At present, working as a Executive Editor of Lokmat, Akola(Maharashtra). Known as a "Saraunshkar", because "Saraunsh" columns are written every Sunday on political and social issues. For excellence in journalism, honoured with Shanti Bhushan Puraskar, Girna Gaurav, Darna Gaurav, Shiva Gaurav, Vivekanand Yuva Gaurav, Maharashtra Govt Vikas Varta etc. Also awarded by "AGRASHRI". Participates in various debates on news channels.
Monday, January 30, 2023
Saraunsh published in Akola Lokmat on Jan, 29, 2023
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20230129_2_3&fbclid=IwAR1xsqIOAcBUzXsCM9WGdZGSAlCoyyXiUVPYYiG2wtqFQFoljXo6NW2ZjL0
https://www.lokmat.com/editorial/an-alliance-with-shiv-sena-is-possible-for-the-vanchit-bahujan-aaghadi-a520-c310/?fbclid=IwAR3AvuDJ0UVi83un8owFYFx1JBP6Cs6nh1Cg13ho1wfD3UQ50vCQ9r5pRf4
प्रजासत्ताक दिन @लोकमत भवन अकोला ..
Jan. 26, 2023
प्रजासत्ताक दिन @लोकमत भवन अकोला ..
लोकमत समाचार मधील वरिष्ठ संपादकीय सहकारी श्री गजानन अवस्थी जी यांच्या हस्ते ध्वजारोहण व ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, लोकमतचे संस्थापक संपादक स्व जवाहरलालजी दर्डा तथा श्रद्धेय बाबूजी यांना वंदन.
विशेष म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला समूहाचे संपादकीय संचालक मा. श्री. करण बाबूजी दर्डा व समूह संपादक मा श्री विजय बाविस्कर सर यांनी घोषित केलेल्या समूह पातळीवरील स्टार परफॉर्मरच्या यादीत हॅलो अकोलाची निवड झाल्याने हॅलो हेड श्री राजेश शेगोकार जी तसेच हॅलो स्टार रिपोर्टर श्री नितीन गव्हाळे व हॅलो अकोलाच्या सहकारींचा या समारंभात विशेष गौरव करण्यात आला, या आनंद क्षणाची छायाचित्रे...
#LokmatAkola #LokmatRepublicDay2023 #KiranAgrawalLokmat
Wednesday, January 25, 2023
पॅरेंटिंग बनलेय अवघड..
Jan.08, 2023
पॅरेंटिंग बनलेय अवघड..
शाळा महाविद्यालयांची स्नेहसंमेलने म्हटलीत की पारंपरिक मनोरंजनांचे कार्यक्रम डोळ्यासमोर येतात. पण अकोटसारख्या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या आस्की पब्लिक स्कूलने स्नेहसंमेलन घेताना लोकमत कॅम्पस क्लबच्या सहकार्याने पालकांसाठी पॅरेंटिंगचा कार्यक्रम घेतला.
हल्ली घरातील मुलांसोबत नेमके वागावे तरी कसे, असा जवळपास साऱ्याच पालकांना पडलेला प्रश्न असतो. त्यांच्या आवडी निवडी बदलल्या, सवयी बदलल्या, त्यांचे आयडॉल्सही बदलले; त्यामुळे त्यांच्याशी मॅच व्हायचे म्हणजे अवघड बनत चालले आहे.
या साऱ्या पार्श्वभूमीवर मुलांसाठी घरदार, जमीन जुमला, गाडी बंगला आदींमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा अगोदर थेट मुलांमध्येच भावनिक, मानसिक, मित्रत्वाची गुंतवणूक करा. पालक म्हणून पाल्यांकडे अधिकार गाजवून पाहण्याऐवजी त्यांचे मित्र बनून संवाद साधा असा सल्ला या कार्यक्रमाचे उद्घाटन करताना दिला.
संस्थेचे चेअरमन श्री मिलिंद झाडे, सचिव श्री नितीन झाडे व त्यांच्या शिक्षक वृंदाने स्वयंपूर्ण विद्यार्थी व सुजाण पालकत्वासाठी चालविलेले प्रयत्न कौतुकास्पद वाटले.
