Tuesday, January 10, 2023

संभादादाने जागविले रोमांच...

Jan. 09, 2023 संभादादाने जागविले रोमांच...
विचारांना वा भावनांना शब्दांची आणि गळ्याचीही जोड लाभते तेव्हा त्याची परिणामकारकता नक्कीच वाढून जाते. आंबेडकरी चळवळीतून निखरलेले व आपल्या पहाडी आवाजात शाहिरी सादर करून रोमांच उभे करणारे संभाजी भगत हे व्यक्तिमत्व तशातलेच एक. एका बैठकीनिमित्त अकोल्यात आले असता त्यांनी लोकमत कार्यालयास सदिच्छा भेट दिली, यावेळी मनमोकळ्या गप्पा तर झाल्याच शिवाय त्यांच्यातील संवेदनशीलताही दिसून आली. महापुरुषांच्या विचारांना जाती व धर्माची कुंपणे लावण्यात आल्याने व्यापक समाजाचे नुकसान होत असल्याबद्दल खंत व्यक्त करून वैचारिक प्रदूषण दूर करण्याची गरज त्यांनी बोलून दाखविली. संविधानात निर्देशित समता, बंधुता व न्यायाच्या मूलभूत तत्वांची शिकवण देण्यासाठी माणुसकीची शाळा आरंभिल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी छत्रपती शिवरायांच्या शौर्याची महती सांगणाऱ्या पोवाडयासह महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवरील भीम गीतेही आपल्या पहाडी आवाजात सादर करून त्यांनी छोटेखानी मैफिल खुलवली. 'हिटलर के साथी, जनाजो के बाराती पुछते नही इन्सा को, पूछते धर्म और जाती ...' या गीताने तर सारे वातावरण भारावून टाकले. विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी, शेतकरी जागर मंचचे जिल्हा संयोजक प्रशांत गावंडे त्यांच्या समवेत उपस्थित होते.
धन्यवाद संभादादा... 🙏🙏 #LokmatAkola #KiranAgrawalLokmat #LokmatSambhajiBhagat

No comments:

Post a Comment