Monday, January 2, 2023

डॉ. भाऊसाहेब देशमुख यांना वंदन...

Dec. 27, 2022 डॉ. भाऊसाहेब देशमुख यांना वंदन...
स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची आज जयंती. शेती व शिक्षणाच्या क्षेत्रात खूप मोठे काम उभे केलेल्या भाऊसाहेबांनी वैदिक वाडमयातील धर्माचा उगम व विकास या विषयावरील प्रबंध सादर करून डॉक्टरेट मिळविली. शेतकरी संघ, ग्रामोद्धार मंडळ, अखिल भारतीय दलित संघ यासारख्या विविध संस्था स्थापन करून समस्त समाजाला पुढे नेण्याची भूमिका बजावणाऱ्या या नेत्याच्या ज्ञानाच्या कक्षा किती रुंद होत्या हे यावरून लक्षात यावे. भारत कृषक समाजाची स्थापना करून बळीराजाला सन्मानाने व सक्षमपणे उभे करण्यासाठी अतिशय मोलाची भूमिका बजावणारे दूरदृष्टीचे नेते म्हणून भाऊसाहेबांचे कार्य मी वाचून व जाणून होतोच, त्यामुळे अकोल्यात आल्यावर कार्यालयीन सहकारींसमवेत त्यांच्याच नावाने उभारलेल्या व त्यांची चिरंतन स्मृती जपणाऱ्या डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातील स्मृती केंद्राला आवर्जून भेट दिली. यावेळी येथील भाऊसाहेबांच्या पुतळ्याला वंदन केले, त्याप्रसंगीचे छायाचित्र... #KiranAgrawalLokmat

No comments:

Post a Comment