#LokmatAkola #CampusClub #ASKIPublicSchool #KiranAgrawalLokmat
Saraunsh published in Akola Lokmat on Jan. 22, 2023
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20230122_2_2&fbclid=IwAR3i5hJRVGnJNE-7vKA5A2T60mhu-ZvtWtXXw6rTvjKvV2FMwjnXdd8O-PQ
https://www.lokmat.com/editorial/corruption-has-reduced-or-the-activities-have-been-disrupted-a520-c310/?fbclid=IwAR2xL0A-Dk2iwWsklWH6ez52EafTw_M9cjQ9YPIfcWHH2ADaaS83XhSHiJQ
Tuesday, January 24, 2023
Saturday, January 21, 2023
राष्ट्रसंतांच्या विचारांचा जागर...
Jan. 20, 2023
राष्ट्रसंतांच्या विचारांचा जागर...
स्वतःच्या राजकीय व आर्थिक भल्यासाठी आज राष्ट्रवाद व राष्ट्रधर्माच्या व्याख्या बदलून सांगितल्या जात आहेत. अशा स्थितीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सर्वसमावेशक, सम्यक विचारांचा जागर घडून येणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने अकोला येथे होत असलेले 9वे राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन महत्वाचे ठरावे.
या संमेलनाच्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणा म्हणून जाण्याची व बोलण्याची संधी लाभली.
विविध पक्षांतर्फे आज चलो गाव की ओर... म्हणून मोहिमा राबविल्या जात आहेत, परंतु तुकडोजी महाराजांनी फार पूर्वीच आपल्या ग्रामगीतेतून हा संदेश देऊन ग्रामोन्नतीचे मार्ग सांगून ठेवले आहेत. या ग्रामगीतेची पारायणे गावोगावी व्हायला हवीत.
राष्ट्रसंतांचे विचार जनमानसात रुजवण्यासाठी आयुष्य खर्ची घालणारे आचार्य श्री हरिभाऊ वेरुळकर गुरुजी व राष्ट्रीय प्रबोधनकार, सप्त खंजेरी वादक श्री सत्यपाल जी महाराज यांच्यासह उद्घाटक आमदार अमोल मिटकरी, संमेलनाध्यक्ष श्री चंदू भाऊ पाटील मारकवार, स्वागताध्यक्ष डॉ. सचिन नाना म्हैसने, माजी अध्यक्ष जावेद पाशा, प्रभात किड्सचे संचालक डॉ गजानन नारे, कृष्णा अंधारे, डॉ. संतोष हुशे, प्रशांत गावंडे, शुकदास महाराज आदी मान्यवर विचारपीठावर उपस्थित होते.
वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सेवा समितीचे डॉ. रामेश्वर बरगट व त्यांच्या टीमने यासाठी घेतलेले परिश्रम व संत विचारांच्या रुजवणुकीसाठी चालविलेले प्रयत्न खरेच कौतुकास्पद आहेत.
डॉ. बरगट यांच्या प्रेमळ आग्रहापोटी येथे जाणे झाले व मान्यवरांच्या सहवासाची संधी लाभली, त्यासाठी Thank you Dr. Bargat ji... #जयगुरु
#RashtrsantTukdojiMaharajVicharSahityaSammelan #KiranAgrawal
Saraunsh published in Akola Lokmat on Jan. 15, 2023
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20230115_2_3&fbclid=IwAR1k18sr3QLbBch6joWQ1uMdK4K6IQh1mJ_7KSsmHRGml-TY1vc2jXXheNA
https://www.lokmat.com/editorial/march-is-near-but-the-works-are-stuck-a520-c310/?fbclid=IwAR1QF_jo-2VgTj5Dk40xcUl6sdyLpygWFqr0Ci6QpCVClVAkmL36awgtqzA
ज्ञानातील विज्ञान महत्वाचे...
Jan. 14, 2023
ज्ञानातील विज्ञान महत्वाचे...
