Saturday, January 21, 2023

गजल नवाजांची हृदय भेट...

Jane. 11, 2023 गजल नवाजांची हृदय भेट...
दहावे अखिल भारतीय गजल संमेलन अकोल्यात मोठ्या थाटात संपन्न झाले. 'गजल नवाज' उपाधिने गौरविले गेलेले भीमराव पांचाळे यांच्यावरील प्रेमातून अकोलेकरांच्या सहकार्याने हे संमेलन पार पडले. लोकमतने या संमेलनाला दिलेल्या प्रसिद्धीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भीमराव पांचाळे कुटुंबियांसह लोकमत कार्यालयात आले. खूप मोकळेपणे बोलले. फक्त शब्द आणि सुरातच नव्हे, तर जगण्यातही संवेदना जपणारा कलावंत यानिमित्ताने पुन्हा अनुभवता आला. गजल कशी हृदयाचा ओलावा व मनाची वेदना घेऊन आकारास येते, हे भीमा दादांशी बोलतांना अधिक सुलभतेने उमगले. पुढच्या भेटीत छान मैफिल जमवूया, असे आश्वस्त करून ते मुंबईकडे परतले. जाताना 'गजलसरा' हा गजल संग्रह व त्यांच्या स्वतःच्या काही सीडीज भेट दिल्या.
दादांसोबतच, विविध मान्यवर गजलकारांच्या गायन शैलीचा अभ्यास करून पीएचडी मिळविलेली त्यांची कन्या डॉ. भाग्यश्री पांचाळे, सौ. गीता पांचाळे, एकपात्री कलाकार रमेश थोरात, समाचारचे प्रभारी अरुण कुमार सिन्हा, संपादकीय सहकारी राजू चिमणकर, राजरत्न शिरसाट आदी समवेतची छायाचित्रे... #LokmatAkola #LokmatBhimraoPanchal #KiranAgrawalLokmat

No comments:

Post a Comment