ज्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करीत आहोत त्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले आहे. स्वातंत्र्यासाठी संपूर्ण आयुष्य झोकुन देत ब्रिटिशांचा अननन्वित अत्याचार सहन केलेल्या या स्वातंत्र्य सेनानींचे योगदान अतुलनीय असे आहे. या सेनानींच्या त्याग व बलिदानाचे स्मरण करून देशाभिमानाचा संस्कार नवीन पिढीवर घडवावयास आपण कटिबद्ध होऊया.
स्वातंत्र्य सैनिकांनी मिळवून दिलेल्या या स्वातंत्र्याला अबाधित ठेवण्यासाठी सीमेवर लढणाऱ्या व जागता पहारा देणाऱ्या शूर सैनिकांची सेवा देखील मोलचीच आहे.
म्हणूनच, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना लोकमत अकोला आवृत्तीच्या रौप्य महोत्सवी वाटचाली अंतर्गत संवाद सत्रात माजी सैनिकांशी संवाद साधून, प्रातिनिधिक स्वरूपात त्यांनाही कृतज्ञतेचा सॅल्युट केला.
या सत्रात अमर जवान माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सुभाषराव म्हैसने, सचिव सेवानिवृत्त सुभेदार रमेश खंडारे, पुनर्नियुक्ती माजी सैनिक संघटनेचे वसंतराव चतरकर, जय जवान जय किसान संघटनेचे सुरेश लक्ष्मनसा वडे, शंकरराव देशमूख, मुरलीधर झटाले, अरुण मानकर, लक्ष्मनराव माेरे, सचिन देवरे, विजय खंडारे, रामरतन बुळुकले, प्रकाश राठाेड यांनी सहभाग घेतला़.
आम्ही नतमस्तक आहोत आपल्या सेवा व शौर्यापुढे... जय हिंद।।।
#LokmatAkola #LokmatSamwadAkola #KiranAgrawalLokmat
Tuesday, August 9, 2022
शिवार फुलले श्रावणात हे...
August 07, 2022
शिवार फुलले श्रावणात हे...
फार दिवसांनी गावी रावेरला आलो आणि शेतावर गेलो.
गावी आलो की शेतावर गेल्याशिवाय मन भरत नाही.
त्यामुळे बॅग घरी ठेवली अन लगेच पुतण्या अर्पितला घेऊन शेत गाठले.
भाटखेड्याचे इलायत खा पठाण यांच्याशी आमच्या कुटुंबाचे वाडवडीलांपासून संबंध. त्यामुळे तेच आमचे शेत बटाईने कसतात.
त्यांच्यासोबत चारी मेरा पालथ्या घालत शेत नजरेतून काढले.
थोडावेळ जोडी हाकत केळीच्या बागेत सऱ्याही पाडल्या.
सध्या तर निसर्गाचा श्रावणोत्सव सुरू असल्याने शिवार मस्त फुलले आहे.
शेती मातीतल्या आजच्या रविवारने येत्या काही दिवसांसाठी आनंद व समाधानाची बॅटरी फुल चार्ज करून दिली... खरेच काळ्या आईच्या कुशीतील आनंदाला अन्य कशाची सर नाही मित्रांनो!
#KiranAgrawal #RaverDiary
Saraunsh published in Akola Lokmat on August 07, 2022
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20220807_2_2&fbclid=IwAR1JvZCIjPuk8VBSWD8o6Tu2GF6QVwqlklPcR9VSPp3z0rP1rAi4HzoMLlc
https://www.lokmat.com/editorial/recklessness-in-the-government-health-system-exposed-a520-c310/?fbclid=IwAR0XXXdhVQjXcbV59zNFzQ1FAIpmznL_T-3Dz9Oq9gPH7EkY5qCp59N1SIE
क्रीडा वैभवाला जनाधारही गरजेचा...
August 04, 2022
क्रीडा वैभवाला जनाधारही गरजेचा...
बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चालविलेल्या चमकदार कामगिरीमुळे सध्या क्रीडा विश्वात आनंद व उत्साहाचे वातावरण आहे.
वऱ्हाडातील चिखलीची तलवारबाज गौरी सोळंके या स्पर्धांसाठी रवाना झाली असून तिची याकरीता निवड होणे हीच मोठी अभिमानाची बाब आहे.
या पार्श्वभूमीवर अकोल्यातील विविध खेळांचे मार्गदर्शक, प्रशिक्षकांसोबत अकोला 'लोकमत'च्या रौप्य महोत्सवी वाटचाली अंतर्गत घेण्यात येत असलेल्या संवाद सत्रात चर्चा केली.
क्रीडा विकासातील अडचणी जाणून घेतानाच खेळ व खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी काय काय करता येईल याबाबत मोकळेपणाने सर्वांनी मते मांडलीत. त्यांना प्रोत्साहनाचा जनाधार लाभण्याचीही गरज प्रतिपादिली.
आपण सारे मिळून त्यासाठी प्रयत्न करूया...
या संवाद सत्रात अकोला कबड्डी असोसिएशनचे सचिव वासुदेव नेरकर, विदर्भ कॅरेम असोसिएशनचे सचिव प्रभजीतसिंह बछेर, बॉक्सिंगचे राज्य क्रीडा प्रशिक्षक सतिशचंद्र भट, कुस्ती राज्य क्रीडा मार्गदर्शक तथा प्रशिक्षक लक्ष्मीशंकर यादव, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव भरत डिक्कर, जिल्हा बॉडी बिल्डींग असोसिएशनचे अध्यक्ष संजय देशमुख, अकोला हॉकी असोसिएशनचे सचिव धीरज चव्हाण, जिल्हा ॲथेलेटिक्स संघटनेचे कोषाध्यक्ष कपील ढोके यांनी सहभाग नोंदविला.
#LokmatAkola #AkolaSports #LokmatSamwadAkola #KiranAgrawalLokmat
Subscribe to:
Posts (Atom)