विज्ञान प्रदर्शनांना वाढता प्रतिसाद पाहता विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक जाणीवा व जिज्ञासा वाढत आहेत असेच म्हणता यावे.
लोकमत कॅम्पस क्लब व ग्रॅव्हीटी क्लासेसतर्फे अकोल्यात आयोजित विज्ञान प्रदर्शनात 450पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभागी होत 135 प्रयोग सादर केलेत. विविध शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
विशेष म्हणजे, प्रदर्शनातील सहभागासाठीच्या निर्धारित वयात बसत नसतानाही प्रभात किड्स मधील सीनियर केजीचा विद्यार्थी राजवीर भिसे याने पालक व शाळेकडे हट्ट धरून या प्रदर्शनात सहभागी होण्याची संधी मिळविली व सोलरवर चालणारी बोट प्रदर्शित करून त्याने सर्वांची वाहवा मिळविली, म्हणूनच बक्षीस वितरण प्रसंगी या गोंडस बाल वैज्ञानिकाला कडेवर उचलून घेण्याचा मोह आवरता आला नाही.
या प्रदर्शनाच्या बक्षीस वितरण समारंभात लोकमतचे युनिट हेड आलोक कुमार शर्मा व ग्रॅव्हिटी क्लासचे प्रा विवेक प्रजापती, मोहन हातेकर, परीक्षक व विद्यार्थ्यांसमवेतची आठवणचित्रे...
#LokmatAkola #KiranAgrawalLokmat #LokmatScienceExhibition
राजमाता माँसाहेब जिजाऊंना त्रिवार मानाचा मुजरा !!!
Jan. 12, 2023
राजमाता माँसाहेब जिजाऊंना त्रिवार मानाचा मुजरा !!!
हिंदवी स्वराज्याचा पाया रचणाऱ्या स्वराज्य प्रेरीका राजमाता माँ जिजाऊसाहेब यांची जन्मभूमी सिंदखेड राजा म्हणजे राष्ट्रप्रेम, शौर्य, धैर्य, अभिमान व स्वाभिमानाचे स्फुल्लिंग चेतविणारे मातृतीर्थ.
कोरोना संकटकाळाच्या तीन वर्षातील विश्रांतीनंतर आज माँसाहेबांच्या जन्मोत्सवानिमित्त मातृतीर्थावर जनसागर लोटला.
माँसाहेबांना वंदन करून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी त्यांच्या जन्मोत्सवानिमित्त लोकमतने प्रकाशित विशेषांक त्यांच्या चरणी अर्पण केला.
राजे लखोजीराव जाधव यांचे 16वे वंशज शिवाजी दत्तात्रय राजे जाधव यांच्या हस्ते लोकमत विशेषांकाचे प्रकाशन झाले.
#LokmatAkola #KiranAgrawalLokmat #LokmatRajmataJijauVisheshank
गजल नवाजांची हृदय भेट...
Jane. 11, 2023
गजल नवाजांची हृदय भेट...
दहावे अखिल भारतीय गजल संमेलन अकोल्यात मोठ्या थाटात संपन्न झाले. 'गजल नवाज' उपाधिने गौरविले गेलेले भीमराव पांचाळे यांच्यावरील प्रेमातून अकोलेकरांच्या सहकार्याने हे संमेलन पार पडले.
लोकमतने या संमेलनाला दिलेल्या प्रसिद्धीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भीमराव पांचाळे कुटुंबियांसह लोकमत कार्यालयात आले. खूप मोकळेपणे बोलले.
फक्त शब्द आणि सुरातच नव्हे, तर जगण्यातही संवेदना जपणारा कलावंत यानिमित्ताने पुन्हा अनुभवता आला.
गजल कशी हृदयाचा ओलावा व मनाची वेदना घेऊन आकारास येते, हे भीमा दादांशी बोलतांना अधिक सुलभतेने उमगले.
पुढच्या भेटीत छान मैफिल जमवूया, असे आश्वस्त करून ते मुंबईकडे परतले. जाताना 'गजलसरा' हा गजल संग्रह व त्यांच्या स्वतःच्या काही सीडीज भेट दिल्या.
