Friday, October 3, 2025

नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो ... 2025

15 Jan, 2025 नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो ...
नरेडको या संस्थेतर्फे जळगावच्या सागर पार्कवर नाशिक प्रॉपर्टी एक्सपो लावण्यात आले आहे. जळगाव खान्देशातील अनेकांची नाशिकशी कनेक्टिव्हिटी आहे. कुणी उद्योग व्यवसायासाठी तिकडे गेले आहे, तर कुणी नोकरीसाठी. अनेकांची मुले शिक्षणासाठी नाशकात आहेत. अशांना नाशकात आपले हक्काचे घर असावे असे वाटणे स्वाभाविक आहे. त्यांच्यासाठी हे प्रदर्शन उपयोगी ठरावे. या एक्सपोनिमित्त नाशकातील उदयोन्मुख भु-विकासकांच्या भेटी झाल्या. नाशिकचा विकास व जळगावमध्ये त्यासाठी असलेल्या संधी यावर छान चर्चा झाली. नरेडकोचे नाशिकचे अध्यक्ष सुनील गवांदे, सचिव शंतनु देशपांडे यांनी आपलेपणाने स्वागत केले. भूषण महाजन, प्रशांत पाटील, शशांक देशपांडे, लोकमत जळगावच्या ॲड मार्केटिंगचे वरिष्ठ व्यवस्थापक सुरज धाये यावेळी समवेत होते. #KiranAgrawal #NashikPropertyExpo #NaredcoNashik

No comments:

Post a Comment