Monday, January 2, 2023

अकोल्याला समृद्धीकडे नेऊ पाहणारे #रॅम्पकॉन2022

Dec 24, 2022 अकोल्याला समृद्धीकडे नेऊ पाहणारे #रॅम्पकॉन2022
बांधकाम व गृह सजावट करायचे म्हटले म्हणजे तेथे अनेक शक्यता व आवडीनिवडी येतात. नेमके काय व कसे करायचे हे बऱ्याचदा सुचत नाही. विविध प्राडक्ट्सची दुकाने धुंडाळायची तरी किती असाही प्रश्न पडतो. या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी तसेच गेल्या काही वर्षात कोरोनाच्या महामारीमुळे थबकलेल्या अर्थकारणाला चालना देण्यासाठी असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स ( #ACCA ) अकोला शाखा व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर्स ( #IIA ) अकोला शाखेच्या संयुक्त विद्यमाने #RAMPCon2022 प्रदर्शनाचे आयोजन अकोल्यातील मुंगीलाल बाजोरिया शाळेच्या मैदानावर करण्यात आले आहे. मुंबई, पुणे सारख्या महानगरांमध्ये होणाऱ्या प्रदर्शनाला तोडीस तोड असे हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. शंभरपेक्षा अधिक विविध प्रॉडक्ट्सची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध असलेल्या या रॅम्पकॉन2022 प्रदर्शनमध्ये बांधकाम व गृह सजावटीशी संबंधित अनेक नवीन प्रयोग व साहित्याची माहिती लाभते.
आयोजक इंजि. पंकज कोठारी यांच्या आग्रहामुळे या प्रदर्शनाला भेट दिली. आर्किटेक्ट असोसिएशनचे चेअरमन आर्कि. सुमित अग्रवाल, इंजि. अनुराग अग्रवाल, इंजि. इस्माईल नजमी, इंजि. शेखर मुखेडकर, आर्कि. कमलेश कृपलानी, आर्कि. वैभव शाह आदी पदाधिकारी व त्यांची संपूर्ण टीम या प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहे. या भेटी दरम्यान अकोला लोकमतचे युनिट हेड आलोक कुमार शर्मा, लोकमत समाचारचे प्रभारी अरुण कुमार सिन्हा, पंकज कोठारी आदी मान्यवरांसोबतची आठवण चित्रे... #KiranAgrawalLokmat

No comments:

Post a Comment