Friday, October 3, 2025

सूर्योदय साहित्य संमेलन... 2025

23 Jan, 2025 सूर्योदय साहित्य संमेलन...
जळगाव येथील सूर्योदय सर्वसमावेशक मंडळातर्फे आयोजित राज्यस्तरीय 22वे सूर्योदय मराठी साहित्य संमेलन प्राचार्य डॉ. संजीव गिरासे (धुळे) यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच अभियंता भवनात उत्साहात पार पडले. या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणा म्हणून जाण्याची संधी मिळाल्याने मान्यवर साहित्यिक व जुन्या मित्रांच्या भेटी घडून आल्या. संमेलनाचे उद्घाटन नाशिकच्या साहित्यिका प्रा. सुमनताई मुठे यांच्या हस्ते करण्यात आले, तर अभियंता साहेबराव देवराम पाटील, प्रा. डॉ. तुषार चांदवडकर, प्र. द. कुलकर्णी, मिलिंद चिंधडे, भगवान पाटील, प्रा. म. सु. पगारे, डी. बी. महाजन आदींचा यात सक्रिय सहभाग होता. मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन यांनी सरकारी अनुदानाऐवजी लोकवर्गणीतून ही संमेलने चालविली आहेत ही यातील विशेष बाब. धन्यवाद सतीश जी, आपल्या या धडपडीचे कौतुक आहे #SuryodayJalgaon #SuryodaySahityaSammelan #KiranAgrawal

No comments:

Post a Comment