Friday, October 3, 2025

लोकमत महागेम्स ... 2025

17 Jan, 2025 लोकमत महागेम्स ...
आजकाल मुलं ग्राउंडवर कमी आणि मोबाईलमध्ये जास्त अडकलेले दिसतात, पण तशातही सुमारे अडीच ते तीन हजार मुलं थंडीचा कडाका असतांनाही भल्या पहाटे ग्राउंडवर येऊन विविध स्पर्धांत खेळतांना संपूर्ण दिवस स्वतःला हरवून बसतात तेव्हा त्याचा आनंद अवर्णनीयच ठरतो. 'लोकमत' कॅम्पस क्लब आयोजित महाराष्ट्रातील सर्वात मोठे स्कुल ऑलिम्पिक 2025 ठरलेल्या लोकमत महागेम्समुळे ही किमया घडून येते आहे. जळगाव जिल्ह्यातील 50पेक्षा अधिक शाळांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला असून छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम मध्ये उत्साहात या गेम्सचे उद्घाटन पार पडले. विविध प्रकारच्या 11खेळांचा यात समावेश आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, स्माईलिंग नीजचे डॉ.मनिष चौधरी, नोबेल इंटरनॅशनल स्कूलच्या अर्चना सूर्यवंशी व प्रशांत सुर्यवंशी, नुतन मराठा महाविद्यालयाचे प्रा. के. बी. पाटील, राष्ट्रीय फुटबॉलपटू सिद्धी ठाकरे, संस्कृती मेढे, ॲथलेटिक्स संघटनेचे उपाध्यक्ष इकबाल मिर्झा तसेच फुटबॉल संघटनेचे सचिव फारुख शेख, लोकमतचे उप महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी आदींच्या उपस्थितीत या खेळांना प्रारंभ झाला. विविध क्रीडा प्रशिक्षकांना यावेळी लोकमततर्फे सन्मानित करण्यात आले. याप्रसंगीची ही काही आनंद चित्रे... #LokmatJalgaon #LokmatJalgaonEvent #LokmatMahaGames #KiranAgrawalLokmatJalgaon #LokmatCampusClub

No comments:

Post a Comment