Monday, January 2, 2023

शाळाबाह्य कामाचा व्याप अन तापही ...

Dec. 22, 2022 शाळाबाह्य कामाचा व्याप अन तापही ...
शालेय शिक्षणाकडे नवीन पिढीच्या भविष्याचा पाया म्हणून पाहिले जाते, पण या पायरीवरील मुख्याध्यापक वा शिक्षक आदींना शिक्षणापेक्षा शाळाबाह्य कामातच इतके जुंपले जाते, की त्यांनी शिकवावे तरी कधी असा प्रश्न निर्माण होतो. एकीकडे शिक्षणाचा दर्जा खालावत असल्याची तक्रार वाढत असताना, दुसरीकडे एकूणच शिक्षण क्षेत्राकडे जितक्या गांभीर्याने बघायला हवे व त्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्या ते पुरेशा प्रमाणात होताना दिसत नाही. अनेकविध अडचणीतून मार्ग काढत व कामाचा व्याप सांभाळत ज्ञानार्जनाचे काम करणाऱ्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी आपल्या भावना अकोला लोकमतच्या रौप्य महोत्सवी वाटचालीनिमित्त आयोजित संवाद सत्रात व्यक्त केल्या .
विदर्भ मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शत्रुघ्न बिरकड, जिल्हा कार्याध्यक्ष विजय ठोकळ, जिल्हा सचिव दिनेश तायडे, विदर्भ सहसचिव गजेंद काळे, महानगर सचिव प्रा. प्रकाश डवले, कोषाध्यक्ष माधवराव विखे, बाळापूर तालुकाध्यक्ष अरुण दातकर, सचिव राजाभाऊ इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष आनंद साधू, महिला प्रतिनिधी नीलिमा वहाडे, सदस्य मुकेश गव्हाणकर आदींनी यात सहभाग घेतला. #LokmatAkola #LokmatSamvadAkola #KiranAgrawalLokmat

No comments:

Post a Comment