Monday, January 2, 2023

डॉक्टरांवर विश्वास गरजेचा...

Dec. 24, 2022 डॉक्टरांवर विश्वास गरजेचा...
वैद्यकीय क्षेत्रातील कामकाज दिवसेंदिवस अधिक जोखमीचे होत चालले आहे. एकीकडे रुग्णाचा जीव वाचवण्याची धडपड तर दुसरीकडे भरपूर प्रयत्न करूनही त्यात अपयश आले तर दवाखान्यांवर होणारे हल्ले... अशी ही जोखीम आहे. दुसरे म्हणजे, रुग्ण आता इतके सज्ञान झाले आहेत की तेच ट्रीटमेंट काय करायची याचा सल्ला देतात, अर्धवट माहितीच्या आधारावरील या सूचना व अपेक्षांमुळेही गोंधळ होतो. यासाठी डॉक्टरांवर विश्वास गरजेचा आहे. रुग्ण लवकर बरा व्हावा, असेच सर्व डॉक्टरांचे प्रयत्न असतात. लोकमत अकोला आवृत्तीच्या रौप्य महोत्सवी वाटचालीनिमित्त आयोजित संवाद सत्रात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अकोला शाखेचे पदाधिकारी व डॉक्टरांनी मनमोकळ्या भावना व्यक्त केल्या. आयएमए शाखेचे अध्यक्ष बालरोग तज्ञ डॉ. अनुप कोठारी, डॉ. शिवाजी ठाकरे, डॉ. सागर भांबेरे, डॉ. श्रेय अग्रवाल, डॉ. विक्रांत इंगळे यांनी या चर्चेत सहभाग घेतला #LokmatAkola #LokmatSamvadAkola

No comments:

Post a Comment