Tuesday, January 10, 2023

आपले व शरीराचे वय वेगळे...

Jan. 02, 2023 आपले व शरीराचे वय वेगळे...
जन्मतारखेनुसार आपण आपले वय मोजतो, परंतु शरीराची अवस्था व व्यवस्था पाहता त्याचे म्हणून एक वय असते; जे अतिशय महत्त्वाचे आहे. कागदपत्रातील वय तरुण असेल, परंतु शरीराची अवस्था थकल्यामुळे शरीराचे वय जास्त असेल तर काळजी घेणे गरजेचे बनते. वॉकिंग, स्विमिंग व सायकलिंग अशा तिन्ही प्रकारात निपुण असलेले व योग तसेच संतुलित आहाराद्वारे ' बॉडी फिट तर लाईफ हिट' असा संदेश देणारे अकोल्यातील प्रख्यात नेत्रतज्ञ डॉ. जुगल चिरानीया यांनी याच विषयावर आरोग्यविषयक जनजागृती चालविली आहे.
ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, लोकमतचे संस्थापक, संपादक जवाहरलालजी दर्डा तथा श्रद्धेय बाबूजी यांच्या जन्मशताब्दी निमित्त अकोला येथे लोकमत व रोटरी क्लब नॉर्थ तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, यातही डॉ. चिरानिया यांनी या संदर्भातले महत्त्व पटवून दिले. याप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभीये, रोटरी क्लब अकोला नॉर्थचे अध्यक्ष दीपक चांडक, सचिव महेश बाहेती तसेच प्रकल्प प्रमुख डॉ. जुगल चिराणिया व डॉ. गजानन वाघोडे, लोकमतचे युनिट हेड आलोककुमार शर्मा, समाचारचे प्रभारी अरुण कुमार सिन्हा आदी प्रामुख्याने उपस्थित होते. #LokmatAkola #JawaharlalDardaBirthCentury #KiranAgrawalLokmat

No comments:

Post a Comment