Friday, October 3, 2025

अभिनयाखेरीजचे पत्रकारितेचे बंध...

03 Feb, 2025 अभिनयाखेरीजचे पत्रकारितेचे बंध...
महाराष्ट्र शासनाच्या रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाच्या बैठकीनिमित्त जळगावी आलेले या मंडळाचे अध्यक्ष तथा प्रख्यात अभिनेते विजय गोखले यांनी लोकमत कार्यालयास सदिच्छा भेट देऊन सहकाऱ्यांसमवेत संवाद साधला. विजयदादांचा व माझा स्नेह नाशिकपासूनचा. त्यांचे पिताश्री श्रद्धेय विद्याधर गोखले संगीत नाटककार होतेच, पण ते लोकसत्तेचे संपादकही होते आणि त्यानंतर खासदार म्हणूनही निवडून गेले होते. त्यामुळे अण्णांच्या पत्रकारितेच्या धाग्याने व स्व. हेमंतराव कुलकर्णी यांच्या माध्यमातून आमची नाळ जुळली. अभिनयाखेरीजच्या याच बंधातून ते भेटले आणि गप्पांमध्ये रंगले. त्यांच्यासमवेत मंडळाचे सदस्य व ज्येष्ठ रंगकर्मी संजय भाकरे, मुकुंद पटवर्धन, धर्मवीर चित्रपटात बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारलेले मकरंद पाध्ये, प्रख्यात एकपात्रिकार रमेश थोरात, विश्वनाथ निळे, जळगावच्या गीतांजली ठाकरे आदी मान्यवरही उपस्थित होते. छान चर्चा झाली. #LokmatJalgaon #KiranAgrawal #VijayGokhle

No comments:

Post a Comment