दादांसोबतच, विविध मान्यवर गजलकारांच्या गायन शैलीचा अभ्यास करून पीएचडी मिळविलेली त्यांची कन्या डॉ. भाग्यश्री पांचाळे, सौ. गीता पांचाळे, एकपात्री कलाकार रमेश थोरात, समाचारचे प्रभारी अरुण कुमार सिन्हा, संपादकीय सहकारी राजू चिमणकर, राजरत्न शिरसाट आदी समवेतची छायाचित्रे...
#LokmatAkola #LokmatBhimraoPanchal #KiranAgrawalLokmat
Tuesday, January 10, 2023
संभादादाने जागविले रोमांच...
Jan. 09, 2023
संभादादाने जागविले रोमांच...
विचारांना वा भावनांना शब्दांची आणि गळ्याचीही जोड लाभते तेव्हा त्याची परिणामकारकता नक्कीच वाढून जाते.
आंबेडकरी चळवळीतून निखरलेले व आपल्या पहाडी आवाजात शाहिरी सादर करून रोमांच उभे करणारे संभाजी भगत हे व्यक्तिमत्व तशातलेच एक.
एका बैठकीनिमित्त अकोल्यात आले असता त्यांनी लोकमत कार्यालयास सदिच्छा भेट दिली, यावेळी मनमोकळ्या गप्पा तर झाल्याच शिवाय त्यांच्यातील संवेदनशीलताही दिसून आली.
महापुरुषांच्या विचारांना जाती व धर्माची कुंपणे लावण्यात आल्याने व्यापक समाजाचे नुकसान होत असल्याबद्दल खंत व्यक्त करून वैचारिक प्रदूषण दूर करण्याची गरज त्यांनी बोलून दाखविली.
संविधानात निर्देशित समता, बंधुता व न्यायाच्या मूलभूत तत्वांची शिकवण देण्यासाठी माणुसकीची शाळा आरंभिल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी छत्रपती शिवरायांच्या शौर्याची महती सांगणाऱ्या पोवाडयासह महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवरील भीम गीतेही आपल्या पहाडी आवाजात सादर करून त्यांनी छोटेखानी मैफिल खुलवली.
'हिटलर के साथी, जनाजो के बाराती
पुछते नही इन्सा को, पूछते धर्म और जाती ...'
या गीताने तर सारे वातावरण भारावून टाकले.
विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी, शेतकरी जागर मंचचे जिल्हा संयोजक प्रशांत गावंडे त्यांच्या समवेत उपस्थित होते.
धन्यवाद संभादादा... 🙏🙏
#LokmatAkola #KiranAgrawalLokmat #LokmatSambhajiBhagat
Saraunsh published in Akola Lokmat on Jan. 08, 2023
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20230108_2_3&fbclid=IwAR1RF4hpbum41fKsVFfSzWCIvc3qmMdB3lzWunQifRvTtwxilT0NnZV36J8
https://www.lokmat.com/editorial/does-the-grand-alliance-not-want-to-fight-to-win-a520-c310/?fbclid=IwAR3qrQboVoZL5phxYNB8FnthxlFWUr_RlNBiu8Yxnc-Vz6xmlE2SyeG72qY
आपले व शरीराचे वय वेगळे...
Jan. 02, 2023
आपले व शरीराचे वय वेगळे...
जन्मतारखेनुसार आपण आपले वय मोजतो, परंतु शरीराची अवस्था व व्यवस्था पाहता त्याचे म्हणून एक वय असते; जे अतिशय महत्त्वाचे आहे.
कागदपत्रातील वय तरुण असेल, परंतु शरीराची अवस्था थकल्यामुळे शरीराचे वय जास्त असेल तर काळजी घेणे गरजेचे बनते.
वॉकिंग, स्विमिंग व सायकलिंग अशा तिन्ही प्रकारात निपुण असलेले व योग तसेच संतुलित आहाराद्वारे ' बॉडी फिट तर लाईफ हिट' असा संदेश देणारे अकोल्यातील प्रख्यात नेत्रतज्ञ डॉ. जुगल चिरानीया यांनी याच विषयावर आरोग्यविषयक जनजागृती चालविली आहे.
ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, लोकमतचे संस्थापक, संपादक जवाहरलालजी दर्डा तथा श्रद्धेय बाबूजी यांच्या जन्मशताब्दी निमित्त अकोला येथे लोकमत व रोटरी क्लब नॉर्थ तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, यातही डॉ. चिरानिया यांनी या संदर्भातले महत्त्व पटवून दिले.
याप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभीये, रोटरी क्लब अकोला नॉर्थचे अध्यक्ष दीपक चांडक, सचिव महेश बाहेती तसेच प्रकल्प प्रमुख डॉ. जुगल चिराणिया व डॉ. गजानन वाघोडे, लोकमतचे युनिट हेड आलोककुमार शर्मा, समाचारचे प्रभारी अरुण कुमार सिन्हा आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
#LokmatAkola #JawaharlalDardaBirthCentury #KiranAgrawalLokmat
Monday, January 2, 2023
ग्रामविकासाची नवी आशा, नवी दिशा...
Jan. 01, 2023
ग्रामविकासाची नवी आशा, नवी दिशा...
गावकारभार व तेथील विकास थेट ग्रामपंचायतवर निर्भर असून, त्यात सरपंच हा अतिशय महत्त्वाचा घटक असतो.
गावकीचे राजकारण हे मोठे विचित्र असते, तेथे कारभार हाकणे हे त्यामुळेच कठीण बनते. पण यंदा थेट गावकऱ्यांच्या मतदानाने सरपंच निवडी झाल्या त्यामुळे विकासासाठी पक्षीय मतभेदाचे राजकारण व पॅनलबाजी आड येण्याची शक्यता कमीच आहे.
विशेष म्हणजे, मतदार यादीत नाव आल्या आल्या निवडणूक लढवून थेट सरपंचपदी निवडून आलेल्या व त्यातही शिकल्या सवरलेल्या नवोदितांचा भरणा मोठा आहे. त्यामुळे आशेने अशांकडे पाहिले जात आहे.
म्हणूनच, नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर लोकमत अकोला आवृत्तीच्या रौप्य महोत्सवी वाटचालीनिमित्त आयोजित संवाद सत्रात प्रातिनिधिक स्वरूपात निमंत्रित नवोदित सरपंचांच्या आशा व त्यांच्या वाटचालीची दिशा जाणून घेतली.
अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी श्री सौरभ कटीयार यांनी यावेळी मार्गदर्शन करून नव्या उमेदीने व संकल्पनांनी पुढे येत गावाचा विकास घडवून आणण्याचा मोलाचा सल्ला दिला.
यावेळी लोकमतचे युनिट हेड आलोककुमार शर्मा, समाचारचे प्रभारी अरुण कुमार सिन्हा यांच्यासह अखिल भटकर, वैभव कोरडे, संतोष खोटरे, कैलास मनतकार, सीमा देवानंद जामनिक, विकास वानखडे, विजय बावणे, किशोर पांडव, सतीश भाले, अंकुश इंगळे, प्रिया सराटे, पंकज सावळे, सोनू सागर उपरवट आदींनी सहभाग घेतला
#LokmatAkola #LokmatSamvadAkola
Saraunsh p[ublished in Akola Lokmat on Jan. 01, 2023
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20230101_5_1&fbclid=IwAR2Xz9dIE5Vk8iaHs6MHRGLSpLloilb5yBbAvb17-9Q2w9vWKQOhh2LFcn4
https://www.lokmat.com/editorial/lets-live-a-new-life-as-humans-in-the-new-year-2023-a520-c310/?fbclid=IwAR04kU2SE3sEaqEAl4MFUw0HHfCox5GPXHjo8GdA3iL5gl3rSI4aeA9rs-I
बुलंद हो हौसला तो मुट्ठी में हर मुकाम है...
Dec. 31, 2022
बुलंद हो हौसला तो मुट्ठी में हर मुकाम है,
मुश्किले और मुसीबते तो ज़िंदगी में आम है ।।
समाज माध्यमात हाती लागलेला हा विचार आज सरत्या वर्षाला निरोप देताना खूप काही सांगून व शिकवून जाणारा वाटला.
