Saturday, January 21, 2023

ज्ञानातील विज्ञान महत्वाचे...

Jan. 14, 2023 ज्ञानातील विज्ञान महत्वाचे...
विज्ञान प्रदर्शनांना वाढता प्रतिसाद पाहता विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक जाणीवा व जिज्ञासा वाढत आहेत असेच म्हणता यावे. लोकमत कॅम्पस क्लब व ग्रॅव्हीटी क्लासेसतर्फे अकोल्यात आयोजित विज्ञान प्रदर्शनात 450पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभागी होत 135 प्रयोग सादर केलेत. विविध शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे, प्रदर्शनातील सहभागासाठीच्या निर्धारित वयात बसत नसतानाही प्रभात किड्स मधील सीनियर केजीचा विद्यार्थी राजवीर भिसे याने पालक व शाळेकडे हट्ट धरून या प्रदर्शनात सहभागी होण्याची संधी मिळविली व सोलरवर चालणारी बोट प्रदर्शित करून त्याने सर्वांची वाहवा मिळविली, म्हणूनच बक्षीस वितरण प्रसंगी या गोंडस बाल वैज्ञानिकाला कडेवर उचलून घेण्याचा मोह आवरता आला नाही. या प्रदर्शनाच्या बक्षीस वितरण समारंभात लोकमतचे युनिट हेड आलोक कुमार शर्मा व ग्रॅव्हिटी क्लासचे प्रा विवेक प्रजापती, मोहन हातेकर, परीक्षक व विद्यार्थ्यांसमवेतची आठवणचित्रे...
#LokmatAkola #KiranAgrawalLokmat #LokmatScienceExhibition

No comments:

Post a Comment