Wednesday, January 25, 2023

पॅरेंटिंग बनलेय अवघड..

Jan.08, 2023 पॅरेंटिंग बनलेय अवघड..
शाळा महाविद्यालयांची स्नेहसंमेलने म्हटलीत की पारंपरिक मनोरंजनांचे कार्यक्रम डोळ्यासमोर येतात. पण अकोटसारख्या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या आस्की पब्लिक स्कूलने स्नेहसंमेलन घेताना लोकमत कॅम्पस क्लबच्या सहकार्याने पालकांसाठी पॅरेंटिंगचा कार्यक्रम घेतला. हल्ली घरातील मुलांसोबत नेमके वागावे तरी कसे, असा जवळपास साऱ्याच पालकांना पडलेला प्रश्न असतो. त्यांच्या आवडी निवडी बदलल्या, सवयी बदलल्या, त्यांचे आयडॉल्सही बदलले; त्यामुळे त्यांच्याशी मॅच व्हायचे म्हणजे अवघड बनत चालले आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर मुलांसाठी घरदार, जमीन जुमला, गाडी बंगला आदींमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा अगोदर थेट मुलांमध्येच भावनिक, मानसिक, मित्रत्वाची गुंतवणूक करा. पालक म्हणून पाल्यांकडे अधिकार गाजवून पाहण्याऐवजी त्यांचे मित्र बनून संवाद साधा असा सल्ला या कार्यक्रमाचे उद्घाटन करताना दिला.
संस्थेचे चेअरमन श्री मिलिंद झाडे, सचिव श्री नितीन झाडे व त्यांच्या शिक्षक वृंदाने स्वयंपूर्ण विद्यार्थी व सुजाण पालकत्वासाठी चालविलेले प्रयत्न कौतुकास्पद वाटले. #LokmatAkola #CampusClub #ASKIPublicSchool #KiranAgrawalLokmat

No comments:

Post a Comment