चला, संकटे, अडचणींचा विचार न करता नव्या उमेदीने नव्या वर्षाचे स्वागत करूया... Goodbye2022 #KiranAgrawal
डॉ. भाऊसाहेब देशमुख यांना वंदन...
Dec. 27, 2022
डॉ. भाऊसाहेब देशमुख यांना वंदन...
स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची आज जयंती.
शेती व शिक्षणाच्या क्षेत्रात खूप मोठे काम उभे केलेल्या भाऊसाहेबांनी वैदिक वाडमयातील धर्माचा उगम व विकास या विषयावरील प्रबंध सादर करून डॉक्टरेट मिळविली. शेतकरी संघ, ग्रामोद्धार मंडळ, अखिल भारतीय दलित संघ यासारख्या विविध संस्था स्थापन करून समस्त समाजाला पुढे नेण्याची भूमिका बजावणाऱ्या या नेत्याच्या ज्ञानाच्या कक्षा किती रुंद होत्या हे यावरून लक्षात यावे.
भारत कृषक समाजाची स्थापना करून बळीराजाला सन्मानाने व सक्षमपणे उभे करण्यासाठी अतिशय मोलाची भूमिका बजावणारे दूरदृष्टीचे नेते म्हणून भाऊसाहेबांचे कार्य मी वाचून व जाणून होतोच, त्यामुळे अकोल्यात आल्यावर कार्यालयीन सहकारींसमवेत त्यांच्याच नावाने उभारलेल्या व त्यांची चिरंतन स्मृती जपणाऱ्या डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातील स्मृती केंद्राला आवर्जून भेट दिली.
यावेळी येथील भाऊसाहेबांच्या पुतळ्याला वंदन केले, त्याप्रसंगीचे छायाचित्र...
#KiranAgrawalLokmat
अकोल्याला समृद्धीकडे नेऊ पाहणारे #रॅम्पकॉन2022
Dec 24, 2022
अकोल्याला समृद्धीकडे नेऊ पाहणारे #रॅम्पकॉन2022
बांधकाम व गृह सजावट करायचे म्हटले म्हणजे तेथे अनेक शक्यता व आवडीनिवडी येतात. नेमके काय व कसे करायचे हे बऱ्याचदा सुचत नाही. विविध प्राडक्ट्सची दुकाने धुंडाळायची तरी किती असाही प्रश्न पडतो.
या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी तसेच गेल्या काही वर्षात कोरोनाच्या महामारीमुळे थबकलेल्या अर्थकारणाला चालना देण्यासाठी असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स ( #ACCA ) अकोला शाखा व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर्स ( #IIA ) अकोला शाखेच्या संयुक्त विद्यमाने #RAMPCon2022 प्रदर्शनाचे आयोजन अकोल्यातील मुंगीलाल बाजोरिया शाळेच्या मैदानावर करण्यात आले आहे.
मुंबई, पुणे सारख्या महानगरांमध्ये होणाऱ्या प्रदर्शनाला तोडीस तोड असे हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. शंभरपेक्षा अधिक विविध प्रॉडक्ट्सची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध असलेल्या या रॅम्पकॉन2022 प्रदर्शनमध्ये बांधकाम व गृह सजावटीशी संबंधित अनेक नवीन प्रयोग व साहित्याची माहिती लाभते.
आयोजक इंजि. पंकज कोठारी यांच्या आग्रहामुळे या प्रदर्शनाला भेट दिली. आर्किटेक्ट असोसिएशनचे चेअरमन आर्कि. सुमित अग्रवाल, इंजि. अनुराग अग्रवाल, इंजि. इस्माईल नजमी, इंजि. शेखर मुखेडकर, आर्कि. कमलेश कृपलानी, आर्कि. वैभव शाह आदी पदाधिकारी व त्यांची संपूर्ण टीम या प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहे.
