Monday, January 2, 2023

ग्रामविकासाची नवी आशा, नवी दिशा...

Jan. 01, 2023 ग्रामविकासाची नवी आशा, नवी दिशा...
गावकारभार व तेथील विकास थेट ग्रामपंचायतवर निर्भर असून, त्यात सरपंच हा अतिशय महत्त्वाचा घटक असतो. गावकीचे राजकारण हे मोठे विचित्र असते, तेथे कारभार हाकणे हे त्यामुळेच कठीण बनते. पण यंदा थेट गावकऱ्यांच्या मतदानाने सरपंच निवडी झाल्या त्यामुळे विकासासाठी पक्षीय मतभेदाचे राजकारण व पॅनलबाजी आड येण्याची शक्यता कमीच आहे. विशेष म्हणजे, मतदार यादीत नाव आल्या आल्या निवडणूक लढवून थेट सरपंचपदी निवडून आलेल्या व त्यातही शिकल्या सवरलेल्या नवोदितांचा भरणा मोठा आहे. त्यामुळे आशेने अशांकडे पाहिले जात आहे. म्हणूनच, नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर लोकमत अकोला आवृत्तीच्या रौप्य महोत्सवी वाटचालीनिमित्त आयोजित संवाद सत्रात प्रातिनिधिक स्वरूपात निमंत्रित नवोदित सरपंचांच्या आशा व त्यांच्या वाटचालीची दिशा जाणून घेतली. अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी श्री सौरभ कटीयार यांनी यावेळी मार्गदर्शन करून नव्या उमेदीने व संकल्पनांनी पुढे येत गावाचा विकास घडवून आणण्याचा मोलाचा सल्ला दिला.
यावेळी लोकमतचे युनिट हेड आलोककुमार शर्मा, समाचारचे प्रभारी अरुण कुमार सिन्हा यांच्यासह अखिल भटकर, वैभव कोरडे, संतोष खोटरे, कैलास मनतकार, सीमा देवानंद जामनिक, विकास वानखडे, विजय बावणे, किशोर पांडव, सतीश भाले, अंकुश इंगळे, प्रिया सराटे, पंकज सावळे, सोनू सागर उपरवट आदींनी सहभाग घेतला #LokmatAkola #LokmatSamvadAkola

No comments:

Post a Comment