या भेटी दरम्यान अकोला लोकमतचे युनिट हेड आलोक कुमार शर्मा, लोकमत समाचारचे प्रभारी अरुण कुमार सिन्हा, पंकज कोठारी आदी मान्यवरांसोबतची आठवण चित्रे...
#KiranAgrawalLokmat
Saraunsh published in Akola Lokmat on Dec. 25, 2022
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20221225_2_2&fbclid=IwAR3G9R13wUv7wPMV_N66BI2pKua8moVgLP-cdiSiFnjxWvC9Mn13jUMiNEQ
डॉक्टरांवर विश्वास गरजेचा...
Dec. 24, 2022
डॉक्टरांवर विश्वास गरजेचा...
वैद्यकीय क्षेत्रातील कामकाज दिवसेंदिवस अधिक जोखमीचे होत चालले आहे. एकीकडे रुग्णाचा जीव वाचवण्याची धडपड तर दुसरीकडे भरपूर प्रयत्न करूनही त्यात अपयश आले तर दवाखान्यांवर होणारे हल्ले... अशी ही जोखीम आहे.
दुसरे म्हणजे, रुग्ण आता इतके सज्ञान झाले आहेत की तेच ट्रीटमेंट काय करायची याचा सल्ला देतात, अर्धवट माहितीच्या आधारावरील या सूचना व अपेक्षांमुळेही गोंधळ होतो. यासाठी डॉक्टरांवर विश्वास गरजेचा आहे. रुग्ण लवकर बरा व्हावा, असेच सर्व डॉक्टरांचे प्रयत्न असतात.
लोकमत अकोला आवृत्तीच्या रौप्य महोत्सवी वाटचालीनिमित्त आयोजित संवाद सत्रात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अकोला शाखेचे पदाधिकारी व डॉक्टरांनी मनमोकळ्या भावना व्यक्त केल्या.
आयएमए शाखेचे अध्यक्ष बालरोग तज्ञ डॉ. अनुप कोठारी, डॉ. शिवाजी ठाकरे, डॉ. सागर भांबेरे, डॉ. श्रेय अग्रवाल, डॉ. विक्रांत इंगळे यांनी या चर्चेत सहभाग घेतला
#LokmatAkola #LokmatSamvadAkola
शाळाबाह्य कामाचा व्याप अन तापही ...
Dec. 22, 2022
शाळाबाह्य कामाचा व्याप अन तापही ...
शालेय शिक्षणाकडे नवीन पिढीच्या भविष्याचा पाया म्हणून पाहिले जाते, पण या पायरीवरील मुख्याध्यापक वा शिक्षक आदींना शिक्षणापेक्षा शाळाबाह्य कामातच इतके जुंपले जाते, की त्यांनी शिकवावे तरी कधी असा प्रश्न निर्माण होतो.
एकीकडे शिक्षणाचा दर्जा खालावत असल्याची तक्रार वाढत असताना, दुसरीकडे एकूणच शिक्षण क्षेत्राकडे जितक्या गांभीर्याने बघायला हवे व त्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्या ते पुरेशा प्रमाणात होताना दिसत नाही.
अनेकविध अडचणीतून मार्ग काढत व कामाचा व्याप सांभाळत ज्ञानार्जनाचे काम करणाऱ्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी आपल्या भावना अकोला लोकमतच्या रौप्य महोत्सवी वाटचालीनिमित्त आयोजित संवाद सत्रात व्यक्त केल्या .
विदर्भ मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शत्रुघ्न बिरकड, जिल्हा कार्याध्यक्ष विजय ठोकळ, जिल्हा सचिव दिनेश तायडे, विदर्भ सहसचिव गजेंद काळे, महानगर सचिव प्रा. प्रकाश डवले, कोषाध्यक्ष माधवराव विखे, बाळापूर तालुकाध्यक्ष अरुण दातकर, सचिव राजाभाऊ इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष आनंद साधू, महिला प्रतिनिधी नीलिमा वहाडे, सदस्य मुकेश गव्हाणकर आदींनी यात सहभाग घेतला.
#LokmatAkola #LokmatSamvadAkola #KiranAgrawalLokmat
Subscribe to:
Posts (Atom)